छातीत दुखणे - Chest Pain in Marathi

Dr. Nadheer K M (AIIMS)MBBS

December 14, 2018

March 06, 2020

छातीत दुखणे
छातीत दुखणे

सारांश

छातीदुखी अशी शारीरिक दुर्बलता आहे जी सौम्य व तीव्र वेदना दर्शवू शकते. छातीदुखी म्हणूनही भयावह आहे की तिचे हृदयविकाराच्या झटक्याशी आणि हृदयाच्या अनेक आजारांशी संबंध असते. तरीही, मूळभूत औषधोपचारांनी वेदना कमी होत नसतील तर वैद्यकीय व्यावसायिकांकडून तपासणी करून घ्यावी. नोंद करण्यासारखी महत्वाची गोष्ट म्हणजे छातीत ह्रदयाशिवाय जठराशी निगडित अवयव, फुफ्फुसे, स्वादुपिंड, पित्ताशय हे अवयव व स्नायू, बरगड्या, नसा, आणि त्वचा आणि इतर अशा अनेक संरचना देखील असतात. तरीही छातीदुखी वर उल्लेख केलेल्या संरचनेत देखील असू शकते. बरेचदा तुमचे छातीदुखी स्वतःच बरी देखील होते, परंतु तसे होत नसल्यास तुम्ही स्वतः डॉक्टरकडून निदान करून घेणे अतिशय आवश्यक आहे. डॉक्टर मूळ कारणांचा शोध घेऊन तुमच्यावर उपचार करतात ज्यात औषधे, जीवनशैली परिवर्तन, किंवा गरज भासल्यास शस्त्रक्रिया यांचा समावेश असतो.

छातीत दुखणे ची लक्षणे - Symptoms of Chest Pain in Marathi

वर उल्लेख केल्याप्रमाणे, तुम्ही अनुभवत असलेली छातीदुखी अनेक प्रकारची असते. छातीदुखी व्यतिरिक्त तुम्ही खालील लक्षणे देखील अनुभवू शकता.

 • छातीच्या भागात घट्टपणा किंवा जोरदार वेदना
 • छातीचे भरून येणे
 • मान, जबडा आणि बाहांकडे उत्सर्जित होणाऱ्या वेदना
 • छातीच्या भागात दाब जाणवणें
 • हृदयाचे ठोके आणि गती वाढणें
 • खांदेदुखी
 • घबरल्या सारखे होऊन हृदयाचे ठोक्यांची गती वाढणे, ठोके मोठ्याने आणि अनियमित होणे,
 • मळमळ होणे
 • उलटी होणे
 • ताप, सर्दी होणे
 • पिवळ्या हिरव्या थुंकी किंवा म्युकससह खोकला होणे
 • श्वास भरून येणे
 • भोवळयाण्याचा अनुभव किंवा कधीकधी चक्करयेणे
 • शारीरिक हालचाली  करताही थकवायेणे

डॉक्टराला कधी भेट द्यावी?

तुम्ही खालील लक्षणे अनुभवत असाल तर लगेच डॉक्टरांना दाखवा. तुमची प्रकृती खूपच खालावलेली असल्यास तुमच्या कुटुंबतील सदस्याला किंवा मित्राला सोबत घेऊन जा किंवा डॉक्टरांना बोलावून घ्या.

 • छातीच्या भागात दाब वा घट्टपणा सोबत दुखणे किंवा जोरदार वेदना होत असल्यास
 • मान, जबडा किंवा डाव्या बाहेकडे अतीव वेदना उत्सर्जित होत असल्यास
 • श्वसनासाठी त्रास होत असल्यास
 • आकस्मिक अतीववेदना, ज्या तुम्हाला डॉक्टरांनी आधी दिलेल्या औषधांनी देखील गेलेल्या नसल्यास
 • भोवळ, भीती, अस्पष्ट कारणांनी खूप घाम येत असल्यास, संभ्रमात असल्यास
 • छातीतील सरत होणाऱ्या वेदना कमी होत नसल्यास
 • खाली झोपल्याने किंवा पुढे झुकल्यावर देखील वेदना कमी होत नसल्यास
 • खूप कमी किंवा उच्च रक्तदाब असल्यास
 • ताप किंवा सर्दि सह पिवळ्या हिरव्या म्यूकससोबत खकला येत असल्यास

छातीत दुखणे चा उपचार - Treatment of Chest Pain in Marathi

छातीच्या दुखण्यावरील उपचार मूलभूत कारणांवर अवलंबून असतात आणि औषधोपचार, शस्त्रक्रिया, आणि जीवनशैली  परिवर्तन यांचा त्यात समावेश असतो.

