कोलेस्टॅटिक यकृत रोग म्हणजे काय?
कोलेस्टॅटिक यकृत रोग, कोलेस्टॅटिस म्हणून देखील ओळखला जातो. हा एक विकार आहे ज्यामध्ये यकृतामधून पित्ताचा प्रवाह एकतर कमी होतो किंवा अडवला जातो. हा आजार खूप तीव्र किंवा जुना असू शकतो आणि सर्व वयोगटातील व्यक्तींना होऊ शकतो. ह्याला एक्स्ट्राहेपॅटिक कोलेस्टॅटिस म्हणजे यकृतच्या बाहेर होणारा आणि इंट्राहेपॅटिक कोलेस्टॅटिस म्हणजे यकृतच्या आत होणारा अश्या प्रकारे वर्गीकृत केले जाऊ शकते.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
कोलेस्टॅटिसची लक्षणे हेपिटायटीससारखीच असतात, जे त्याचे कारण देखील आहे. कोलेस्टॅटिसचे लक्षणं खालीलप्रमाणे आहेतः
- मळमळणे.
- गडद रंगाची लघवी.
- पांढरा किंवा मातीच्या रंगाचा मल.
- खाजवणे.
- ओटीपोटात वरच्या बाजूला दुखणे.
- त्वचा आणि डोळे पिवळसर होणे.
- काही पदार्थांच्या पचनामध्ये अडचण. (अधिक वाचा: अपचनचा उपचार)
याची मुख्य कारणं काय आहेत?
प्रभावित गटाच्या आधारावर कोलेस्टॅटिसचे कारण आहेत:
- नवजात बाळ आणि मुलांमध्ये कोलेस्टॅटिसची कारणं:
- अनुवांशिक कारण जसे झिंक स्टोरेज डिसऑर्डर.
- सिरीन जीन नावाचे जीनचे म्युटेशन म्हणजे उत्परिवर्तन.
- बायलर’स सिंड्रोम (जेनेटिक ऑटोसोमल रेसेसिव्ह डिसऑर्डर)
- प्रौढांमध्ये कोलेस्टॅटिसचे कारणं:
- लिहून दिलेले औषधे.
- हर्बल उपचार.
- डॉक्टरांनी लिहून न दिलेले औषध घेणे.
स्थळावर आधारित कोलेस्टॅटिसचे कारणं:
- इंट्राहेपॅटिक कोलेस्टॅटिसची कारणं:
- गरोदरपणा.
- क्षय रोग.
- मद्यपानामुळे यकृत रोग.
- लिम्फोमा.
- यकृतात बॅक्टेरियल फोड.
- पित्तविषयक सिर्होसिस (अधिक वाचा: यकृत सिर्होसिसची लक्षणे).
- रक्तप्रवाहामधून पसरलेला संसर्ग .
- एक्स्ट्राहेपॅटिक कोलेस्टॅटिसची कारणं :
- सिस्ट.
- पित्ताशय नलिकेचा ट्युमर.
- पित्ताशय नलिकेत खडे.
- स्वादुपिंड सुजणे (अधिक वाचा: स्वादुपिंडाचे उपचार).
- स्वादुपिंडमध्ये ट्यूमर असणे.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
कोलेस्टॅटिसचा संशय असल्यास डॉक्टर खालील चाचण्या लिहून देतील:
- यकृत क्रिया चाचणी: यामुळे पित्ताचे आणि सीरम अल्कलीन फॉस्फेटसचे वाढलेले स्तर समजेल.
- यकृतचे मूल्यांकन करण्यासाठी खाली दिलेल्या इमेजिंग तपासण्या:
- पोटाचा एमआरआय.
- पोटाचे अल्ट्रासाऊंड इमेजिंग.
- पोटाचा सिटी स्कॅन.
- एंडोस्कोपिक रेट्रोग्रेड चोलॅंगियोपॅन्क्रिएटोग्राफी.
कोलेस्टॅटिक यकृत रोगाच्या उपचारांमध्ये स्थितीच्या मूलभूत कारणाची ओळख आणि उपचार यामध्ये खालील बाबींचा समावेश आहे. कोलेस्टॅटिसचे उपचार खालील प्रमाणे आहेत:
- लक्षणांवर आधारित उपचार : प्र्यूरिटस (खाज येणे) हे सर्वसामान्य लक्षण आहे, जे नंतर झोपेत अडथळा आणू शकते, म्हणूनच काळजी घेतली पाहिजे. प्र्यूरिटससाठी सामान्यतः कोलेस्टिरॅमिन सारखी ॲनियन एक्सचेंज रेसिन्स औषधे दिले जातात. अँटिबायोटिक्सचा वापर पर्यायी उपचार म्हणून केले जातो.
- विशिष्ट उपचार: स्थितिच्या करणानुसार विविध अँटिबायोटिक्स आणि कॉर्टिकोस्टेरॉइड थेरपी केली जाऊ शकते.
(अधिक वाचा: यकृत आजाराचे प्रकार)