सीओपीडी (क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिझीज) म्हणजे काय?
फुफ्फुसांमध्ये गंभीर दाहकता निर्माण करणारे आजार जे मुख्यतः फुफ्फुसातील वायू-प्रवाहास अडथळा निर्माण करतात अशा आजारांसाठी सीओपीडी हा एक सामूहिक शब्द आहे. जगभरात, सीओपीडी मृत्यूदर आणि विकृतीचे मुख्य कारण आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन(डब्ल्यूएचओ) नुसार, 65 दशलक्ष लोक जागतिक पातळीवर मध्यम-ते-गंभीर स्वरूपात सीओपीडीने पिडीत आहेत. भारतात सीओपीडीचे प्रमाण पुरुषांमध्ये 2%-22% आणि स्त्रियांमध्ये 1.2%-19% असे नोंदवले गेले आहे.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
सुरुवातीला, सीओपीडी सहजपणे ओळखू येत नाही कारण याची लक्षणे इतर श्वसनविकारां सारखी वाटू शकतात. सामान्य लक्षणे खालीलप्रमाणे आहेत:
- श्वसनक्रियेत त्रास.
- खोकला.
- अतिरिक्त आंव स्त्राव.
- घरघर.
- छातीत घट्टपणा जाणवणे.
- ओठ किंवा नखं निळसर होणे.
- थकवा.
- वजन विलक्षण कमी होणे.
- शरीराच्या खालच्या भागात सूज येणे.
सीओपीडीमध्ये फुफ्फुसाची स्थितीच्या विकाराचे तीन प्रकार असतात: क्रोनिक ब्रोन्कायटीस, एम्फिसिमा, आणि अपरिवर्तनीय अस्थमा. ज्या लोकांना क्रोनिक ब्रोन्कायटीस होतो त्याच्यात सतत खोकला आणि आंव स्त्राव यासारखे लक्षणं दिसतात. एम्फिसिमा मध्ये, वायुकोष (फुफ्फुसातील लहान वायुकोष्ठ) प्रभावित होतात आणि विविध वायू उत्तेजक पदार्थ जसे की, सिगारेटचा धूर मुळे नष्ट होतात.
याची मुख्य कारणे काय आहेत?
धूम्रपान आणि बायोफ्यूयल्स किंवा घरगुती धूराचा संसर्ग हे सीओपीडी होण्यामागचे जोखीम घटक आणि कारण आहे. इतर जोखीम घटकांमध्ये ह्रदय रोग, छातीत जळजळ,निराशा किंवा मधूमेह यांसारख्या कॉमरबीडीटीज समाविष्ट आहेत. निष्क्रिय धूम्रपान आणि अल्फा-1च्या-कमतरतेमुळे झालेली दुर्मिळ अनुवांशिक स्थिती सुद्धा सीओपीडी होण्यास कारणीभूत असू शकते. दमा देखील सीओपीडी वाढवू शकतो.
याचे निदान व उपचार कसे केले जातात?
सीओपीडी चे निदान करण्यासाठी खालील चाचण्या केल्या जातात:
- फुफ्फुसांच्या कार्याच्या चाचण्या: फुफ्फुसाची क्षमता तपासण्यासाठी.
- छातीचा एक्स-रे: फुफ्फुसांच्या इतर समस्या वगळण्यासाठी.
- आरटेरिअल ब्लड गॅस विश्लेषण.
- प्रयोगशाळेतील चाचण्या.
सीओपीडी रूग्णांसाठी उपचार पर्याय निवडण्यासाठी सोनेरी मार्गदर्शक तत्त्वांचा वापर केला जातो. उपचारांमध्ये समाविष्ट आहे:
- प्रतिबंधात्मक उपाय:
- धूम्रपान करणे थांबवणे आणि धूर आणि इतर श्वसनमार्गास त्रासदायक गोष्टींपासून दूर राहणे.
- औषधे:
- ब्रोन्कोडायलेटर्स.
- इनहेल्ड स्टेराॅइड्स.
- काॅम्बिनेशन इनहेलर्स.
- फाॅस्फोडायस्टिरेझ-4 इनहिबिटर्स.
- अँटिबायोटिक्स.
- औषधां शिवाय केल्या जाणाऱ्या उपायांमध्ये समाविष्ट आहेत:
- ऑक्सिजन थेरपी.
- फुफ्सुस पुनर्वसन कार्यक्रम.
- शस्त्रक्रिया:
- फुफ्फुसाची घनता कमी करण्याची सर्जरी.
- लंग ट्रान्सप्लांट.
- बुलेक्टोमी.
रोगाचे प्रसरण रोखणे आणि थांबविणे अधिक चांगले आहे.
सीओपीडी हा एक पाठपुरावा करणारा रोग आहे जो बरा होणे शक्य नाही, पण योग्य निदान आणि बरोबर उपचारांसह, सीओपीडीचे व्यवस्थापन करून चांगलं जीवन जगता येऊ शकतं.
(अधिक वाचा: फुफ्फुस संसर्ग उपचार)