क्रोनिक लिम्फोसाइटिक ल्युकेमिया काय आहे?
क्रोनिक लिम्फोसाइटिक ल्युकेमिया (सीएलएल) हा एक प्रकारचा कॅन्सर आहे जो लिम्फोसाइट्सला प्रभावित करतो. लिम्फोसाइट्स पांढऱ्या रक्त पेशींचा (डब्ल्यूबीसी) एका प्रकार आहे आणि अस्थिमज्जेत बनतात. साधारणपणे प्रौढांमध्ये आढळणा-या ल्यूकेमियाचा हा सर्वात सामान्य प्रकार आहे. सीएलएलचे दोन प्रकार आहेत:
- एक प्रकार हळूहळू वाढतो आणि तो लक्षात येण्यासाठी जास्त वेळ लागतो.
- दुसरा प्रकार, जो अधिक गंभीर स्वरूपाचा आहे, तो वेगाने वाढतो.
भारतात (1.7% -8.8%) हा आजार पश्चिमेच्या (25% -30%) तुलनेत असामान्य आहे.
सीएलएलचे रकरण असामान्य आहे कारण यामुळे दर वर्षी 4.7 प्रति 100,000 पुरुष आणि महिला प्रभावित होतात.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
बऱ्याच प्रकरणांमध्ये, सीएलएल काही वर्षांपर्यंत कोणतीही लक्षणे दाखवत नाही. कॅन्सरचा प्रसार झाल्यानंतर लक्षणे दिसू लागतात. यामुळे मुख्यतः लिम्फ नोड्स, यकृत आणि प्लीहा प्रभावित होतात. लक्षणांमध्ये खालील समाविष्ट आहेत:
- मान, काख, पोट किंवा मांडीत लिम्फ नोड्सला वेदनादायक सूज.
- थकवा.
- बरगडीखाली वेदना.
- ताप.
- रात्री घाम येणे.
- वारंवार संसर्ग.
- अकारण वजन कमी होणे.
याची मुख्य कारणं काय आहेत?
सीएलएलचे अचूक कारण माहित नसले तरी, रक्त पेशींच्या वाढीवर नियंत्रण आणि विकास करणाऱ्या जीन्समध्ये बदल (उत्परिवर्तन) झाल्यामुळे उद्भवू शकतो. हे बदल पेशींना असामान्य, अप्रभावी लिम्फोसाइट्स बनवते जे रक्तात आणि इतर काही अवयवांमध्ये पटीने वाढतात आणि एकत्रित होतात. या पेशी रक्तपेशींचे उत्पादन देखील प्रभावित करतात.
खालील व्यक्ती याने प्रभावित होण्याचा धोका जास्त असतो:
- मध्यमवयीन किंवा वृद्ध पुरुष.
- सीएलएलचा कौटुंबिक इतिहास किंवा लिम्फ नोड्सचा कॅन्सर.
- रशियन आणि यहूदी वंशाचे पूर्वी युरोपियन गोरे लोक.
- हर्बिसाइड आणि कीटकनाशकांसारख्या विशिष्ट रसायनांचे सानिध्य.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
खालील पद्धतींनी सीएलएलचे निदान केले जाऊ शकते:
- शारीरिक तपासणी आणि इतिहास: संपूर्ण आरोग्य तपासण्यासाठी.
- पूर्ण रक्त गणना (सीबीसी): सर्व रक्त पेशींचे आकार आणि संख्या तपासण्यासाठी.
- इम्यूनोफेनोटाइपिंग किंवा फ्लो सायटोमेट्रीः डब्ल्यूबीसी अँटीजन शोधण्यासाठी.
- फ्लोरोसेन्स इन सीटू हायब्रिडायझेशन (एफआयएसएच): अनुवांशिक माहितीचे आकलन करण्यासाठी.
सीएलएलच्या रूग्णांसाठी पाच मानक उपचार आहेत: सुरुवातीच्या काळात रुग्णाच्या परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण केले जाते:
- रेडिएशन थेरेपी.
- किमोथेरपी.
- स्पिलीन काढण्यासाठी सर्जरी.
- मोनोक्लोनल अँटीबॉडीजसह टार्गेटेड थेरपी.
- बोन मॅरो ट्रान्सप्लांट.
फॉलो-अपः
- तपासणी केल्यानंतर, रोगाच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी चाचणीची आवश्यकता असू शकते.
- उपचाराने रोग पूर्णपणे बरा करू शकत नाही आणि उपचार सोडल्यानंतर लक्षणांचा विकास होऊ शकतो.
- उपचार काही आठवडे किंवा महिने किंवा काही वर्षांपर्यंत चालू शकतात.
- पुढील व्यवस्थापन मागील उपचारांच्या प्रभावावर अवलंबून असतात.
जीवनशैलीत बदलः
- धूम्रपान सोडा.
- चांगली स्वच्छता राखून संसर्ग होण्याचा धोका कमी करा.
- आहारातील बदल आहारतज्ञाच्या मदतीने जेवणातील पदार्थ ठरवून त्याप्रमाणे सेवन करा.
- नियमित व्यायाम करा.
- तणाव आणि थकवा व्यवस्थापित करणे. कामांना प्राधान्यक्रम द्या आणि इतरांना दररोजच्या कामात मदत करण्याची परवानगी द्या.
- कुटुंबाची, मित्रांची तसेच सहाय्यक गटांची मदत घ्या.
- काउन्सिलिंग सेशन्ससाठी जा.