पोटशूळ (कोलिक) - Colic in Marathi

Dr. Pradeep JainMD,MBBS,MD - Pediatrics

December 06, 2018

October 28, 2020

पोटशूळ
पोटशूळ

पोटशूळ (कोलिक) म्हणजे काय?

पोटशूळ (कोलिक) हा मोठ्या माणसांमध्ये आणि नवजात बाळांमध्ये आढळणारी एक सामान्य समस्या आहे. लहान बाळांमध्ये आढळणारे पोटशूळ हे साधारणपणे शिशुकोष म्हणून ओळखले जाते. जन्माच्या पहिल्या काही महिन्यात प्रत्येकी 5 पैकी 1 बाळाला पोटशूळ होते. कोलिक ही एक अवस्था आहे ज्यामध्ये बाळ ओटीपोटात दुखत असल्याने किंवा अस्वस्थ होत असल्याने खूप रडते. बाळ जर आठवड्यातून 3 दिवसांपेक्षा जास्त दररोज 3 तासांपेक्षा जास्त रडत असेल तर त्याला पोटशूळाचा त्रास असू शकतो.

मुले त्यांची गरज समजवण्यासाठी रडतात. जेव्हा भूक, थकवा, झोप, उष्णता, सर्दी किंवा खराब डायपर बदलल्यावर सुध्दा बाळ रडत असेल, तेव्हा पोटशुळने बाळाला त्रास होत असल्याचे समजावे.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

जेव्हा लहान बाळांना पोटशुळाचा त्रास होतो किंवा त्रास होण्याची शक्यता असते तेव्हा खालील लक्षणे दिसून येतात:

  • अनियमित किंवा अस्वस्थ झोप.
  • अनियमित स्तनपान, स्तनपान करतांना अचानक रडणे.
  • अस्वस्थपणा.
  • बाळांमध्ये तणाव जाणवणे - जसे घट्ट बंद केलेली मूठ, पाठ वाकवणे, गुडघे अंगाजवळ घेणे आणि ओटीपोटातील स्नायुंमध्ये तणाव जाणवणे.
  • रडणे थांबवण्याच्या प्रयत्नाला प्रतिसाद न देता सारखे जोरात रडणे.
  • दररोज ठराविक वेळी त्रास आणि अस्वस्थ होणे.

याची मुख्य कारणं काय आहेत?

कोणत्याही बाळाला पोटशूळ होऊ शकते. हे सामान्यतः आधीच्या किंवा नंतरच्या काळात होण्याची शक्यता आहे किंवा स्तनपान घेणाऱ्या बाळांच्या तुलनेत बाटलीची सवय असलेल्या बाळांना जास्त प्रमाणात होते हे कदाचित सांगणे कठिण आहे; कारण ते सर्व एक सारखेच पोटशूळचे कारण असतात. पोटशूळाची काही संभाव्य कारणे पुढील असू शकतात:

  • आईच्या स्तनपानातील दूधात असलेल्या काही पदार्थांच्या रिॲक्शन ने त्रास होणे.
  • लॅक्टोज असहिष्णुता.
  • अपचन.
  • गरोदरपणात आईने धुम्रपान केल्यास बाळाला पोटशूळ होऊ शकते.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

डॉक्टर पोटशूळेचे निदान करण्याआधी अस्वस्थपणाचे इतर कारणं शोधतात. ह्याकरता कोणतीही चाचणी किंवा तपासणी केली जात नाही.

बरेच डॉक्टर पोटशूळ बरा होईपर्यंत किंवा बाळाला सवय होईपर्यंत धीर ठेवायला सांगतात.लॅक्टोज असहिष्णुतेचा संशय असल्यास काही डॉक्टर गायीचे दूध टाळण्याचा सल्ला देतात, किंवा स्तनपान करणाऱ्या आईला काही पदार्थ बंद करायचा सल्ला देतात.

फिरवणे, झुलवणे आणि पॅसिफायरचा वापर बऱ्याच वेळा फायदेशीर ठरतो. स्तनपाननंतर ढेकर काढणे किंवा आंघोळीच्या आधी मालिश करणे फायद्याचे ठरते.

कधी कधी सिमेथिकॉन ड्रॉप्स देण्यात येतात ज्यामुळे बाळांच्या हवा पास करु शकते आणि त्याला आराम मिळतो.



संदर्भ

  1. National Health Service [Internet]. UK; Colic
  2. National Health Service [Internet]. UK; Colic
  3. Better health channel. Department of Health and Human Services [internet]. State government of Victoria; Colic
  4. Healthdirect Australia. Colic in babies. Australian government: Department of Health
  5. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Colic and crying: self-care

पोटशूळ (कोलिक) साठी औषधे

Medicines listed below are available for पोटशूळ (कोलिक). Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.