बंद गर्भनलिका म्हणजे काय?
गर्भनलिका एक छोट्या ट्युबस ची जोडी आहे जी अंड्यांना अंडाशयातून गर्भाशयात घेऊन जाते. स्त्रियांमध्ये, अंड्याचे गर्भधान गर्भनलिके मध्ये होते. गर्भनलिके मध्ये काही अडथळा आल्यास अंडी ट्युब मध्ये प्रवेश करत नाही किंवा ट्युब मधून गर्भाशयात जात नाही. असे एसटीडी नावाच्या गर्भशयाच्या समस्येमुळे होते आणि एक्टोपिक गर्भधारणा आणि प्रजनन समस्या टाळण्यासाठी यावर उपचार जरुरी आहे.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
वंध्यत्व, मासिक पाळी उशिरा येणे किंवा खूप लवकर संपणे अथवा खूप दिवस चालणे याशिवाय बंद गर्भनलिका इतर कुठलीच चिन्हे किंवा लक्षणे दर्शवत नाही.
याची मुख्य कारणं काय आहेत?
गर्भनलिका बंद होण्याची मुख्य करण आहे ट्युबचा आतील भाग दुखवला जाणे किंवा अस्वाभाविक वाढ होऊन ट्युबमध्ये अडथळा येणे. असे होण्याची कारणे पुढील प्रमाणे आहेत:
- अडथळा.
- युटेरिन फायब्रोइड्स किंवा पॉलीप्स.
- क्लॅमिडिया आणि गोनोरिया सारखे संसर्ग.
- पेल्व्हिक इन्फ्लेमेटरी आजार.
- एन्डोमेट्रिओसिस.
- पूर्वीची एक्टोपिक गर्भधारणा किंवा पोटाची शस्त्रक्रिया ज्यामध्ये गर्भनलिकेचा समावेश होतो.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
बंद गर्भनलिकेचे निदान करण्यासाठी विविध रेडियोलॉजिक किंवा स्कोपींग तंत्रांचा वापर केला जातो जसे की:
- पोट आणि ओटीपोटाचा एक्स-रे.
- हिस्टेरॉसलपिंगोग्राम नावाचा विशेष एक्स-रे.
- ओटीपोटाचा अल्ट्रासाऊंड.
- लॅपरोस्कोपी.
ट्यूबच्या अडथळ्यांना दूर करण्यासाठी उपचार पद्धतींमध्ये खुली किंवा लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रिया समाविष्ट असते. यात खालील तंत्रांचा वापर केला जातो:
- जर अडथळा गर्भाशयाच्या जवळ असेल, तर एक नॉन-सर्जिकल प्रक्रिया केली जाते ज्यात नळीमध्ये छोटी ट्युब (किंवा कॅन्यूला) टाकून ती परत उघडली जाते.
- जर अडथळा जास्त खोल असेल, तर शस्त्रक्रिया करून अडथळा निर्माण झालेला भाग काढण्यात येतो आणि जे भाग व्यवस्थित आहेत ते जोडले जातात.
- हायड्रोसाल्पिन्क्समध्ये (द्रव्य साचल्यामुळे जेव्हा ट्युब ब्लॉक होते), ज्यामुळे द्रव तयार होते त्याचा स्त्रोत काढून टाकतात. गर्भाशयास एक नवीन छिद्र तयार केले जाऊ शकते.
- अंडाशयापासून अंडी उचलण्यासाठी ट्यूबचा दूरचा भाग शस्त्रक्रियेने पुन्हा तयार करता येतो.