गरोदरपणात पंडुरोग (गरोदरपणात ॲनिमिया) काय आहे?
गरोदरपणात ॲनिमिया ही मुख्यतः विकसनशील देशांमध्ये आढळणारी एक सामान्य वैद्यकीय अवस्था आहे. गर्भधारणे दरम्यान वाढत्या गर्भ तसेच माता यांना पुरेसे पोषण व ऑक्सिजन पुरविण्यासाठी रक्ताच्या उत्पादनाची आवश्यकता असते. अतिरिक्त रक्त पेशी तयार करण्यासाठी अधिक प्रमाणात लोह (हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी आवश्यक आहे) आणि इतर पोषक तत्त्वांची आवश्यकता असते. पण, जर शरीरात आवश्यक लोह आणि इतर घटक नसतील तर या अतिरिक्त आवश्यकता पूर्ण होऊ शकत नाहीत, परिणामी गरोदरपणात पंडुरोग (गरोदरपणात ॲनिमिया) किंवा गर्भधारणे दरम्यान पंडुरोग (ॲनिमिया) होतो. ही अवस्था सामान्यत: सौम्य असते परंतु गंभीर स्वरुप धारण करू शकते. जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) नुसार गर्भधारणेदरम्यान शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी (एचबी <11 ग्रॅम / डीएल) असते. गरोदरपणातीर पंडुरोगामुळे (गरोदरपणात ॲनिमिया) अकाली जन्म, कमी जन्म वजन व मातेचा मृत्यू (माता मृत्यू) होऊ शकतो.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
ॲनिमियाची साधारण लक्षणे पुढील प्रमाणे आहेत:
- अशक्तपणा.
- थकवा.
- चक्कर येणे (डोके हलके वाटणे).
- लक्ष केंद्रित करण्यात अक्षमता.
- ओठ, जीभ, त्वचा, आणि नखे (पल्ला) यांचे निस्तेज होणे.
- हात आणि पाय थंड पडणे.
- धाप लागणे.
- हृदयक्षिप्रता (वाढीव हृदयाची दर > 100 बीट्स प्रति मिनिट).
याची मुख्य कारणं काय आहेत?
गरोदरपणात पंडुरोग (गरोदरपणात ॲनिमिया) सामान्यत: लोह समृद्ध अन्न नसल्यामुळे, गर्भधारणेपूर्वी मासिक पाळीच्या दरम्यान अति रक्तस्त्राव झाल्याने, अल्सरमुळे किंवा रक्तदान केल्यानंतर, जिथे रक्तपेशींचे उत्पादन दर निर्मिती दरापेक्षा कमी वेगाने होत असतो. पंडुरोगाची (ॲनिमियाची) सर्वात सामान्य कारण म्हणजे लोह-कमतरता आणि फॉलीक ॲसिडची कमतरता आहेत. वाढलेल्या प्लाजमा व्हॉल्यूम (रक्तातील पेशी असलेल्या पेंढा-रंगाच्या व्हिस्सस द्रवपदार्थ) च्या प्रमाणानुसार गर्भधारणेमुळे लाल रक्तपेशी निर्मिती (रक्तातील सेल्युलर घटक - आरबीसी) ची अतिरिक्त आवश्यकता असल्यामुळे पंडुरोग (ॲनिमिया) होऊ शकतो.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
निदान सामान्यतः स्त्रीच्या लक्षणांवर अवलंबून असते, पण गर्भधारणे दरम्यान, कोणत्याही स्तरावर, संपूर्ण रक्त गणना (सीबीसी) चाचणी हिमोग्लोबिन (एचबी) ची पातळी तपासणे आवश्यक असते. एचबी पातळी, साधारणतः 10-11 ग्रॅम / डीएल पेक्षा कमी असल्यास, तो पंडुरोग (ॲनिमिया) मानल्या जातो. तो सामान्यतः सौम्य असतो. जर स्त्रीला पंडुरोग (ॲनिमिया) झाल्याचे निदान झाले असेल तर त्यानंतर मीन कॉर्पस्क्यूलर व्हॉल्यूम (एमसीव्ही) चाचणीची आवश्यकता असते. मूल्यांकनात सीरम फेरिटिन (लोह), हिमोग्लोबिनोपाथिस पातळीचे मोजमाप करण्यासाठी हिमोग्लोबिन इलेक्ट्रोफेरोसिस (हिमोग्लोबिन रेणूचे इनहेरिटेड विकार), सीरम फॉलिक ॲसिड आणि व्हिटॅमिन बी 12 यांच्या पातळीचे मोजमाप केले जाते.
उपचारांमध्ये सहसा अंतर्निहित कारणांवर उपचाराचा समावेश असतो. उपचार करायला आणि परिस्थिती सांभाळायला, लोह आणि व्हिटॅमिन सप्लीमेंट्स दिले जातात. हिमोग्लोबिनच्या पातळीमध्ये वेगाने सुधार आणण्यासाठी अतिरिक्त लोह- आणि फोलेट समृध्द आहार घेण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो. याशिवाय, दुर्मिळ आणि गंभीर प्रकरणांमध्ये डॉक्टरांच्या सल्यानुसार रक्तसंक्रमणाची आवश्यकता भासू शकते. लोह समृध्द आहाराची काही उदाहरणं म्हणजे मांस, अंडी, हिरव्या पालेभाज्या, कठीण कवचाची फळे किंवा बिया (नट्स), नट्स, डाळी, कडधान्ये आणि टोफू. व्हिटॅमिन सी याव्यतिरिक्त लोहाचे अधिक शोषण सुलभ करते. व्हिटॅमिन सी-समृद्ध पदार्थांमध्ये सायट्रस फळं जसे की संत्र, टमाटर, स्ट्रॉबेरी, कीवी, आणि ढोबळी मिरची यांचा समावेश होतो.