डायव्हर्टिक्युलायटीस म्हणजे काय?
डायव्हर्टिक्युलायटीस या विकारात मोठ्या आतडयांवर (बॉवेल) वर परिणाम होतो. डायव्हर्टीक्युलर रोगांमध्ये,मोठ्या आतड्यांवर लहान लहान फुगवटे तयार होतात. या डायव्हर्टीक्युलांना सूज येणे याला डायव्हर्टिक्युलायटीस असे म्हणतात. सहसा, डायव्हर्टीक्युला तयार होतात तेव्हा काही लक्षणे जाणवत नाही. पण, जर त्यावर संसर्ग झाला किंवा सूज आली, तर तीव्र वेदना होतात. जर आहारात पुरेसे फायबर नसेल तर ही समस्या उद्भवते.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
डायव्हर्टिक्युलायटीस ची लक्षणे खाली दिल्याप्रमाणे आहेत:
- पोटात तीव्र वेदना होणे, सहसा डाव्या बाजूला.
- 38 C (104 F) किंवा अधिक ताप येणे.
- वारंवार शौच होणे.
- उलटी होणे.
- थकवा.
- शौचात रक्त येणे.
याची मुख्य कारणं काय आहेत?
डायव्हर्टिक्युलायटीस हा सहसा आहारात कमी फायबर आणि उतारवय यामुळे होतो. अनुवांशिक कारणे सुद्धा असू शकतात. डायव्हर्टिक्युलायटीस मध्ये, आतड्यांचा आवरणाच्या कमकुवत भागावर लहान पॉकेट्स म्हणजे डायव्हर्टीक्युला तयार होतात आणि ते सुजतात. परिणामी संसर्ग होतो, आणि फोडं येतात.
जरी नेमके कारण ठाऊक नसले तरी, जे लोक खूप लठ्ठ असतात, पेन किल्लर्स चा दीर्घकाळ वापर करतात आणि ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास असतो त्या लोकांमध्ये हे जास्त दिसून येते.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
डायव्हर्टिक्युलायटीस चे निदान मुख्यतः पोटात तीव्र वेदना होणे हे आहे. डॉक्टर आपल्या सखोल शारीरिक तपासणी सोबत मलमार्गाची तपासणी करतात. आपल्या जेवणाच्या सवयींची सुद्धा नोंद केली जाऊ शकते. संसर्गासाठी आपले रक्त तपासले जाते. आतडे आतून बघण्यासाठी कोलोनोस्कॉपी केली जाते. एक्स-रे घेण्यापूर्वी, आपले डॉक्टर मलद्वारातून कॉन्ट्रास्टींग डाय (बेरियम) टाकून आतडे स्वच्छ करतील. आतड्यावर बनलेले फोडं तपासण्यासाठी सीटी स्कॅन केला जातो. रक्तस्त्राव होत आहे आहे का बघण्यासाठी आपले मल देखील तपासले जाते.
डायव्हर्टिक्युलायटीस एक वैद्यकीय इमर्जन्सी ची स्थिती मानली जाते आणि यावर त्वरित उपचार करणे आवश्यक आहे. अँटिबायोटिक्स आणि वेदना कमी करणारे औषधे देऊन संसर्गावर नियंत्रण केले जाते. इंट्राव्हेनस द्रव देऊन आतड्यांना आराम देतात. स्थिती अधिक गंभीर झाल्यास जसे की आतड्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यास, शस्त्रक्रिया केली जाते ज्याला कोलॅक्टोमी म्हणतात, यामध्ये आतड्याचा प्रभावित भाग काढून टाकतात. कोलॅक्टोमी नंतर, कोलेस्टोमी नामक एक प्रक्रिया केली जाते ज्यात आतड्याचा निरोगी भाग पोटाच्या एका छिद्रातून बाहेर काढतात आणि मल गोळा करण्यासाठी एका पिशवीशी जोडतात. 6 ते 12 महिने प्रभावी असेल अशी ही एक तात्पुरती प्रक्रिया केली जाते.
आहारात जास्त फायबर घेणे, द्रव घेणे आणि आतड्यांचे कार्य सुधारण्यासाठी नियमित व्यायाम करणे या सारखे प्रतिबंधात्मक उपाय तुम्हाला करावे लागतील.