अॅडिसन रोग काय आहे?
अॅडिसन रोग हा अंतःस्रावी किंवा हार्मोन-उत्पादक प्रणालीचा एक दुर्मिळ विकार आहे. हा सामान्यतः अॅड्रेनल इनसफिशियन्सी म्हणून ओळखला जातो कारण मूत्रपिंडा/अॅड्रेनलवरील ग्रंथीमधील कॉर्टिसोल आणि अल्डोस्टेरॉन सारख्या हार्मोन्सची पुरेश्या प्रमाणात निर्मिती होत नाही. अॅडिसन रोग वेगवेगळ्या वयोगटातील लोकांमध्ये उद्भवत असल्याचे आढळले आहे आणि दोन्ही लिंगातील व्यक्तींना समान प्रमाणात प्रभावित करू शकतो.
त्याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
अॅडिसन रोगाची लक्षणे सामान्यतः हळूहळू विकसित होतात आणि त्यात याबाबींचा समावेश असू शकतो:
- अत्यंत थकवा जाणवणे.
- वजन कमी होणे.
- भूक कमी होणे.
- मीठ खाण्याची तीव्र इच्छा होणे.
- रक्तदाब खूप कमी होणे.
- लो ब्लड शुगर.
- मळमळ किंवा उलट्या.
- हायपरपिग्मेंटेशन.
- उदासीनता.
- पोटदुखी.
- स्नायू किंवा सांध्यांमध्ये वेदना.
- काही प्रकरणांमध्ये भोवळ येणे.
- महिलांमध्ये लैंगिक डिस्फंक्शन.
याची मुख्य कारणं काय आहेत?
अॅडिसन रोग कॉर्टिसोल आणि अल्डोस्टेरॉन सारख्या हार्मोन्स च्या अपुर्या निर्मितीमुळे होतो. हे सामान्यतः तेव्हा होते जेव्हा अॅड्रेनल ग्रंथी (मूत्रपिंडांवर असलेल्या ग्रंथीवरील स्थित ग्रंथी) च्या प्रांतस्थाचे नुकसान होते आणि म्हणूनच हा प्रायमरी अॅड्रेनल इनसफिशियन्सी म्हणून ही ओळखला जातो.
अॅड्रेनल ग्रंथीच्या निष्फळतेची काही सामान्य कारणं पुढील प्रमाणे आहेत:
- अॅड्रेनल ग्रंथी मध्ये रक्तस्त्राव.
- अॅड्रेनल ग्रंथीमध्ये कर्करोगाचा प्रसार.
- क्षय रोग.
- फंगस, व्हायरस, पारासाईट्स, आणि बॅक्टरीया यासारख्या काही संसर्गामुळे अॅड्रेनल ग्रंथींना क्षती पोहचणे.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
सामान्यतः सुरुवातीच्या काळात अॅडिसन रोगाचे निदान करणे कठीण आहे. पण, आपली लक्षणे आणि वैद्यकीय इतिहासावर आधारित, डॉक्टर प्रथम आपली शारीरिक तपासणी करतात.
यानंतर, काही हार्मोन्सचे स्तर निर्धारित करण्यासाठी काही बायोकेमिकल चाचण्या सूचित करू शकतात. कॅल्शियम डिपॉझिशन तपासण्यासाठी पोट आणि ओटीपोटाचा एक्स रे काढण्याचा सल्ला देखील दिला जाऊ शकतो. अॅड्रेनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन (एसीएचटी) सिम्युलेशन चाचणीसाठी करण्याचा सल्ला देखील दिला जाऊ शकतो ज्या दरम्यान एसीटीएचइंजेक्शन देऊन कॉर्टिसोलची निर्मिती तपासले जाऊ शकते ज्यामुळे अॅड्रेनल ग्रंथीच्या कार्याची पुष्टी करण्यात मदत होईल.
अॅडिसन रोगावरील उपचारात खालील पद्धतींचा समावेश केला जाऊ शकतो:
- ओरल हार्मोनल थेरपी, ज्यामध्ये अॅड्रेनल ग्रंथी तयार करतात त्या हार्मोन्सला तोंडी औषधी पुनर्स्थित करतात. आपल्याला तोंडी हायड्रोकार्टिसोन गोळ्या किंवा मिनरलकॉर्टिकॉइड्स दिले जाऊ शकते.
- आपल्याला हायड्रोकार्टिसोन चे शिरांतर्गत (नसांमध्ये सोडले जाणारे) इंजेक्शन्स घेण्याचे सुचविले जाऊ शकते, ज्यामुळे जलद सुधारणा होत असल्याचे आढळले आहे.