औषधोपचार

 • वेदना आणि दाहकता कमी करणारी औषधे
  मूलभूत कारण जर पोट, स्वादुपिंड, पित्ताशय, बरगड्यांतील कार्टीलेज आणि इतर आतल्या संरचनेत असणाऱ्या दाहकतेमुळे असेल तर डॉक्टर तुम्हाला वेदनाशामक किंवा दाहकता कमी करणारी औषधे देईल
 • प्रतिजैविके आणि प्रतिजंतुकीय औषधे
  छातीच्या दुखण्याची मूळ कारणे संसर्गदोष असल्यास प्रतिजैविके आणि प्रतिजंतुकीय औषधे दिली जातात. संसर्गाचे प्रमाण कमी होताच तुमच्या वेदना कमी होतात.सूज व वेदनांच कमी करायला प्रतिजैविकांसह वेदनाशामक व दाहनाशक औषधे दिली जातात, पेंक्रियाटायटीस, शिंगल्स, पेपटिकअल्सर, कोलेसाईटायटीस (पित्ताशयातील दाहकता) इत्यादी.
 • अँटीप्लेटलेट औषधे
  ही औषधे रक्ताचे थक्के बनल्याने रक्तनळ्यातील अडसर हे मूळ कारण असल्यास वापरतात. यामुळे रक्ताचे थक्के बनत नाहीत आणि अडसर होण्याचे टळते. उदाहणार्थ: एसप्रिनरक्त
 • पातळ करणारी औषधे
  पातळ करणारी औषधे ही अँटीकोएग्यूलंट म्हणून जाणल्या जातात रक्ताचे थक्के बनणें थांबवितात.थक्के आधीच तयार झाल्या असल्यास त्यांचे आकार वाढण्यावर नियंत्रण येते.
 • रक्ताचे थक्के विरघळवून लावणारी औषधे
  त्यांना थ्रोम्बोलिटिक एजंट म्हणूनही ओळखतात. ही थक्क्यांना कोरोनरी आर्टरीमध्ये विरघळवितात.उदा. हेपारिन, वारफरिन,इत्यादी.
 • हृदयाच्या स्नायूंसाठीची औषधे
 • डिजिटलीस हे औषध हृदयाच्या स्नायूंची कार्यक्षमता वाढवते आणि हृदयाला रक्त अधिक दाबानी पंप करायला मदत करते.हे हृदयाच्या ठोक्यांना तालबद्ध करते.
 • ए. सी. इ. (ACE –एंजीओटेंसिन कन्वर्टींग एन्झाइम) अवरोधक
  ही औषधे एसीइ चे काम थांबवून एंजीओटेंसिनोजेन तयार होणे थांबवितात.एंजीओटेंसिनोजेन रक्ताच्या नळ्यांना बारीक करतात. या हॉर्मोन्सच्या निष्क्रियतेमुळे उच्च रक्तदाब असलेल्या लोकांचा रक्तदाब कमी होतो. त्याने हृदयाला रक्त पंप करायच्या क्षमतेत वृद्धी करण्यास मदत होते.
 • बीटा अवरोधक
  ही औषधे रक्तदाब आणि हृदयावरील कामांचा बोजा कमी करतात.
 • नाईट्रोग्लीसरीन किंवा नाईट्रेट्स
  ही रक्तनळ्यांच्या काठांवरील स्नायूंना शिथिल करतात व छातीदुखीमध्ये आराम देतात.
 • कॅल्शियम चॅनल अवरोधक
  ही औषधे नाईट्रोग्लीसरीनसारखीच कामे करतात आणि रक्तदाब कमी करून छातीदुखी कमी करतात.
 • डायुरेटिक्स
  ही औषधे शरिरातील तरळ पदार्थ व मिठाचे प्रमाण कमी करून रक्तदाबावर नियंत्रण मिळविण्यासाठी मदत करतात.म्हणून त्यांना “वॉटरपिल्स” देखील म्हणतात. ही औषधे हृदयावरील कामांचा भार कमीकरून हृदयविकाराच्या झटक्याचा धोकाही कमी करतात.
 • कॉलेस्ट्रॉलनियंत्रक औषधे
  ही औषधे कमी घनतेच्या लीपोप्रोटीन्स(LDL) ज्यांना वाईट कॉलेस्ट्रॉल म्हणूनही ओळखतात, त्यांची पातळी कमी करतात. कोरोनरी अर्टरीचे अडसर कमी करण्यासही औषधे कामी येतात.

शस्रक्रिया
छातीदुखीचे मुख्यकारण जर रक्तप्रवाहात अवरोध, थक्क्यांची निर्मिती, पित्तातील खडा, किंवा अवयवांची हानी हे असेल तर तुम्हाला शस्त्रक्रिया कराव्या लागतील. उदा. कॉलेसाईस्टेक्टोमी, पॅनक्रियाटेक्टोमी, बरगड्यांतील फ्रॅक्चर दुरुस्ती, कोरोनरी अँजिओप्लास्टी, आणि स्टेंटिंग, कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्टींग (ABG) हृदयाच्या व्हॉल्व बदलणे, हृदयप्रत्यारोपण, पेसमेकर टाकायला करावी लागणारी शस्त्रक्रिया.

