सेप्टिक संधिवात काय आहे?
सेप्टिक संधिवात किंवा संसर्गजन्य संधिवात, हा सांध्यांमधील द्रव आणि ऊतक यामध्ये होणारा एक संसर्ग आहे. हा आजार शक्यतो संसर्गजन्य जंतू रक्तप्रवाहामार्गे सांध्यांपर्यंत पोहचून किंवा एखादी अशी दुखापत ज्यामुळे सर्व जंतू सांध्यांपर्यंत पोहचू शकतील यामुळे होतो. हा एक अक्षम आजार आहे जो कोणत्याही वयोगटातील लोकांना होऊ शकतो. लहान बाळांमध्ये या आजारसाठीच्या कमी प्रतिकार शक्तीमुळे तो जास्त प्रमाणात आढळतो.भारतामध्ये हा विकार 1500 नवजात बालकांमध्ये एखाद्याला होण्याची शक्यता असते.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
गुडघ्याचा आणि श्रोणीचा सेप्टिक संधिवात हा सामान्यतः मोठ्या मुलांमध्ये आणि प्रौढांमध्ये आढळून येतो तर नवजात शिशुंमध्ये श्रोणीचा आणि खांद्यांचा सेप्टिक संधिवात आढळतो. यासाठी दिसून येणारे सामान्य लक्षणे म्हणजे वेदना, ताप, सूज, कोमलपणा, आरक्तपणा आणि लंगडणे. वयानुसार लक्षणे बदलतात. शक्यतो एखादा सांधाच दुखावतो. अनेक सांधे दुखावले जाणे खूप दुर्मिळ आहे. सांध्यांमधील तीव्र वेदनांमुळे परस्थिती खालावू शकते किंवा हालचाल करणे अवघड होऊ शकते. शरीरातील इतर अवयवांमधील संसर्गामुळे प्रतिक्रियाशील संधीवात पण होऊ शकतो.
लहान बाळ आणि नवजात शिशुंमध्ये अढळणारी लक्षणे:
- दुखाणार्या सांध्याची हालचाल झाली की रडतात.
- ताप.
- दुखाणार्या सांध्याची हालचाल करता न येणे.
- अस्वस्थता किंवा चिडचिडेपणा.
याची मुख्य कारणं काय आहेत?
हे जीवाणू किंवा क्वचित बुर्शी किंवा व्हायरसमुळे होण्याची शक्यता असते.
जीवाणू ज्यामुळे सेप्टिक संधिवात होतो ते आहेत:
- स्टॅफिलोकॉकी.
- हेमोफिलस इन्फ्लूएंझा.
- ग्राम-निगेटिव्ह बॅसिली.
- स्ट्रेप्टोकॉकी.
सांध्यांमध्ये बॅक्टेरियांचा प्रवेश याप्रकारे होऊ शकतो:
- शरीरातील इतर अवयवांमधील संसर्ग.
- संक्रमित जखमा.
- उघडे असलेले फ्रॅक्चर त्वचेच्या आत शिरणे.
- बाहेरील जंतू त्वचेच्या आत प्रवेश करणे.
- आघात.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
डॉक्टर सेप्टिक संधिवाताचे निदान संपूर्ण पूर्व वैद्यकीय इतिहास,शारीरिक तपासण्या आणि निरनिराळ्या लॅब मधील चाचण्या करुन करतात. खालील प्रकारच्या चाचण्या केल्या जातात:
- सांध्यामधील द्रवाचे विश्लेषण:सांध्यामधील द्रवाची तपासणी करुन संसर्ग तपासणे.
- रक्त चाचणी: जर काही संसर्ग आणि रोगप्रतिकारशक्तीचे संक्रमण असेल तर त्याची तीव्रता तपासणे.
- सूक्ष्मजीववैज्ञानिक विश्लेषण: शरीरातील बॅक्टेरिया/बुर्शी/व्हायरस चा प्रकार शोधणे.
- इमेजिंग चाचण्या: संसर्गीत सांध्यांचे एक्स-रे, अल्ट्रासाउंड आणि एमआरआय काढणे.
सेप्टिक संधिवाताच्या उपचाराचा मुख्य ध्येय हे संसर्ग करणार्या जीवाणुंवर आणि रुग्णांचे औषधासाठीच्या सहनशीलतेवर आधारित योग्य अँटीबायोटिक्सची निवड करणू हा असतो. हा उपचार दोन ते सहा आठवडे चालतो. अँटीबायोटिक्सच्या कामासाठी सुईमार्गे किंवा अर्थ्रोस्कोपीच्या मदतीने जॉइन्ट ड्रेनेज केले जाते. जे सांधे ड्रेन करण्यास अवघड असतात त्यासाठी कधीकधी ओपन सर्जरी केली जाते. जॉइन्ट ड्रेनेज संसर्ग काढण्यास, वेदनामुक्त करण्यास आणि रोगमुक्तता करण्यास मदत करतात.
इतर निदानांसाठीच्या उपचारांमध्ये यांचा समावेश होतो:
- वेदना आणि ताप मुक्त करणारी औषधे.
- सांधे मजबूत आणि त्यातील हालचाल व्यवस्थित ठेवण्यासाठी शारीरिक व्यायाम व उपचार.
- सांध्यातील वेदना कमी करण्यासाठी स्प्लिंट्सचा वापर करणे.
- सांध्यांमधील अनावश्यक हालचाल कमी करणे.
स्वत: ची काळजी घेण्यासाठी काही टिप्स:
- सर्वात महत्त्वाचे की बाह्य जोर किंवा नुकसाना पासून बाधित सांधा वाचवून ठेवणे आणि भरपूर आराम करणे.
- हृदयाच्या स्तरापेक्षा थोडे वर बाधित सांधा ठेवून त्याला बर्फाने शेकून वेदना कमी करणे.
- रोगमुक्तते नंतर सांध्यांमध्ये शक्ती आणि हालचाल ठीक करण्यासाठी नियमित थोडा व्यायाम करणे.
- ऑमेगा-3 फॅट्स ने परिपूर्ण आहार जो ही सूज कमी करण्यास आणि उपचारास मदत करेल त्याचे सेवन करणे. ते आहेत:
- सॅल्मन आणि सारडाइन्स सारखे तेलकट मासे.
- जवस.
- आक्रोड.