ब्लड क्लॉटिंग मुळे होणारे विकार काय आहेत?
ब्लड क्लॉटिंग मुळे होणारे विकार खूप वेळ रक्तस्त्राव झाल्यामुळे किंवा रक्त वाहिन्यांमध्ये रक्त अडकून राहिल्याने उद्भवणारे विकार आहेत. अंतर्गत अवयवांमध्ये किंवा रक्त वाहनांमध्ये रक्तस्त्राव दीर्घ काळ चालत राहिल्यास ती वैद्यकीय इमर्जन्सी असू शकते.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
ब्लड क्लॉटिंग मुळे होणारे विकार दोन प्रकारचे आहेत, रक्तस्त्रावामुळे होणारे विकार आणि क्लॉटिंगमुळे होणारे विकार. प्रत्येक प्रकारचे त्याच्या संबंधित लक्षणे आहेत.
रक्तस्त्राव विकारांची चिन्हे आणि लक्षणे:
- थोडेसे लागल्यावर सहजपणे आणि खूप रक्तस्त्राव होणे.
- जखम सहजतेने वाढत जाणे.
- वारंवार एपिस्टेक्सिस (नाकातून रक्तस्त्राव).
- मासिक पाळीत खूप रक्तस्त्राव होणे.
- लघवी किंवा शौचातून रक्तस्त्राव होणे (काळ्या रंगाची शौच होणे).
- इजा न होता सांध्यातून रक्तस्त्राव होणे.
क्लॉटिंग विकाराची चिन्हे आणि लक्षणे:
क्लॉटिंग विकाराला हायपरकोॲग्युलेबल स्टेट्स देखील म्हटले जाते. यामध्ये, नसांमध्ये ब्लड क्लॉट बनतो आणि हा क्लॉट, दबावामुळे, रक्त प्रवाहात शिरतो. एकदा जर क्लॉट रक्त प्रवाहात शिरला, तर तो लहान रक्तवाहिन्यांमधे किंवा कॅपिलॅरी मध्ये जाऊन अडथळा निर्माण करतो; आणि कुठल्या अवयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्या त्यावर रोगाची लक्षणे अवलंबून असतात.
हायपरकोॲग्युलेबल स्टेट्सची सामान्य लक्षणे अशी आहेत:
- पायावर सूज येणे (पोटऱ्या आणि घोट्यावर).
- खूप वेदना होऊन क्रॅम्प्स येणे (कलौडिकेशन).
- छातीत दुखणे.
- श्वास घेण्यास त्रास होणे.
- श्वासोच्छवास जोरात होणे (अधिक वाचा: धाप लागण्याची कारणं).
- रक्तदाब कमी होणे.
- हार्ट बिट वाढणे.
याची मुख्य कारणं काय आहेत?
ब्लड क्लॉटिंग प्रक्रियेत प्लेटलेट्स, क्लॉटिंग होण्याची घटक, आणि प्रथिने यांचा समावेश असतो; यापैकी कशातही अस्वाभाविक असे काही आठळले तर ते ब्लड क्लॉटिंग चे कारण असू शकते. रक्तस्त्राव विकाराची सामान्य कारणं अशी आहेत:
- आनुवंशिकता - हीमोफिलिया हा सर्वत्र आढळणारा रोग आहे, जो जेनेटिक म्युटेशन मध्ये क्लॉटिंग घटके खराब झाल्यामुळे होतो.
- व्हिटॅमिन के ची कमतरता - आहारात व्हिटॅमिन के ची कमी झाल्यामुळे रक्तस्त्राव होण्याची समस्या येऊ शकते.
- यकृताचे रोग किंवा यकृत काम न करणे - सिर्होसिसस, हेपिटायटीस किंवा फॅटी डीजनरेशन मुळे यकृताचे नुकसान होते ज्यामुळे क्लॉटिंग घटकांची निर्मिती कमी होऊन रक्तस्त्राव विकार होतो.
