हिरडयातून रक्त येणे म्हणजे काय?
हिरडयातून रक्त येणे म्हणजे शरीर अस्वस्थ किंवा हिरड्या रोगग्रस्त असल्याचा हा संकेत आहे. हिरडयातून रक्त येणे थांबवण्यासाठी तसेच उपचार करण्यासाठी योग्य प्रकारे दातांची स्वच्छता राखणे, आणि निरोगी जीवनशैली असणे हे या रोगाच्या व्यवस्थापनामध्ये महत्वाचे घटक आहेत.
त्याचे मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
हिरडयातून रक्त येण्याच्या अगोदर, त्यात सूज येते (लाल होऊन सुजली जाते) आणि साधारणपणे दात घासल्यावर किंवा दात फ्लॉस केल्यावर हिरडयातून रक्त येण्यास सुरु होते (गिंगिव्हिटीस). जसजसा त्रास वाढतो आणि सूज जबड्याच्या हाडापर्यंत पोहोचते तेव्हा हिरड्यातून येणारे रक्त ही वाढते (पीरियडोंटाइटिस). जसजसा रोग वाढत जातो तसतसा विविध लक्षणें दिसून येतात:
- श्वासांमधून वाईट वास येणे .
- अन्न चावून खात असताना वेदना आणि अडचण जाणवणे.
- हिरडयामधून दात खेचताच दात बाहेर निघणे.
- दातांमध्ये संवेदनशीलता वाढल्याने दात पडायला सुरुवात होते.
- हिरड्यामध्ये पस साठणे.
- तोंडातील धातूचा स्वाद, तोंडात लाळ-स्राव वाढणे आणि संसर्ग रोग वाढल्यास ताप येतो.
हिरडयातून रक्त येण्याचे मुख्य कारणें काय आहेत?
हिरडयातून रक्तस्त्राव होण्यास कारणीभूत असणारे भिन्न कारणें पुढीलप्रमाणे आहेत:
- दात घासण्यासाठी चुकीची पद्धत किंवा कडक ब्रश दातांसाठी वापरणे.
- दातांची स्वच्छता कमी होणे.
- हिरडया आणि दातांच्या थरांवर प्लॅक तयार झाल्यामुळे संसर्ग होणे.
- गर्भधारणेदरम्यान हार्मोन्समध्ये बदल.
- व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन के ची कमतरता
- रक्तस्त्रावचा विकार.
- रक्त पातळ करणारे औषध.
- रक्ताचा कर्करोग जसे ल्यूकेमिया.
- अयोग्य दंतचिकित्सा.
- मधुमेह.
- सिगारेटचे धूम्रपान.
- एड्स सारखे प्रतिकारक परिस्थिती.
याचे निदान आणि उपचार कसे केले जाते?
दातांची तपासणी आणि इतर रोगांचा वैद्यकीय इतिहास (जसे की मधुमेह) यांच्या आधारावर हिरडयाचे रक्त येण्याचे निदान केले जाते. हिरडयातून रक्त येण्याचे निदान करण्यासाठी विविध तपासणींचा समाविष्ट होतो:
- रक्त तपासणी:
- संपूर्ण रक्त गणना हे शरीरातील संसर्ग ओळखण्यास मदत करते.
- संशोधन अभ्यासानुसार, उच्च कोलेस्टेरॉल ची पातळी आणि सी-रीअॅक्टिव्ह प्रोटीन वाढल्यास सुद्धा हिरडया आणि दातामध्ये रोग देखील दर्शिवले गेले आहेत.
- एक्स-रेः जॉ-बोन एक्स-रे ने हिरडया आणि जबड्याच्या हाडांमध्ये असलेले रोग शोधण्यास मदत होते.
हिरडयातून रक्त येणे याचा उपचार आजाराची तीव्रता थांबवण्यासाठी आणि हिरडया आणि दाताचे नुकसान टाळण्यासाठी केला जातो.
- योग्यरित्या दात घासल्यास आणि दातांची स्वछता असल्यास प्लॅक कमी करण्यास मदत करते.
- अँटीबायोटिक्स औषधें संसर्गपासून दूर करण्यास मदत करतात.
- गरम पाणी आणि हायड्रोजन पेरोक्साईडने तोंड धुतल्यास प्लॅक कमी करण्यास मदत करते.
- स्केलिंग नावाची प्रक्रियाने डेंटिस्ट दातांवर असलेला प्लॅकचा थर काढून टाकतात.
- व्हिटॅमिन सप्लिमेंट्स हे व्हिटॅमिन सी किंवा व्हिटॅमिन के च्या कमतरतेमुळे होणाऱ्या हिरडयातून रक्त थांबवण्यास उपचार म्हणून दिले जाऊ शकतात.
- धूम्रपान आणि तंबाखूचा वापर पूर्णपणे टाळावा.
- डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ॲस्पिरिनसारख्या रक्त पातळ होणारे औषधें घ्यायचे टाळावे.
- नियमित दातांची तपासणी आणि व्यावसायिक स्वरूपात दात स्वच्छ करणे हे दातांची स्वच्छता राखण्यासाठी मदत करते.