कोकिडियोडिडायकोसिस म्हणजे काय?
कोकिडियोडिडायकोसिस किंवा व्हॅली फिवर हा श्वसनासंबंधी एक संसर्ग आहे जे कोकिडायॉइड नावाच्या बुरशीमुळे होतो. हा साधारणतः अमेरिकेच्या दक्षिण-पश्चिम राज्यांमध्ये, मेक्सिकोच्या काही भागामध्ये आणि मध्य आणि दक्षिण अमेरिकेमध्ये आढळतो. उत्तर भारतामध्ये व्हॅली तापाचे पहिले प्रकरण नोंदवण्यात आले होते.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहे?
लक्षणे सामान्यत: संपर्कानंतर 1 ते 3 आठवड्यांत दिसू लागतात आणि काही आठवड्यांपासून ते महिन्यापर्यंत राहतात. काही लक्षणे पुढील प्रमाणे आहेत:
- पुरळ. (अधिक वाचा: त्वचेवरील पुरळचा उपचार)
- खोकला.
- ताप.
- धाप लागणे.
- डोके दुखी.
- रात्री घाम येणे.
- स्नायू दुखी किंवा सांधे दुखी.
- हाता पायावर पुरळ.
कालांतराने सुमारे 5% -10% प्रभावित व्यक्तींना फुफ्फुसाची समस्या होते. हा आजार दीर्घकाळ असेल तर खालील लक्षणे पहायला मिळतात:
- लो-ग्रेड ताप.
- छाती दुखी.
- वजन कमी होणे.
- थुंकीमध्ये रक्त आढळणे.
संसर्ग पसरल्यास खालील लक्षणे दिसू शकतात:
- त्वचेवर गाठ येते आणि क्षती होते.
- कवटी आणि इतर हाडांमध्ये वेदना.
- सुजलेले आणि वेदनादायक सांधे.
- मेनिनजियल संसर्ग (मेंदू आणि पाठीच्या कणाच्या बाजूला संरक्षक टिश्यूचा संसर्ग).
याची मुख्य कारणं काय आहेत?
हे प्रामुख्याने श्वास घेतांना बुरशीचे कण शरीरात गेल्याने होते. धुळीमुळे हे कण हवेत मिसळतात आणि ते शरीरात गेल्यास हा संसर्ग होतो. हा आजार सांसर्गिक नसतो.
जोखिम घटकांमध्ये हे समाविष्ट आहे:
- परिसराच्या संपर्कात येणे: सभोवतालच्या परिसरात किंवा घराच्या परिसरातून कण श्वासातून शरीरात जाणे.
- गरोदरपणा: गरोदरपणाच्या तिसऱ्या महिन्यात गर्भवती महिला ह्या आजाराला अधिक संवेदनशील असतात.
- कमी प्रतिकारशक्ती: एचआयव्ही पॉझिटिव्ह किंवा एड्स असणाऱ्या रुग्णांना संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते.
- वय: वृद्ध व्यक्ती जास्त संवेदनशील असतात.
- अनुवांशिकता: फिलिपिनो आणि आफ्रिकन लोकांना या आजाराचा जास्त धोका असतो.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
केवळ चिन्हे आणि लक्षणे तपासून व्हॅली फिवरचे पूर्णपणे निदान करणे कठीण असल्याने, खालील चाचण्या कराव्या लागू शकतात:
- त्वचेची चाचणी.
- थुंकीची वैद्यकीय तपासणी.
- पूर्ण रक्त पेशींची गणना आणि एरिथ्रोसाइट सेडिमेंटेशनचा दर सारख्या रक्त चाचण्या.
उपचारासाठी हे केले जाते:
- अँटीफंगल एजंटचा उपयोग : त्यांचा दुष्परिणाम होऊ शकतो, पण एकदा उपचार बंद झाला की तो कमी होतो.
- इम्यूनोस्पेप्रेसंट औषधांचा काळजीपूर्वक वापर.
स्वत: च्या काळजीचे टिप्सः
- पुरेशी विश्रांती आवश्यक आहे.
- पुरेसे द्रवपदार्थ पिणे आवश्यक आहे.
- धूळ किंवा वारा असलेल्या भागात काम करणे टाळावे.
- वातावरण खराब असल्यास घरात रहावे
- घरात हवेच्या फिल्टर चा वापर आणि श्वसनमापक मास्क वापरावा.
- संसर्ग टाळण्यासाठी अँटीसेप्टिक्सने जखम स्वच्छ करावी.
आवश्यक काळजी घेतल्यास व्हॅली फिवर सहजपणे टाळता येऊ शकतो. जर कोणतीही चिन्हे किंवा लक्षणे नियंत्रणाबाहेर गेले तर पुढील त्रास टाळण्यासाठी ताबडतोब आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
(अधिक वाचा: बुरशीच्या संसर्गाचे उपचार)