- औषधी-प्रेरित - ॲस्पिरिन आणि वॉरफरिन सारखे काही औषधे रक्त क्लॉटिंगची प्रक्रिया बदलण्यासाठी ओळखली जातात आणि त्यांचा दीर्घकाळ वापर करण्यामुळे ही समस्या उद्भवू शकते.
हायपरकोॲग्युलेबल स्टेट्सची सामान्य कारणं अशी आहेत:
- कर्करोग.
- किमोथेरपी एजंट्स जसे टॅमोक्सिफेन, थॅलिडोमाइड इ.
- भाजणे, आघात किंवा शस्त्रक्रिया.
- गर्भधारणा.
- लठ्ठपणा.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
सहसा, मेडिकल हिस्टरी आणि काळजीपूर्वक वैद्यकीय तपासणी द्वारे ब्लड क्लॉटिंग विकाराचे निदान केले जाते. तरीही काही विशिष्ट ब्लड टेस्ट्स रोगाचे निदान करण्यात मदत करतात. त्या अशा आहेत:
- संपूर्ण ब्लड काउन्ट- प्लेटलेट लेव्हल जर कमी असेल तर क्लॉटिंगचे विकार होऊ शकतात.
- रक्तस्त्रावाची वेळ आणि क्लॉटिंगची वेळ- रक्तस्त्राव आणि क्लॉटिंगची वेळ शोधल्याने कुठल्या प्रकारची समस्या आहे ते समजते (ही टेस्ट आता करत नाही, कारण आता प्रॉथ्रोम्बीन टाइम आणि पार्शल थ्रोम्प्लास्टाइन टाइम द्वारे हे केले जाते).
- प्रोथ्रोम्बीन टाइम (पीटी) - सामान्यतः, इंटर्नल नॉर्मलईज्ड रेशिओ (आयएनआर) द्वारे पातळी मोजली जाते ज्यामुळे ब्लड क्लॉटिंग ची वेळ शोधता येते.
- ॲक्टिव्हेटेड पार्शल थ्रोम्बोप्लास्टीन टाइम (एपीटीटी) – ब्लड क्लॉटिंगची वेळ शोधण्याही ह टेस्ट सुद्धा उपयोगी ठरते.
- काही इतर विशिष्ट चाचण्यांमध्ये प्रोटीन सी ॲक्टिव्हिटी, प्रोटीन एस ॲक्टिव्हिटी, अँटी-थ्रोम्बीन ॲक्टिव्हिटी इत्यादींचा समावेश होतो.
ब्लड क्लॉटिंग विकाराचे उपचार रोगाच्या कारणांवर अवलंबून असतात. उपचार कारण-आधारित, लक्षणसूचक असू शकते
उपचारांसाठी वापरलेली काही औषधे अशी आहेत:
- अँटी-प्लेटलेट घटक - ॲस्पिरिन आणि क्लॉपिडोग्रेल, जे प्लेटलेट एकत्रीकरण आणि क्लॉटिंग कमी करतात.
- अँटिकोॲग्युलंट्स - वॉरफेरीन, हेपरिन, लो मोलीक्यूलर हेपरिन (एलएमडब्लूएचएच), आणि फोंडापेरिनक्स ही औषधे रक्त गोठणे प्रतिबंध करतात आणि उच्च रक्तदाबावर उपचार करण्यास मदत करतात.
- व्हिटॅमिन के पूरक - व्हिटॅमिन के ची कमतरता असेल, तर व्हिटॅमिन के पूरक मदत करतात.
- ब्लड ट्रान्सफ्युजन किंवा प्लेटलेट ट्रान्सफ्युजन – प्लेटलेटची कमतरता असल्यास, ब्लड प्लेटलेट्स रक्तात सोडून रक्तस्त्राव समस्या कमी करता येते.
- फॅक्टर रिप्लेसमेंट थेरपी – हेमोफिलियाचा उपचार करण्यासाठी उपयुक्त.