डोळ्यांची जळजळ म्हणजे काय?
डोळ्यामध्ये खाज, दंशाच्या वेदना किंवा ज्वलन अशी डोळ्यांची जळजळ अनुभवली जाते. यासोबत बरेचदा डोळ्यातून पाण्याच्या स्त्राव पण होतो. ब्लेफेराइटिस, डोळ्याचा कोरडेपणा, डोळे येणे आणि डोळ्यांची ॲलर्जी हे काही डोळ्यांची जळजळ होण्याची कारणं आहेत.
याची मुख्य संबंधित चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
डोळ्यांची जळजळ यासोबत दिसणारी सामान्य लक्षणे खालीलप्रमाणे आहेत:
- डोळ्यांमधून स्त्राव.
- ओलसर डोळे.
- वेदनेसोबत डोळ्यांचा लालसरपणा.
खालील आजारांवर अवलंबून विशिष्ट लक्षणे:
- ब्लेफराइटिस: ही पापणीला येणारी सूज आहे ज्यामध्ये पापणीच्या केसांचा तळ तेलकट होतो, आणि रांजणवाडी (पापणीच्या कडेला लाल, सुजलेले टेंगूळ बनणे) सोबत कोंड्यासारखे फ्लेक्स दिसतात.
- कोरडे डोळे: हे डोळ्यातील दंश आणि ज्वलन संवेदना; डोळ्यातील लालसरपणा; डोळ्यामध्ये किंवा डोळ्याच्या भोवती म्युकसच्या लेअरची निर्मिती; डोळ्यामध्ये काहीतरी अडकल्याची संवेदनायाने ओळखले जाते.
- डोळ्याची अॅलर्जी किंवा कन्ज्क्टीव्हायटीस: डोळ्याच्या आतील पदराचीॲलर्जी किंवा सूज यामुळे डोळे खूप सुजतात आणि डोळे खाजवतात; अश्रूंनी भरलेले असतात, नाक भरलेले वाटते; शिंका येतात.
डोळ्यांची जळजळ याची मुख्य कारणं काय आहेत?
डोळ्यांची जळजळ याची सामान्य कारणं ही आहेत:
- बॅक्टेरियल इन्फेक्शन.
- अश्रू ग्रंथी आणि नलिकांचे कार्यात अडचण.
- धूळ, परागकण यासारखे ज्वलनशील पदार्थ डोळ्यात प्रवेश करू शकतात आणि त्यामुळे ॲलर्जी होऊ शकते.
- अल्ट्राव्हायलेट लाइटच्या ओव्हरएक्सपोझर शी संबंधित सनबर्न.
डोळ्यांची जळजळ याची असामान्य कारणे याप्रमाणे आहेत:
- धूर, वारा किंवा खूप कोरड्या वातावरणाशी संपर्क.
- काॅन्टॅक्ट लेन्स चा खूप काळ वापर.
- संधिवात, थायरॉईड डिसऑर्डर आणि लूपस.
- झोपेच्या गोळ्या किंवा हार्टबर्न च्या गोळ्या यासारखी काही औषधे.
याचे निदान व उपचार कसे केले जातात?
डोळ्यांची जळजळ याचे उपचार करण्यासाठी मूळभूत रोगाचे निदान करणे महत्त्वपूर्ण आहे. विशेषतः काही ॲलर्जन्स किंवा डोळ्यात सलणे, संसर्गजन्य एजंट्स यांची बाधा याचा डाॅक्टर संपूर्ण वैद्यकीय इतिहास घेतात.
सूज आणि लालसरपणाचे परिक्षण करण्यासाठी स्लिट मायक्रोस्कोप च्या मदतीसोबत शारीरिक तपासणी केली जाते. अश्रूंचा प्रवाह आणि अश्रूंचे सातत्य याची सुद्धा तपासणी केली जाते.
मुलभूत परिस्थितीवर अवलंबून डोळ्यांची जळजळ याचे उपचार खालीलप्रमाणे आहेत:
- संसर्ग झाल्यास ॲन्टीबायोटीक्स.
- कृत्रिम अश्रू किंवा डिकन्जेसंट आय ड्राॅप्स आणि तीव्र आणि सुजलेल्या डोळ्यांना आराम देण्यासाठी उबदार काॅम्प्रेस.
- ॲलर्जीच्या असल्यास, विशिष्ट ॲलर्जन पासून लांब राहण्याचा सल्ला डाॅक्टर देतात.
स्वतःची काळजी घ्यायला खालील गोष्टी करू शकता:
- चांगली स्वच्छता राखणे हे सर्वात जास्त महत्वाचे आहे.
- तुमच्या पापण्या, केस आणि टाळू धुण्यासाठी ॲन्टीबायोटीक स्प्रे किंवा शॅम्पू, बाळाचे शॅम्पू वापरू शकता.
- सनबर्न च्या बाबतीत सूर्यप्रकाशाच्या उघडकीस येणे टाळण्यासाठी सनग्लासेस चा वापर.
- धूळ किंवा काही इतर इरिटंट्स च्या संपर्कात आल्यासॲलर्जन काढून टाकण्यासाठी सलाइन आय ड्राॅप्स अत्यावशक आहे.
- भरपूर पाणी पिणे आणि पूरक माश्याचे तेल घेणे डोळे ओलसर ठेवण्यास मदत करतात.