सारांश
डेंगू हा एक प्रकारचा विषाणूजन्य रोग असून तो डासांद्वारे पसरतो. असे चार प्रकारचे विषाणू आहेत जे या आजारास कारणीभूत आहेत आणि डेंगू त्यापैकी कुठल्याही एकाने होऊ शकतो. एकदा एखाद्या व्यक्तीस कोणत्याही प्रकारच्या डेंगू विषाणूचा संसर्ग झाल्यास, त्या विशिष्ट प्रकारासाठी आजीवन प्रतिकारक्षमता व इतर प्रकारांसाठी अल्प-काळ (जवळजवळ दोन वर्षे) आंशिक प्रतिकारक्षमता विकसित होते, परंतु अंततः त्या व्यक्तीला सर्व चार प्रजातींचे संक्रमण होऊ शकते. प्रदुर्भावाच्या काळात कोणतेही एक किंवा सर्व प्रकारचे डेंगू विषाणू परिभ्रमण करू शकतात.
एन्डी इजिप्ती डसाने डेंगू विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे प्रसारित केला जातो. संक्रमित व्यक्तीच्या शरीरावर रक्त शोषताना डास स्वतः विषाणूग्रस्त होतो. डेंगूच्या लक्षणांमधे अचानक उच्च-ताप येणे, तीव्र डोकेदुखी, मळमळ, डोळ्यांच्या मागे वेदना होणे, सांधेदुखी होणे, अती थकवा येणे, शारीरिक वेदना होणे, भूक हरवणे आणि त्वचेवर पुरळ येणे यांचा समावेश होतो. ताप आणि इतर लक्षणं जवळजवळ एक आठवडे टिकतात, परंतु त्यानंतर येणारा अशक्तपणा आणि भूक कमी होणे अनेक आठवडे टिकू शकते.
डेंगू तापावर सध्या कोणतेही विशिष्ट विषाणूरोधक उपचार उपलब्ध नाही. तापावरील औषधांच्या वापरासह, द्रव्य पुनर्स्थापना आणि अंथरूणावर विश्रांती करण्याचा सल्ला दिला जातो.रक्तस्त्रावासह होणारा डेंगूचा ताप उपचार न केल्यास डेंगू शॉक सिंड्रोममधे रूपांतरित होतो. ही अतिशय गंभीर स्थिती आहे.