मेंदुचा कॅन्सर म्हणजे काय?
मेंदूमध्ये पेशींची अनियंत्रित विभागणी झाल्यामुळे अस्वाभाविक वाढ होते आणि मेंदूचा कॅन्सर होतो. मेंदूमधले सर्वच ट्यूमर कॅन्सर मध्ये विकसित होतात असे नाही. मेंदुचा कॅन्सर का दोन प्रकारचा असू शकतो:
- बेनाईन (नॉन-कॅन्सरस)- हा प्रकार कमी श्रेणीचा (I किंवा II) असून, हळूहळू वाढतो आणि उपचारानंतर सहसा परत होत नाही.
- मॅलिग्नन्ट (कॅन्सरस)- हा प्रकार उच्च श्रेणीचा (III किंवा IV) असून, मेंदूमधून सुरु होतो आणि मग शरीरात इतर अवयवांना पसरतो (प्राथमिक) किंवा इतर अवयवांवर सुरु होऊन मेंदू पर्यंत जातो (द्वितीयक).
कॅन्सर कुठे झाला आहे आणि त्याची वाढ कशी आहे यावर मज्जासंस्थे वर होणारा परिणाम अवलंबून असतो.
त्याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
मेंदूच्या कुठल्या भागात कॅन्सर झाला आहे यावर त्याची लक्षणं अवलंबून असतात. मेंदूच्या कॅन्सर ची काही लक्षणे खालील प्रमाणे आहेत:
- डोकेदुखी हे मेंदूच्या ट्यूमर चे पहिले लक्षणं असून, ते सौम्य, तीव्र, सतत होणारे किंवा मधून मधून होणारे असू शकते.
- बोलण्यात अडचण होणे.
- झटके येणे.
- मळमळणे, गुंगी येणे आणि उलटी होणे.
- अशक्तपणा वाढत जाणे किंवा शरीराच्या एका बाजूस अर्धांगवायू होणे.
- मानसिक समस्या जसे शब्द लक्षात ठेवण्यात अडचण येणे.
- तोल जाणे.
- बघण्यात, ऐकण्यात, वास घेण्यात किंवा चव घेण्यात दोष येणे.
याची मुख्य कारणं काय आहेत?
मेंदूच्या कॅन्सर ची कारणं अज्ञात आहेत आणि विशिष्ट अशी नाहीत. तरीही, मेंदूच्या कॅन्सर शी निगडित काही रिस्क फॅक्टर्स असे आहेत:
- वय – मेंदूच्या कॅन्सरचा धोका वयानुसार वाढत जातो.
- खूप जास्त मात्रेत रेडिएशन ची बाधा झाल्यास सुद्धा मेंदूच्या कॅन्सरचा धोका वाढतो.
- लहानपणी जर कॅन्सर झाला असेल तर नंतरच्या आयुष्यात मेंदूचा कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते. प्रौढांमध्ये जर ल्यूकेमिया किंवा नॉन-हॉजकिन लिम्फोमा झाला असेल तर त्यांना सुद्धा मेंदूचा कॅन्सर होण्याचा जास्त धोका असतो.
- कुटुंबात आधी कोणाला मेंदूचा कॅन्सर झाला असणे आणि काही आनुवांशिक घटक देखील मेंदूच्या कॅन्सरचा धोका वाढवतात.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
रुग्णाची मोटर रिफ्लेक्स, स्नायू शक्ती आणि संवेदनांच्या प्रतिक्रिया तपासून डॉक्टर निदान करू शकतात. मेंदू मधील ट्यूमरच्या वाढत्या दबावामुळे ऑप्टिक नर्व फुगू शकते.
एमआरआय आणि सीटी स्कॅन या मेंदूच्या कॅन्सरचे निदान कारणासाठी मुख्य चाचण्या आहेत ज्यामध्ये डोळ्यांची सखोल तपासणी आणि स्लिट-लॅम्प आय तपासणी सारख्या चाचण्या केल्या जातात.
काही इतर चाचण्या अशा:
- मॅग्नेटिक रेसोनन्स स्पेक्ट्रोस्कोपी.
- पीईटी स्कॅन.
- सिंगल-फोटॉन एमिशन सीटी (स्पेक्ट) स्कॅन.
- लंबर पंक्चर.
ट्यूमरचे श्रेणीकरण त्याच्या वाढीच्या प्रमाणावर अवलंबून आहे. हे ट्यूमरचा आकार आणि शरीरात किती पसरलेले आहे हे दर्शवते.
- ग्रेड I आणि II मंद गतीने वाढतात.
- ग्रेड III आणि IV वेगाने वाढतात.
श्रेणीकराणाच्या आधारावर, ट्यूमर चे उपचार केले जातात:
- स्टिरॉइड्स- ट्यूमर च्या भोवतीची जळजळ कमी करण्यासाठी.
- शस्त्रक्रिया - ट्यूमर काढून टाकण्यासाठी.
- रेडिओथेरपी - उरलेल्या असाधारण पेशींवर उपचार करण्यासाठी.
- केमोथेरपी- असाधारण पेशी मारण्यासाठी औषधोपचार.
नॉनसेन्सरस ट्यूमरचा यशस्वीपणे उपचार केला जातो आणि रुग्ण सुधारण्याचा दरही चांगला असतो. सहसा, लहान वयातील रुग्ण लवकर बरे होतात.
मेंदूचा कॅन्सर दुर्मिळ असल्याने, सर्व्हायव्हल रेट वर्तवणे कठीण आहे. रोगाचे निदान झाल्यावर, सुमारे १५% रुग्ण ५ वर्षे किंवा अधिक काळ जगतात.