सेरेब्रल पाल्सी - Cerebral Palsy in Marathi

Dr. Nabi Darya Vali (AIIMS)MBBS

November 29, 2018

March 06, 2020

सेरेब्रल पाल्सी
सेरेब्रल पाल्सी

सेरेब्रल पाल्सी काय आहे?

सेरेब्रल पाल्सी (सीपी-CP) एक अप्रगतिशील न्यूरोलॉजिकल समस्या आहे ज्यामुळे मुलांमधील विकसनशील मेंदूला दुखापत किंवा विकृती निर्माण होते. बालपणातील गंभीर अपंगत्वाचे हे एक सामान्य कारण आहे. हे प्रामुख्याने हालचाल आणि स्नायू समन्वयाच्या समस्येचे कारण बनते. भारतातील सीपीची (CP) अनुमानित घटना 1000 जन्मामागे 3 आहे.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

जन्मापासून ते 5 वर्षे वयापर्यंत ज्या माइलस्टोन्स पर्यंत पोहोचायला हवे, जसे लोळणे, बसणे आणि चालणे यासारख्या क्रियांचा सीपी (CP) मधे विलंब होऊ शकतो. मुलींपेक्षा मुलांमधे आणि गोऱ्या लोकांपेक्षा क्रूष्ण वर्णाच्या लोकांमधे ही समस्या अधिक सामान्य आहे. वयानुसार खालील लक्षणे दिसून येतात:

3 ते 6 महिने:

  • बाळाला पलंगावरून उचलताना त्याचे डोके मागे पडणे.
  • शरीरात एकूणच ताठरता.
  • कमी झालेली स्नायूची शक्ती.
  • अधिक वाढलेली पाठ आणि मान.

6 महिन्यांहून मोठेः

  • पलटी न मारता येणे.
  • हात एकत्र आणण्यात अपयश.
  • हात तोंडापर्यंत आणण्यात अडचण.

10 महिन्यांपेक्षा मोठे:

  • एका बाजूपेक्षा दुसऱ्या बाजूकडे रांगण्यासाठी प्राधान्य.
  • आधाराशिवाय उभे राहण्यास असमर्थता.

याची मुख्य कारणं काय आहेत?

हे मेंदू निर्माण होण्याच्या टप्प्यात त्याला झालेल्या कोणत्याही  दुखापती किंवा असमानतेमुळे झालेल्या नुकसानीमुळे होते.
हे स्नायूची शक्ती, प्रतिक्षिप्त क्रिया, शरीराची मुद्रा, समन्वय, हालचाल आणि स्नायू नियंत्रण यांना प्रभावित करते.

मेंदूच्या विकासासंबंधी समस्यांसाठी कारणीभूत असणारे इतर घटकांमध्ये हे समाविष्ट आहे:

  • म्युटेशन: आनुवंशिक असामान्यतामुळे विकृत मस्तिष्क विकास होऊ शकतो.
  • आईकडून संसर्ग: रुबेलासारखे संसर्ग गर्भधारणे दरम्यान बाळाच्या विकासाला प्रभावित करू शकतात.
  • फिटल स्ट्रोक: बाळाच्या मेंदूला विस्कळीत रक्त प्रवाह मेंदू कार्ये कमजोर करू शकतो.
  • अर्भकांमध्ये संसर्ग: सेरेब्रल क्षेत्रांवर प्रभाव पाडणारी दाहक प्रतिक्रिया.
  • डोक्याला वेदनादायक दुखापत: वाहन दुर्घटनेने मेंदूचे गंभीर नुकसान होऊ शकते.
  • ऑक्सिजन ची कमतरता: कठीण प्रसूती दरम्यान ऑक्सिजन ची कमतरता.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

डॉक्टर चिन्हे किंवा लक्षणांवरून मुलांचे मूल्यांकन करतात आणि शारीरिक तपासणी करतात. मुलाला बालरोग न्यूरोलॉजिस्टचा सल्ला घ्यायला सांगितले जाऊ शकते.

