गर्भाशय ग्रीवाशोथ काय आहे?
महिलांमध्ये, गर्भपिशवीचे तोंड, जे योनीत उघडते त्याला गर्भाशय ग्रीवा म्हणतात. जेव्हा गर्भाशय ग्रीवामध्ये सूज येते तेव्हा त्याला गर्भाशय ग्रीवाशोथ असे म्हणतात. याची अनेक कारणे आहेत आणि लक्षणे स्त्रियांनुसार वेगवेगळी असतात.
गर्भाशय ग्रीवाशोथ संसर्गित किंवा असंसर्गित असू शकतो आणि त्याचे उपचार कारणांवर अवलंबून असतात.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
गर्भाशय ग्रीवाशोथ ची सामान्य चिन्हे आणि लक्षणे खालील प्रमाणे आहेत:
- जर युरेथ्राला त्रास झाला असेल तर महिलांना लघवी दरम्यान वेदना किंवा जळजळ होऊ शकते.
- योनीत खाज किंवा योनीतुन रक्तस्त्राव होऊ शकतो, विशेषतः संभोगानंतर किंवा मासिकपाळी दरम्यान. (अधिक वाचा: सुरक्षित संभोग पद्धती).
- कधीकधी तापासोबत पोटात वेदना देखील होऊ शकतात
- गर्भाशय ग्रीवाशोथमधे काही स्त्रियांमध्ये कुठलीही लक्षणं दिसत नाही.
याची मुख्य कारणं काय आहेत ?
- अनेकदा, लैंगिक संबधातून पसरणाऱ्या आजारामुळे गर्भाशयात सूज येते. या लैंगिक संबधातून पसरणाऱ्या आजारात समाविष्ट आहे-
- असंसर्गजन्य कारणांमधे लेटेक ॲलर्जी आणि डचिंगचा असू शकतात, या दोन्हीमध्ये सूज येते.
- बॅक्टरीयल व्हजायनोसिस हा योनीचा जीवाणूजन्य संसर्ग आहे आणि गर्भाशय ग्रीवाशोथला देखील कारणीभूत ठरू शकतो.
- कर्करोगा साठी विकिरण उपचार घेणाऱ्या स्त्रियांना कधीकधी गर्भाशयात सूज येऊ शकते.
याचे उपचार आणि निदान कसे केले जातात ?
या परिस्थितीचे निदान खालील पद्धतींनी केले जाऊ शकते:
- जर डॉक्टरांना गर्भाशय ग्रीवाशोथचा संशय आला तर ते पेल्विक ची चाचणी करू शकतात. रुग्णाचा लैंगिक इतिहास माहित असणे सुद्धा उपचार करण्यात महत्वपूर्ण ठरते.
- संसर्ग तपासण्यासाठी गर्भाशय द्रवाचे कल्चर सूक्ष्मदर्शकाद्वारे केले जाते.
- रक्त तपासणी संसर्ग ओळखण्यात मदत करते. जर संसर्ग असला तर,रक्त तपासणीत पांढऱ्या रक्त पेशीत (डब्ल्यूबीसी-WBC) सामान्यतः वाढ झाल्याचे आढळते.
गर्भाशय ग्रीवाशोथच्या उपचारांमध्ये खालील समाविष्ट आहे:
- जर सूज एखाद्या संसर्गामुळे होत असेल तर ॲन्टीबायोटिक्स निर्धारित केले जातात.
- संभोगापासून दूर राहणे आणि एसटीडी (STDs) साठी आपल्या पार्टनरची तपासणी करणे देखील महत्वाचे आहे.
- जर गर्भाशय ग्रीवाशोथ ॲलर्जी झाल्याने होत असेल, तर ॲलर्जी एजंटवर उपचार केलेत तर त्याला इतर उपचारांची आवश्यकता नसते.
- गर्भाशय ग्रीवेला सूजण्या पासून वाचवण्यासाठी, योनी क्षेत्रात मजबूत रसायनांचा वापर टाळावा,योनी पाण्याने स्वच्छ करावी आणि असुरक्षित संभोग किंवा एकापेक्षा अधिक भागीदारांसह लैंगिक संबंध ठेवू नये.