 • कॉलेसाईस्टेक्टोमी
  ​रोगट पित्ताशय काढणे
 • पॅनक्रियाटेक्टोमी
  स्वादुपिंडाचा रोगट भाग किंवा संपूर्ण स्वादुपिंड काढून घेणे
 • बरगड्यांची फ्रॅक्चर दुरुस्ती
  बरगड्यांच्या भेगगेलेल्या किंवा तुटलेल्या भागांची पूनर्जोडणी
 • न्युमोथोरॅक्सच्या उपचारासाठी शल्यक्रिया
  यात शामील आहे प्लेरोडेसिस(प्लेराला जोडून ठेवणे), प्लेरोक्टोमी(प्लेराला काढणे जेणे करून फुफ्फुसेछातीच्या काठांना चिकटूनच राहतील), प्लेरलअॅब्रेशन(प्लेराला घासून फुफ्फुसांना चिकटवून ठेवण्यास मदत करणे) इत्यादी. प्लेरलच्या पडद्यांमधील हवा व द्रव्यांच्या वाढींची या सर्वशल्यक्रिया रोकथाम करतात.
 • कोरोनरी अँजिओप्लास्टी एंड स्टेंटिंग
  ​हाताच्या किंवा पायांच्या आर्टरीमधून स्टेंट घालून ती हृदयापर्यंत पोचविले जाते व छोट्या फुग्याच्या मदतीने आर्टरीच्या सुरुवातीला ब्लॉक केलेल्या थराला तोडले जाते.
 • कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्टिंग
  अडथळा असलेल्या आर्टरीला एक निरोगी रक्तनाळी जोडतात किंवा कलम केल्यासारखी लावतात. त्यामुळे कोरोनरी आर्टरीचा अडथळीत भाग बायपास केल्या जातो आणि हृदयापर्यंत पोचायला रक्ताला नवा मार्ग तयार करून दिल्याजातो.
 • हृदयातील व्हॉल्वची दुरुस्ती किंवा प्रत्यान्तरण
  हृदयातील नादुरुस्त किंवा काम करीत नसलेल्या व्हॉल्वना दुरुस्त करतात किंवा नव्या व्हॉल्वच्या मदतीने बदली केले जाते.
 • हृदय प्रत्यारोपण
  हृदयाला खूप अधिक क्षती झाली असल्यास डॉक्टर रोगट हृदयाला नव्या हृदयाने प्रत्यारोपण करतात.
 • पेसमेकर
  छातीच्या चामडीखाली पेसमेकर ठेवतात व त्याचे तार हृदयाला जोडतात. हृदयाला तालबद्ध ठेवण्यात या प्रक्रियेची मदतहोते.
 • व्ही. ए. डी. (VAD व्हेंट्रीक्युलर असिस्टडी व्हाईस) आणि टी. ए. एच. (TAH टोटल आर्टिफिशियल हार्ट)
  व्ही एडी कमजोर हृदयाच्या लोकांना रक्त अधिक कार्यक्षमतेने पंप करण्यास मदत करते. टीएएचमधे  हृदयाच्या काम करीत नसलेल्या खालच्या दोन चेंबर्सना नव्या चेंबर्सनी बदलले जाते.
myUpchar doctors after many years of research have created myUpchar Ayurveda Urjas Energy & Power Capsule by using 100% original and pure herbs of Ayurveda. This Ayurvedic medicine has been recommended by our doctors to lakhs of people for problems like physical and sexual weakness and fatigue, with good results.
Power Capsule For Men
₹719  ₹799  10% OFF
BUY NOW


संदर्भ

 1. National Heart, Lung, and Blood Institute [Internet]. U.S. Department of Health and Human Services; Ischemic Heart Disease
 2. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Warning signs and symptoms of heart disease
 3. National Institute of Diabetes and Digestive and Kidney Diseases [internet]: US Department of Health and Human Services; Treatment for Pancreatitis
 4. Jörg Haasenritter, Tobias Biroga, Christian Keunecke, Annette Becker, Norbert Donner-Banzhoff, Katharina Dornieden, Rebekka Stadje, Annika Viniol,Stefan Bösner. Causes of chest pain in primary care – a systematic review and meta-analysis. Croat Med J. 2015 Oct; 56(5): 422–430. PMID: 26526879.
 5. National Heart, Lung, and Blood Institute [Internet]: U.S. Department of Health and Human Services; Heart Surgery

छातीत दुखणे साठी औषधे

Medicines listed below are available for छातीत दुखणे. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.

Lab Tests recommended for छातीत दुखणे

Number of tests are available for छातीत दुखणे. We have listed commonly prescribed tests below: