सारांश
वैश्विकरीत्या, महिलांना ग्रासणारे सर्वांत सामान्य प्रकारचे कर्करोग म्हणजे स्तनांचे कर्करोग. याचे सर्वांत सामान्य लक्षण म्हणजे स्तनामध्ये ढेकूळ निर्माण होणें. तथापी, स्तनाचा कर्करोग असलेल्या प्रत्येक स्त्रीच्या स्तनात ढेकूळ निर्माण होत नाही. स्तनाच्या कर्करोगाची इतर लक्षणे म्हणजे स्तनाच्या त्वचेची पापुद्रे निघणें, स्तनाग्रातून तरळ पदार्थ वाहणें, आणि गळ्यात व काखेत ढेकूळ होणें. वैद्यकीय व तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे, स्तनाच्या कर्करोगाचे लवकर निदान होण्याकरिता खूप नाविन्यपूर्ण निदानकारक उपकरणे उपलब्ध आहेत. स्तनाच्या कर्करोगाची चार प्रगतीची चरणे असतात, म्हणून आजाराचे वेळीच निदान योग्य उपचार सुलभ करून, वाचण्याची शक्यता वाढवते. निदानकारक पद्धतींमध्ये मॅमोग्राफीद्वारे स्तनांची छाननी, मॅग्नेटिक रिसॉनॅंस इमेजिंग( एमआरआय) स्कॅन आणि स्तनांमध्ये असलेली द्रव्ये व तंतूची चाचणी सामील असते. जैव तंत्रज्ञानातील नवीन संशोधनांमुळे स्तनाच्या कर्करोगासाठी जनुकीय दोषांना जवाबदार ठरवलेले आहे. प्रोटीन मार्करवरील अभ्यासांनी स्तनाच्या कर्करोगासाठी योग्य उपचाराची दिशा ठरवणें सोपे करून टाकले आहे .
या रोगाचे उपचार पारंपरिक कीमोथेरपी, प्रकाश विकिरण पद्धत आणि हार्मोन थेरपीपासून नाविन्यपूर्ण नॅनो तंत्रज्ञानआधारित पद्धतींद्वारे केले जात आहे. स्तनाचे कर्करोग नियमित व्यायाम, वजनवाढीवर नियंत्रण आणि जन्मापासून कमीत कमी सहा महिने बाळाला स्तनपान करवून टाळले जाऊ शकते. तथापी, स्तनाच्या कर्करोगाचे कुटुंबात पूर्वापार इतिहास असल्याने पुढील पिढींमध्ये त्याचा धोका वाढतो. म्हणून, अशा वेळी, नियमित आरोग्य चाचणी स्तनाच्या कर्करोगाच्या निदानासाठी मदतीची असू शकते. कर्करोगमय तंतूंनी शरिराच्या सामान्य तंतूंमध्ये अतिक्रमण केल्यास गुंतागुंती होतात उदा. शेजारील तंतूंवरील दबावामुळे वेदना होणें, शेजारील रक्तवाहिन्यांमध्ये अडसर होणें इ. तथापी, अधिकतर गुंतागुंती स्तनाच्या कर्करोगावरील उपचाराच्या प्रतिकूल प्रभावांमुळे होतात उदा. केसगळती, उलटी, पांढर्र्या रक्तपेशींच्या संख्येत घट इ. वेळीच निदान आणि योग्य उपचार या घातक आजारातील वाचण्याचे दर वाढण्याची कुंजी आहे. विकिरण, औषधांद्वारे कीमोथेरपी आणि शस्त्रक्रिया उपचाराच्या अजूनही तीन सर्वांत प्रचलित पद्धती आहे, ज्या कर्करोगाच्या पसाराची तीव्रता व प्रमाणावर अवलंबून आहे.