अॅनोरेक्सिया नर्वोसा म्हणजे काय?
अॅनोरेक्सिया नर्वोसा हा एक जेवणाशी संबंधित मानसिक आजार आहे ज्यामध्ये वजन कमी करण्याच्या तीव्र इच्छेमुळे पिडीत अयोग्यरित्या वजन कमी करते. रुग्णाच्या मनात निरोगी शरीराची विकृत कल्पना असते आणि वजन कमी करण्यासाठी तो कठोर परिश्रम करतो. जरी अॅनोरेक्सिया नर्वोसा सामान्यतः किशोरावस्थेच्या दरम्यान सुरू होतो तरी लहान मुलांमध्ये आणि प्रौढांमध्ये देखील हा आढळतो.
अॅनोरेक्सिया नर्वोसा ची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
- खाण्यासंबंधित वागणूकीची लक्षणे:
- शरीर बारीक असूनसुद्धा अत्यंत सीमित आहार.
- अकारण सबबी देत जेवण टाळण्याची सवय.
- काहीही खातांना अन्न आणि कॅलरीजचे विनाकारण कल्पना राहणे.
- जेवण झाले असल्याबद्दल खोटे बोलणे किंवा खाण्याचे नाटक करणे.
- रंगरूप आणि शरीर आकार याबाबतची लक्षणं:
- अचानक, वजन कमी होणे.
- जास्त वजन असल्याचा भ्रम असणे.
- मोहक दिसण्याच्या कल्पनेने स्वप्रतिमेबद्दल अति जागरूक असणे.
- शरीर आणि रंगरूप याबाबत सतत अस्वस्थ असणे.
- पर्जिंगची लक्षणं:
- खूप व्यायाम करणे.
- खाण्या नंतर जबरदस्ती उलट्या करणे.
- वजन कमी करण्यासाठी गोळ्यां (उदा. लॅक्सेटिव्ह्ज) चा वापर करणे.
- धोक्याची चिन्हे आणि नोंद घेण्याची लक्षणं: उदासीनता, चिंता, ठिसूळ हाडं आणि नखं, तीव्र केस गळती, वारंवार चक्कर येणे.
अॅनोरेक्सिया नर्वोसाची मुख्य कारणं काय आहेत?
अॅनोरेक्सियाचे कोणतेही एकच कारण नसते, परंतु हा अनेक विकृत घटक असलेला विकार आहे.
- सामान्य कारक घटक:
- परिपूर्णता, मोहकता आणि स्पर्धात्मक कौटुंबिक स्वभाव वैशिष्ट्य.
- कौटुंबिक विवाद.
- शैक्षणिक दबाव.
- कुटुंबातील सदस्यांमधील खाण्यासंबंधीत विकृतींचा इतिहास.
- प्रवर्तक कारणं:
- अपमानजनक बालपण.
- तारुण्य किंवा तारुण्याची सुरुवात.
अॅनोरेक्सिया नर्वोसाचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
- निदानाचे निकषः
- व्यक्तीचे वजन विशिष्ट वयासाठी आणि उंचीसाठी शरीराच्या आवश्यक किमान वजनाइतके किंवा त्यापेक्षा कमी असते.
- वजन कमी असूनही वजन वाढण्याची अति अवास्तव भीती.
- शरीराचे वजन आणि आकार यांच्या संबंधात विकृत स्वरुपाची कल्पना.
- ज्या स्त्रियांना/मुलींना मासिक पाळीचा प्रारंभ झाला आहे पण कमीतकमी 3 महिने मासिक पाळी आली नाही.
- उपचारः
- वजन वाढविण्यासाठी वारंवार खायला देण्यासाठी हॉस्पीटलमध्ये अॅडमिट करणे हा प्रारंभिक एक उपाय आहे. लहान मुलांसाठी आणि किशोरांसाठी हे श्रेयस्कर आहे.
- दुसरी पद्धत म्हणजे आहारतज्ञां बरोबरच मानसोपचारतज्ञांचा सल्ला घेणे. या परिस्थितीत, कौटुंबिक सदस्य वारंवार खाऊ घालण्याची जबाबदारी घेतात. या पद्धतीमुळे परिणाम बराच उशिरा होतो, पण वाढलेले वजन वाढणे बराच काळ टिकून राहण्याची शक्यता असते.
- अॅनोरेक्सियासाठी मानसोपचार दीर्घकालीन असू शकतात, संज्ञानात्मक आणि वर्तनात्मक थेरपीसह संज्ञानात्मक पुनरुत्पादन आणि जोडलेल्या सहायक थेरपीवर जोर देऊन उपचार अनेक मार्गानी केले जातात. निरोगी उपचारात्मक संबंध राखण्यासाठी सहायक थेरपी आवश्यक आहे, ज्यामुळे अॅनोरेक्सिया नर्वोसास साठी कारणीभूत घटकांचे परीक्षण आणि संबोधन केले जाऊ शकते.