हळवा रोग (बॉट्युलिझम) काय आहे?
हळवा रोग हे बॉट्युलिनम टॉक्सिनमुळे होते, जे क्लॉस्ट्रिडियम बोट्युलिनम नावाचा जीवाणू बनवतो. क्लॉस्ट्रिडियम बोट्युलिनम हा एक मातीतील जीवाणू आहे जो सर्वव्यापी असून त्याचा नायनाट करणे कठिण आहे. ऑक्सिजनच्या अनुपस्थितीत जीवाणूची वाढ होत असल्याने कॅन मधील खाद्यपदार्थ या जीवाणूसाठी एक प्रभावी प्रजनन म्हणून काम करतात. जेव्हा बोट्युलिझम जीवाणूने एखादा व्यक्ती संसर्गित होतो तेव्हा त्या जीवाणूंमुळे बोट्युलिनम टॉक्सिन त्याच्या शरीरात रिलीझ होते ज्यामुळे पक्षाघात होऊ शकतो. पक्षघात चेहऱ्यापासून सुरु होऊन महत्वाचे अवयव आणि हातापायांवर पसरतो. हे टॉक्सिन श्वसन च्या स्नायूपर्यंत पोचल्यास श्वसनसंस्था निकामी होते. हळवा रोगामुळे पक्षाघात होतो म्हणून ही एक वैद्यकीय इमर्जन्सीची स्थिती असते.
हळवा रोगाचे प्रकार खालीलप्रमाणे आहेत:
- खाद्यपदार्थांचा हळवा रोग बॉट्युलिनम टॉक्सिनने दूषित झालेल्या खाद्यपदार्थ खाण्यामुळे होतो.
- घावाचा हळवा रोग जीवाणू उघड्या जखमे च्या संपर्कांत येऊन घावात टॉक्सिन सोडतात तेव्हा होतो.
- दूषित अन्नाद्वारे जेव्हा जीवाणू बाळाच्या शरीरात जातात तेव्हा बाळाला हळवा रोग होतो.अभर्कांमध्ये हा जीवाणू आणि टॉक्सिन शौचामध्ये देखील आढळतात.
- प्रौढांमध्ये हळवा रोग जीवाणू पाचन तंत्रात पसरल्याने होतो. हा प्रकार क्वचितच आढळतो.
- आयट्रोजेनिक बोट्युलिझम उपचारात्मक वापरानंतर किंवा बॉट्युलिनम टॉक्सिन जास्त प्रमाणात घेतल्यामुळे होतो (बॉटॉक्स).
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
ह्या आजाराचे लक्षणे संसर्ग झाल्यानंतर 6 तास ते 10 दिवासात दिसून येतात. साधारणतः संसर्ग झाल्याच्या 12 ते 36 तासानंतर लहान बाळांमधील आणि खाद्यपदार्थांच्या हळवा रोगाचे लक्षणे दिसून येतात.
खाद्यपदार्थांच्या हळवा रोगाचे लक्षणे पुढील प्रमाणे आहे:
- मळमळणे.
- उलट्या होणे.
- उदरामधील पेटके येणे आणि सोबत बद्धकोष्ठता होणे.
- बोलण्यात/ गिळण्यात त्रास होणे.
- तोंड कोरडे पडणे.
- चेहऱ्याच्या दोन्ही बाजू कमजोर पडणे.
- अस्पष्ट किंवा दुहेरी दिसणे.
- पापण्या उतरलेल्या होणे.
- श्वासोच्छवासाची समस्या.
- संपूर्ण शरीरावर विविध स्नायू गटांचा पक्षाघात.
खाद्यपदार्थांचा, जखमेचा, प्रौढांमधील व आयट्रोजेनिक हळवा रोगाचे लक्षणे जवळजवळ सारखी असतात पण जखमेच्या हळवा रोगाची लक्षणे दिसण्यासाठी 4 दिवस ते 2 आठवडे लागू शकतात. जखमेच्या हळवा रोगामध्ये मेंदूला मेरुदानाशी जोडणाऱ्या तंत्रिकामध्ये पहिल्यांदा लक्षणे दिसतात व नंतर सर्व शरीरात पसरतात.
लहान मुलांच्या हळवा रोगामध्ये बद्धकोष्ठता, आहार घेण्यात अडचण, थकवा, चिडचिडेपणा, लाळ गळणे, पापण्या उतरलेल्या होणे, हळुवार रडणे, डोक्यावर नियंत्रण नसणे व स्नायू नाजूक झाल्यामुळे ढगळ हालचाली ही लक्षणे आढळतात.
त्याचे मुख्य कारणं काय आहेत?
बोट्युलिनम जीवाणूने दूषित झालेले अन्न किंवा दूषित मातीमुळे हळवा रोग होतो.हे जीवाणू आंतड्यांमध्ये बॉट्युलिनम टॉक्सिन सोडतात. जीवाणूचे मुख्य अन्न स्त्रोत योग्य प्रक्रिया न केलेले घरगुती पदार्थ किंवा व्यावसायिकपणे कॅन केलेले पदार्थ आहेत. कमी आम्ल घटक असलेल्या जतन केलेल्या भाज्या जसे बीट, पालक, आळंबी आणि हिरव्या शेंगा, मध्ये हे टॉक्सिन असते. कॅन केलेले ट्यूना मासे, आंबवलेले, स्मोक्ड आणि खारवलेले मासे आणि मांस आणि सॉसेज सारख्या मांसाच्या उत्पादनांमध्ये देखील हे टॉक्सिन असतात.
बोट्युलिनम स्पोर्स उघड्या जखमेमध्ये जातात तेव्हा जखमेचा हळवा रोग होतो. हिरोइन आणि कोकेनमध्ये हे स्पोर्स सहज सापडतात म्हणूनच इंजेक्शनद्वारे अंमली पदार्थ घेणे हे जखमेचा हळवा रोगाचे कॉमन कारण आहे.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
निदान करण्यासाठी, गेल्या काही दिवसात आपण जे खाल्ले त्याविषयी डॉक्टर प्रश्न विचारतात आणि उघड्या जखमेबद्दल आणि जीवाणूंच्या संपर्काबद्दल विचारतात. डॉक्टर अशक्त आवाज, स्नायूचा अशक्तपणा, उतरलेल्या पापण्या किंवा पक्षाघात तपासू शकतात. लहान मुलांसाठी डॉक्टर खाण्याबद्दल, बद्धकोष्ठ आणि सुस्ती संबंधित प्रश्न विचारतील.
डॉक्टर टॉक्सिनची पुष्टी करण्यासाठी रक्त, मल आणि उलटी ह्यांची प्रयोगशाळेत तपासणी करायला सांगतील. रिपोर्ट यायला काही दिवस लागू शकतात, म्हणूनच जर डॉक्टरांना हळवा रोग असल्याचा संशय असेल तर ते ताबडतोब उपचार सुरू करू करतील. काही प्रकरणांमध्ये डॉक्टर विशेष तपासणी करायला लावू शकतात, जसे
- ब्रेन स्कॅन.
- स्पाइनल फ्लुइडची तपासणी.
- तंत्रिका आणि स्नायुंच्या कार्याची तपासणी.
ह्या आजाराच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांना अँटीटॉक्सिन म्हणतात. बॉट्युलिनम टॉक्सिन जीवाणूंपासून अधिक नुकसान होण्यापासून प्रतिबंधित करण्यासाठी हे औषध वापरतात. पण, पहिले झालेले नुकसान अँटीटॉक्सिन बरे करू शकत नाही. खाद्यपदार्थाच्या हळवा रोगामध्ये बरेचदा उलटी किंवा आंत्र हालचालीसाठी औषधं देतात. जखमेच्या हळवा रोगासाठी शस्त्रक्रियेने ऊतक काढून अँटीबायोटिक्स दयावे लागू शकतात.
ह्या जीवाणूच्या टॉक्सिनने जर श्वासोच्छवासाच्या स्नायूंना पक्षाघात झाल्या असल्यास श्वास घ्यायला त्रास होतो आणि टॉक्सिनचा परिणाम कमी होपर्यंत आणि श्वास स्वतः घेता येऊ पर्यंत डॉक्टरांना व्यक्तीला व्हेंटिलेटरवर ठेवावे लागू शकते. संवाद ,गिळणे आणि ह्या रोगामुळे प्रभावित होणाऱ्या इतर कार्यप्रणाली सुधारण्यासाठी थेरपीची आवश्यकता असू शकते. लोकसंख्येच्या 5 ते 10% लोकांचा या विकालामुळे मृत्यू होऊ शकतो.