हाडांचे दुखणे म्हणजे काय?
हाडांचे दुखणे एक लक्षण आहे जे एक किंवा अधिहाडांमधील वेदना, नाजुकपणा किंवा अस्वस्थता म्हणून दिसून येते. हाडांची वेदना सहसा हात व पायांच्या लांब हाडांवर परिणाम करते. त्याकडे वरचेवर दुर्लक्ष केले तर हे माणसाच्या दिनचर्येत आणि दैनंदिन जीवनात मोठ्या प्रमाणात प्रभाव पाडू शकते.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
हाडांच्या वेदनांची वैशिष्ट्ये अंतर्भूत स्थितीशी संबंधित असतात.
कर्करोगा शी संबंधित हाडांचे दुखणे:
- प्रभावित भागावर सुरवातीला मऊपणा.
- सलग किवा अधूनमधून दुखणे विश्रांती घेत असताना सुद्धा.
ऑस्टियोपोरोसिसशीसंबंधित असणारे हाडाचे दुखणे:
- तीव्र पाठदुखी.
- शारीरिक बदल.
- उंची खुंटणे.
- चालण्याच्या क्षमतेत अशक्तपणा.
- दीर्घकालीन अपंगत्व.
सांधेदुखीशी निगडीत असणारे हाडांचे दुखणे:
- सांध्या च्या हाडांची लवचिकता कमी होणे.
- सांध्यांना सूज येणे.
- कडकपणा आणि विकृती.
- कमी हालचाल आणि कार्यक्षमता.
पेगेट रोगा शी संबंधित लक्षणे:
- पाठीचा कणा, श्रोणि आणि पाय यासारख्या वजन-उचलणार्या हाडांमध्ये वेदना
- हाडांमध्ये मायक्रोफ्रॅक्चर्स (लहान फ्रॅक्चर्स)
- इतर कारणामुळे होणाऱ्या हाडांच्या वेदनेच्या कारणाशी संबंधित अतिरिक्त विशिष्ट लक्षणे असू शकतात.
हाडांच्या वेदनेमागील मुख्य कारणं काय आहेत?
हाडांच्या वेदनेचे सर्वात कॉमन पण कमी स्पष्ट कारण म्हणजे हाडांचा कर्करोग (प्राथमिक कर्करोग). याची इतर काही कारणं पुढील प्रमाणे आहेत:
- ऑस्टियोपोरोसिस.
- संधिवात.
- पेगेट रोग.
- मेटास्टॅटिक कर्करोगाचा प्रसार.
- अयोग्य रक्तपुरवठा (सिकल सेल ॲनिमिया प्रमाणे).
- ऑस्टियोमायलिटिस.
- संसर्ग.
- जखम, दुखापत, अपघातानंतर फ्रॅक्चर.
- ल्युकेमिया.
- अतिवापराने होणारी दुखापत.
- टॉल्डर फ्रॅक्चर (टॉडलरमध्ये उद्भवणारा स्ट्रेस फ्रॅक्चर).
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
अंतर्भूत स्थितीचे निदान करण्यासाठी संपूर्ण वैद्यकीय इतिहासाचे परीक्षण आणि शारीरिक तपासणी आवश्यक आहे.
पुढील चाचण्यांचा सल्ला दिला जाऊ शकतो:
- रक्त तपासणी (जसे की पूर्ण रक्त गणना आणि विभेदक रक्त गणना चाचण्या).
- हाडांचा एक्स-रे.
- सीटी किंवा एमआरआय स्कॅन.
- हार्मोन पातळीचा अभ्यास.
- पिट्यूटरी आणि ॲड्रेनल ग्रंथीची कार्य चाचणी.
- मूत्र विश्लेषण.
हाडांच्या वेदनांचे उपचार हे लक्षणे आणि मूळ रोग या दोघांना संबोधित करतात.हे खालील प्रमाणे आहेत:
- औषधे: दीर्घकालीन विश्रांतीनंतर अँटीबायोटिक्स, अँटी-इंफ्लेमेटरी औषधे, हार्मोनल थेरपी, ॲनल्जेसिक आणि लॅक्सेटिव.
- ऑस्टियोआर्थराइटिससाठी हे अतिरिक्त उपचार उपाय वापरले जाऊ शकतात:
- वेदना-कमी करणारे टॉपिकल क्रीम.
- व्यायाम आणि फिजिकल थेरपी.
- सांध्यात स्प्लिन्ट्स लावणे किंवा पुनर्स्थापन थेरपी.
- ऑस्टियोपोरोसिस आणि संधिवात यांच्या उपचारांमध्ये याचा समावेश असू शकतो:
- ताण निर्माण करणारा, मजबुत करणारा , शारीरिक ठेवण आणि हालचालींवर कार्य करणारा व्यायाम करणे.
- पुनर्वसन.
- पेगेटच्या रोगासाठी अतिरिक्त उपचारांमध्ये हे समाविष्ट आहे:
- हाडांचे रिमॉडलिंग कमी करणारी औषधे.
- काही प्रकरणांमध्ये हाड रीअलाइनमेंट किंवा सांधे बदलण्यासाठी शस्त्रक्रिया आवश्यक असू शकतात.
- हाडांची ताकद राखण्यासाठी शारीरिक व्यायाम करणे ज्याने वजन उचलणारे सांधे स्थिर आणि वेदना मुक्त राहतात.
- हाडांच्या कर्करोगासाठी खालील उपचार असू शकतात:
- शस्त्रक्रिया.
- किमोथेरपी.
- रेडिओथेरेपी.
- इम्यूनोथेरपी.