प्रोस्टेट ग्रंथी वाढणे म्हणजे काय?
प्रोस्टेट ही पुरुषांमध्ये आढळणारी एक छोटीशी ग्रंथी असते, जी सिमेन मध्ये एक द्रव्य सोडते ज्याने स्पर्म्सला पोषण मिळते. ही ग्रंथी युरेथ्रा, लघवी वाहवून नेणारी नळी, याच्या जवळच स्थित असते. 50 वर्षापेक्षा जास्त वयातील पुरुषांमध्ये किंवा उतारवयात प्रोस्टेट ग्रंथीची वाढ होणे सामान्य आहे.
याला बेनिन प्रोस्टॅटिक हायपरप्लासिया (बीपीएच) असेही म्हटले जाते कारणं याने कॅन्सर होत नाही. तसेच प्रोस्टेट कॅन्सर होत नाही किंवा होण्याची शक्यता सुद्धा वाढत नाही.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
प्रोस्टेट वाढीमुळे युरेथ्रा अरुंद होतो आणि त्यामुळे पुरुषांच्या लघवीवर त्याचा परिणाम होतो.
- वारंवार लघवी होणे, आणि त्यावर नियंत्रण न राहणे. हा त्रास रात्री जास्त होतो. (अधिक वाचा: वारंवार युरीन येण्याची कारणं)
- लघवी चा प्रवाह अचानक सुरु होतो आणि थांबतो, आणि लघवी अर्धवट झाल्यासारखी वाटते.
- लघवी करतांना वेदना होतात आणि रक्त येते.
याची मुख्य कारणं काय आहेत?
प्रोस्टेट वाढीचे नेमके कारणं माहित नाही, पण उतारवायाशी हे संबंधित असू शकते.
- टेस्टिक्युलर सेल्समध्ये बदल तसेच पुरुषांमध्ये असलेल्या, टेस्टोस्टेरॉन हॉर्मोन लेव्हलमध्ये बदल, हे ग्रंथीवाढीची कारणं आहेत.
- संशोधनातून असे दिसून येते की ज्या पुरुषांचे अंडकोष काही कारणास्तव काढले गेले आहे त्यांना प्रोस्टेट वाढीची समस्या येत नाही.
- 75 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या पुरुषांमध्ये ही समस्या अधिक दिसून येते आणि याचा इतर रिस्क फॅक्टर्स शी काही संबंध नसतो.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
प्रोस्टेट वाढीचे निदान हे आजाराची लक्षणं, शारीरिक तपासणी तसेच काही इतर कारणं वगळून केले जाते.
- लघवी करतानाचे त्रास हे इतर काही आजार जसे की किडनी ची समस्या,मूत्राशयाचा कॅन्सर किंवा युरेथ्रा मध्ये अडथळा यामुळे होऊ शकतो. ही सगळी कारणं युरॉलॉजिस्ट द्वारे आधी तपासली जातात.
- निदान करण्यासाठी डॉक्टर आपली सखोल माहिती घेतात जसे की आजाराची लक्षणं आणि इतर काही वैद्यकीय उपचार सुरु असल्याची माहिती.
- शारीरिक तपासणी, अल्ट्रा साऊंड, आणि प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजन किंवा पीएसए तपासणारी ब्लड टेस्ट या प्रोस्टेट वाढीचे निदान करण्यासाठी मुख्य चाचण्या आहेत.
लक्षणं किती गंभीर आहेत यावर उपचार अवलंबून असतात. सौम्य लक्षणं असतील, तर उपचाराची गरज नाही आहे.
- लघवी करताना त्रास कमी व्हावा म्हणून औषधे दिली जातात. सहसा, अल्फा ब्लॉकर्स या क्लासची औषधे वापरली जातात.
- प्रोस्टेट लहान करण्यासाठी,युरॉलॉजिस्ट इतर काही प्रकारची औषधें देऊ शकतात, जसे की 5-अल्फा रेडक्टेज इनहिबिटर जे 6 महिने घेतले जाते.
- जर लक्षणं खूप गंभीर असतील तर, प्रोस्टेट चा एक भाग सर्जरी करून काढला जातो ज्यामुळे युरेथ्रा वरचे प्रेशर कमी होते.
(अधिक वाचा: पुरुषांच्या लैंगिक समस्या आणि उपाय)