लहान मुलांमध्ये बद्धकोष्ठता (लहान मुलांचे पोट साफ न होणे) काय आहे?
लहान मुलांमध्ये बद्धकोष्ठता (लहान मुलांचे पोट साफ न होणे) हा सामान्य प्रकार आहे. अधून मधून मोठ्या आतड्यात होणार्या हालचाली आणि कडक मल ही ह्याची सर्वसाधारण लक्षणे आहेत. बद्धकोष्ठता ही काही गंभीर परिस्थिती नाही. परंतु काही वेळा लहान मुलांना मल बाहेर काढताना वेदना होतात त्यामुळे मुले मलोत्सर्जनाची क्रिया अडवतात आणि मलक्रिया नैसर्गिकरित्या होऊ देत नाही. क्रोनिक बद्धकोष्ठतेच्या विकारावर वैद्यकीय उपचारांची गरज असते नाहीतर गंभीर आजार होऊ शकतो.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
लहान मुलांमध्ये बद्धकोष्ठतेची खालील लक्षणे दिसून येतात:
- एका आठवड्यामधे तीनपेक्षा कमी वेळा मलनिस्सारण होणे.
- कोरडा आणि घट्ट मलनिस्सारण सहजपणे होत नाही.
- मोठ्या आकाराचा मल जो सहजपणे निघत नाही.
- मलनिस्सारण होताना वेदना होणे.
- पोटदुखी किंवा पोटात पेटके येणे.
- मलाबरोबर रक्तस्त्राव होणे.
- लहान मुलाच्या अंतर्वस्त्रावर कोरड्या मलाच्या खुणा दिसून येणे.
याची मुख्य कारणं काय आहेत?
बद्धकोष्ठतेची अनेक कारणे आहेत जी सहजरित्या जाणली आणि टाळली जाऊ शकतात:
- कुटुंबात बद्धकोष्ठतेचा इतिहास असणे.
- वैद्यकीय किंवा जन्मत: पचनसंस्थेमध्ये दोष असणे.
- काही प्रकारच्या अन्नाची अलर्जी असणे किंवा ते अन्न न पचणे.
- काही प्रकारच्या औषधांचे दुष्परिणाम होणे.
- नेहेमीच्या आहारात किंवा आहारच्या वेळेत बदल होणे.
- शौचालय वापरताना त्रास होणे.
- मलनिस्सारण प्रक्रिया मुद्दाम अवरोधीत करणे.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
लहान मुलाचा वैद्यकीय इतिहास आणि त्याची शारीरिक तपासणी बद्धकोष्ठतेचे निदान होण्यास पुरेशी असते. वैद्यकीय मोजे घालून बोटांनी गुदद्वाराची विकृती आहे का याची तपासणी केली जाते. मलाची चाचणीही केली जाते. गंभीर रुग्णामधे पोटाचा एक्स रे, आतड्याची बायोप्सी, मार्कर चाचणी किंवा रक्त चाचणी सुद्धा केली जाऊ शकते.
आहारात आणि जीवनशैलीत बदल ही उपचाराची प्रथम पायरी आहे. भरपूर तंतुमय आहार आणि पुरेसे पाणी यामुळे मोठ्या आतड्याच्या हालचाली व्यवस्थित होण्यास मदत होते. काही वेळेस डॉक्टर्स मल मऊ करणारी औषधे देतात ज्यामुळे मलनिस्सारण सहज होते. मलनिस्सारणात अडथळे येत असतील तर एनिमाचा वापर केला जातो. बद्धकोष्ठतेची परिस्थिति गंभीर असेल तर मुलाला हॉस्पिटलमध्येच एनिमा द्यावा लागतो.