कार्डिअॅक अरेस्ट म्हणजे काय?
कार्डिअॅक अरेस्ट म्हणजे हृदयाच्या कार्याची अचानक होणारी हानी, ज्यामुळे शुद्ध हरपते आणि श्वास घेण्यात त्रास होतो. जेव्हा हृदयाचे पंपिंग थांबते, आणि शरीराच्या उर्वरित भागात रक्तप्रवाह होत नाही तेव्हा कार्डिअॅक अरेस्ट होतो.
बरेच लोक कार्डिअॅक अरेस्ट आणि हृदय विकाराचा झटका यात गोंधळतात; जेव्हा हृदयाच्या स्नायुंना रक्तप्रवाह होत नाही तेव्हा हृदयविकाराचा झटका येतो. हृदय विकाराचा झटका हा कार्डिअॅक अरेस्ट आणू शकतो, पण त्यास कार्डिअॅक अरेस्ट म्हणणे चुकीचे आहे. कार्डिअॅक अरेस्टचा लगेच उपचार केला नाही तर कार्डिअॅक मृत्यू होऊ शकते.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
कार्डिअॅक अरेस्टची लक्षणे अत्यंत स्पष्ट आणि चिंताजनक आहेत:
- श्वास घेता न येणे.
- नाडीचा ठोका न मिळणे.
- अचानक पडणे.
- त्वरित शुद्ध हरपणे.
- त्वचा फिकट आणि थंड पडणे.
कार्डिअॅक अरेस्टची मुख्य कारणं काय आहेत?
एरिथिमिया किंवा हृदयाच्या ठोक्यात विकृती आल्यास हृदयाची विद्युत प्रणाली ट्रिगर होते ज्यामुळे कार्डिअॅक अरेस्ट होतो. जेव्हा हृदयास विद्युत प्रवाह वाहुन नेणाऱ्या नोड्स (गाठीं)मध्ये अडथळा येतो तेव्हा एरिथिमिया होतो. काही लोकांच्या बाबतीत, हे काही क्षणांपुरते असून ते हानीकारक नसते. पण जेव्हा हे स्पष्टपणे दिसते तेव्हा जीवघेणा कार्डिअॅक अरेस्ट होऊ शकतो.
एरिथिमियाचा सर्वात कॉमन प्रकार म्हणजे व्हेंटिक्युलर फायब्रिलेशन, म्हणजे जेव्हा इम्पलसेस वेगवान होतात आणि व्हेंट्रिकल रक्त पंप करण्याऐवजी थरथरतात.
सहसा शरीर आणि हृदय निरोगी असेल तर कार्डिअॅक अरेस्ट होत नाही. हे एखाद्या बाह्य कारणातून उद्भवू शकते जसे की शॉक, ड्रग्सचा वापर, आघात किंवा आधीपासून अस्तित्वात असलेले हृदयाचे विकार.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
डॉक्टरांना कार्डिअॅक अरेस्टची मुख्य कारणं माहीत करून घेणे अत्यावश्यक असते. यासाठी पुढील चाचण्या केल्या जातात:
- हृदयाची क्रिया, असामान्यता आणि हृदयतालाची पद्धत यांचे परीक्षण करण्यासाठी ईसीजी.
- खनिजे, रसायने आणि हार्मोनची लेव्हल निर्धारित करण्यासाठी रक्त चाचण्या.
हृदयाचा आकार, विस्तार आणि आरोग्य आणि नुकसान तपासणीसाठी इमेजिंग चाचण्या केल्या जातात. त्या अशा:
- पंपिंग क्षमता आणि व्हॉल्व मधील असमान्यता तपासण्यासाठी ध्वनीलहरींचा वापर करून इकोकार्डियोग्राम.
- रक्तप्रवाहासाठी न्यूक्लियर स्कॅन.
- हृदयाचे स्वास्थ्य आणि हृदय बंद झाले आहे का हे तपासण्यासाठी एक्स-रे.
एरिथिमिया चे कारण, अडथळे आणि हृदयाचे सामर्थ्य तासपसण्यासाठी अँजिओग्राम, इलेक्ट्रोफिजियोलॉजिकल मॅपिंग आणि चाचणी आणि इजेक्शन फ्रॅक्शन चाचणी यासारख्या इतर चाचण्या मदत करतात.
उपचार 2 प्रकारचे आहे:
त्वरित उपचार जे रुग्णाचा जीव वाचवून त्याला सुरक्षित ठेवण्यासाठी जागेवरच केले पाहिजे.
- संपूर्ण शरीरात ऑक्सिजनचा प्रवाह कायम ठेवण्यासाठी पहिल्या काही मिनिटांमध्ये सीपीआर अत्यावश्यक आहे आणि जो पर्यंत रुग्णाला उपचार मिळत नाही तोपर्यंत दिला गेला पाहिजे.
- विद्युतीय शॉकद्वारे डिफायब्रिलेशन दिले जाते जे हृदयाचे ठोके पूर्ववत करण्यात मदत करते.
पुनरावृत्ती टाळण्यासाठी आणि हृदय निरोगी ठेवण्यासाठी काही उपचार चालू ठेवले जातात. त्यात काही प्रोसिजर्स आणि औषधोपचार असतात.
- एरिथिमियासाठी औषधे - त्याला बीटा ब्लॉकर्स म्हणतात.
- आयसीडी-(इम्प्लान्टेबल कार्डियाक डिफायब्रिलेटर) - हृदयाच्या ठोक्यांचे परीक्षण करण्यासाठी बॅटरीवर चालणारे एक यंत्र कॉलरबोनमध्ये बसवले जाऊ शकते, यामुळे जर एरिथिमिया आढळला तर लगेच शॉक वेव्ज पाठवून ठोके काबूत आणले जातात.
- अडथळे उघडून हृदयाच्या स्नायुंना रक्तपुरवठा करण्यासाठी अँजिओप्लास्टी किंवा कोरोनरी बायपास.
- हृदय किंवा व्हॉल्व मधील विकृती सुधारण्यासाठी आणि दीर्घकालीन जोखीम कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया.