सरव्हायकल कॅन्सर काय आहे?
सरव्हायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशयात, गर्भाशयाचा खालचा भाग किंवा उदर यांमध्ये पेशींची असामान्य वाढ. बहुतेक कर्करोग स्क्वॅमस सेल प्रकारचे असतात, तर एडेनोकार्सीनोमा हा त्यानंतरचा सर्वात सामान्य विकार आहे. जगामधे महिलांमध्ये आढळणारा सरव्हायकल कॅन्सर हा सर्वात सामान्य विकार आहे. भारतात 6-29% महिलांना ह्या कर्करोगाची बाधा होते.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
आरंभिक अवस्थांमध्ये गर्भाशयाच्या कर्करोगाची लक्षणे लक्षात येत नाही. गर्भाशयाचा कर्करोग जसजसा वाढत जातो, तशी त्याची लक्षणं स्पष्ट होत जातात. त्याची लक्षणं पुढील प्रमाणे आहेत:
- पाळी दरम्यान किंवा लैंगिक संभोगानंतर अनियमित किंवा असामान्य योनी रक्तस्त्राव.
- पाठीच्या खाली वेदना किंवा पायात वेदना.
- थकवा.
- वजन कमी होणे.
- भूक कमी होणे.
- दुर्गंधी स्त्राव किंवा योनि अस्वस्थता (अधिक वाचा: योनी दुर्गंध).
- दोन्ही पायांना सूज.
याची मुख्य कारणं काय आहेत?
गर्भाशयाच्या कर्करोग बहुतेक प्रकरणात ह्यूमन पॅपिलोमाव्हायरस (एचपीव्ही-HPV) चा संसर्ग झाल्यामुळे होतो जो योनि, तोंडी किंवा गुदव्दार संभोगाद्वारे एखाद्या व्यक्तीतून दुस-या व्यक्तीत पसरू शकतो. काही इतर घटक जे कर्करोगाचे प्रमाण वाढवू शकतात ती अशी आहेत :
- धूम्रपान.
- प्रतिकारशक्ती कमी होणे.
- 5 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त काळासाठी गर्भनिरोधक (जन्म नियंत्रण) गोळ्यांचा वापर.
- 3 मुलांपेक्षा जास्त मुले असणे.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
याची कोणतीही प्रारंभिक चिन्हे किंवा लक्षणे नाहीत; पण, नियमित तपासणी गर्भाशयाच्या कर्करोगाचा शोध घेण्यात मदत करू शकते. 30 आणि 49 वर्षाच्या दरम्यानच्या स्त्रियांना वार्षिक स्क्रीनिंगची शिफारस केली जाते. निदान पद्धतींमध्ये खालील समाविष्ट आहे:
- शारीरिक तपासणी आणि वैद्यकीय इतिहास: रुग्णाचा सामान्य इतिहास आणि चाचणी.
- पेल्विक चाचणी: संसर्गाची किंवा रोगाची लक्षणे तपासण्यासाठी योनीची आणि गर्भाशयाची तपासणी करणे.
- पॅप तपासणी: कोणताही रोगाचा, कर्करोग किंवा संसर्गा ची शक्यता तापासण्याकरिता गर्भाशयातून पेशी एकत्रित करणे.
एचपीव्ही (HPV) चाचणीः एचपीव्ही चाचणी, पेशींची सूक्ष्म तपासणी आणि ॲसिटिक ॲसिडने व्हिज्युअल तपासणी.
- एंडोसरव्हाईकल क्युरिटेज: एंडोसरव्हाईकल पोकळीमध्ये कर्करोगाचे लक्षण ओळखणे.
- कॉल्पोस्कोपी: योनि आणि गर्भाशयाच्या भागात असमान्यता तपासण्यासाठी.
- बायोप्सी: कर्करोगाची लक्षणं तपासण्यासाठी गर्भाशयातील टिश्यूंची तपासणी करणे.
उपचार पद्धतींमध्ये खालील समाविष्ट आहे:
कर्करोगाच्या तीव्रतेवर आधारीत, डॉक्टर मोनोथेरपी किंवा कॉम्बिनेशन थेरपी सुचवू शकतात.
मानक उपचारांमध्ये खालील समाविष्ट आहे:
-
शस्त्रक्रिया:
- कोनीसेशन: गर्भाशयातील एक शंकुधारी ऊतक काढून घेतला जातो.
- टोटल हिस्टरेक्टोमीः शस्त्रक्रियेद्वारे संपूर्ण गर्भाशय काढल्या जाते.
- रेडिएशन थेरपी: कर्करोगाच्या पेशी मारण्यासाठी उच्च-ऊर्जा किरणांचा वापर
- किमोथेरपी: कर्करोगाच्या पेशी थांबविण्यासाठी किंवा मारण्यासाठी वापरली जाणारी औषधे.
- टार्गेटेड थेरपी: कर्करोगाच्या पेशी ओळखर्या आणि त्यांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या मोनोक्लोनल अँटीबॉडीजचा वापर.
9-26 वर्ष वयोगटातील मुलींसाठी एचपीव्ही (HPV) (रीकॉम्बीनंट लसी) लसीकरण करण्याची शिफारस केली जाते कारण ही लस लायसन्सस्ड, सुरक्षित आणि प्रभावी आहेत. कर्करोगाचे प्रसरण होण्यासाठी बरीच वर्षे लागतात, ते याद्वारे प्रतिबंधित केले जाऊ शकते.
स्वतःच्या-काळजी घ्यायच्या टिप्स अशा आहेत:
- गर्भाशयात झालेल्या नैसर्गिक बदलांचे निरीक्षण करण्यासाठी आरसा आणि फ्लॅशलाइटचा वापर करून स्वत: च तपासा.
- गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी कॉंडोमसारख्या नॉन-ड्रग गर्भनिरोधक पद्धतींचा वापर करा.
- एचपीव्ही संसर्ग टाळण्यासाठी एकापेक्षा जास्त भागीदारांसोबत लैंगिक संबंध टाळा.
- कोणताही सहकारी संसर्ग टाळण्यासाठी आरोग्यास पोषक असे वातावरण ठेवा
- रोगाची स्थिती माहित करून घेण्यासाठी नियमित पाठपुरावा करा.निदान झाल्यानंतर सुरुवातीच्या 2 वर्षांसाठी 2-3 महिन्यांनी सतत तपासणी करावी.
गर्भाशयाचा कर्करोग सामाजिक कलंक मानला जाऊ नये आणि कर्करोगाची स्क्रीनिंग आणि लवकर निदानासाठी स्त्री रोग विशेषज्ञाला सर्व माहिती देणे आवश्यक आहे. सकारात्मक दृष्टिकोन आणि नियमित तपासणीने गर्भाशयाचा कर्करोग प्रतिबंधित केला जाऊ शकतो.