खालील विविध चाचण्यांचा सल्ला दिला जाऊ शकतो:

मेंदूचा स्कॅन :

  • मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग (एमआरआय-MRI): मेंदूतील कोणत्याही विकृती किंवा असामान्यता ओळखण्यासाठी वापरले जाते.
  • क्रेनियल अल्ट्रासाऊंड: मेंदूचे प्रारंभिक मूल्यांकन; ते द्रुत आणि स्वस्त आहे.
  • इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राम (ईईजी): मिरगीचा तपास करणे.

यासाठी इतर चाचण्याः

  • दृष्टी समस्या.
  • ऐकण्यात कमीपणा.
  • बोलण्यात अडथडा.
  • बौद्धिक विकलांगता.
  • हालचाली संबंधी विकार.

सीपी (CP) च्या उपचारामधे मुलाच्या अपंगत्वानुसार आरोग्यसेवक व्यवसायिकांद्वारे दीर्घकालीन वैद्यकीय काळजी घेण्याचा समावेश होतो. औषधे प्रामुख्याने मोटर अपंगता, वेदना व्यवस्थापन आणि पृथक आणि सामान्यीकृत स्पास्टीटी-संबंधित लक्षणांच्या उपचारावर लक्ष करतात.

मुलांच्या जीवनाच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी गैर-औषधी उपायांमधे यांचा समावेश होतो:

  • फिजियोथेरपी: स्नायूची शक्ती आणि लवचिकता वाढविण्यासाठी ब्रेसेस(दंडपट्टीका) किंवा स्प्लिंट्सची शिफारस केली जाऊ शकते.
  • व्यावसायिक उपचार: मुलाच्या सहभागाची क्षमता सुधारण्यासाठी आणि क्रिया स्वतंत्रपणे करण्यासाठी.
  • भाषण आणि भाषा चिकित्सा: भाषा किंवा सांकेतिक भाषेचा वापर करून समजणे आणि संभाषण करणे.
  • मनोरंजक थेरपी: बाह्य क्रियांमधे सहभागी होण्यासाठी.
  • पोषण आणि आहार चिकित्सा: भरविण्यासंबंधी अडचणींना सामोरे जाणे आणि पुरेसे पोषण सुनिश्चित करणे.

स्व-काळजी टिप्समध्ये हे समाविष्ट आहे:

  • बहुतांश घटनांमध्ये, सीपी(CP) ला थांबवू शकत नाही, पण प्रसूतिपूर्व काळजी, सुरक्षित प्रसूती आणि अपघात टाळल्याने सीपी(CP) ची जोखीम कमी होऊ शकते.
  • प्रवास करतांना लहान मुलांना डोक्याच्या दुखापतींपासून वाचवण्यासाठी हेल्मेट आणि संरक्षित सीट बेल्टचा वापर करावा.
  • मुलाच्या हालचालींचे दैनंदिन परीक्षण करावे.

पालक / काळजीघेण्याऱ्यांनी मुलांची स्थिती सुधारण्यासाठी आणि मुलाच्या गरजेनुसार उपचार योजना समायोजित करण्यासाठी वैद्यकीय टीम सोबत सहकार्य करुन  काम करणू हे अत्यंत महत्त्वाचे आहे. दीर्घकालीन भावनिक आधार आणि काळजी ही मुलाच्या संपूर्ण स्वास्थ्य आणि कल्याणासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.



संदर्भ

  1. Apexa G. Vyas et al. Etiopathological study on cerebral palsy and its management by Shashtika Shali Pinda Sweda and Samvardhana Ghrita. Ayu. 2013 Jan-Mar; 34(1): 56–62. PMID: 24049406
  2. Cerebral Palsy Alliance. Facts about cerebral palsy. Australia; [Internet]
  3. Indian Institute of Cerebral Palsy. .What is Cerebral Palsy?. Kolkata; [Internet]
  4. U.S. Department of Health & Human Services. 11 Things to Know about Cerebral Palsy. Centre for Disease Control and Prevention
  5. : M. Wade Shrader et al. Cerebral Palsy. The Nemours Foundation. [Internet]