ड्रग ओव्हरडोज काय आहे?
विषजन्य पदार्थ किंवा विषारी ड्रग्ज किंवा औषध यांचा वापर (अवैध ड्रग्स, डॉक्टरांनी सांगितलेले औषधोपचार आणि डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय घेतलेली औषधं किंवा विशिष्ट हर्बल उपायांचा समावेश असू शकतो) अति प्रमाणात होतो, जे काहीवेळा प्राणघातक ठरु शकते. मादक द्रव्यांच्या प्रमाणावरील प्रतिक्रिया व्यक्ती अनुसार बदलते.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
विविध घटकांवर आधारित, ज्यात औषधांचे प्रकार, प्रमाण आणि व्यक्तीच्या आरोग्याची स्थिती समाविष्ट आहे, ओव्हरडोज ची सुरवातीची चिन्हे आणि लक्षणे भिन्न असू शकतात. सामान्यतः दिसून येणारी काही लक्षणे खालील प्रमाणे आहेत:
- अतिसार, उलट्या आणि / किंवा मळमळ.
- पोटात वेदना.
- आंतरिक रक्तस्त्राव.
- चक्कर येणे किंवा झोप येणे.
- श्वास घेण्यात अडचण.
- तोल जाणे.
- झटके.
- गोंधळ किंवा भ्रमिष्टपणा.
- द्रुष्टी स्थिर न राहणे.
- घोरणे.
- शरीर निळे पडणे.
- कोमा.
याची मुख्य कारणं काय आहेत?
खालीलपैकी कोणत्याही कारणामुळे ड्रग ओव्हरडोज होऊ शकतो:
- ड्रगचा गैरवापर करणे, ज्यामध्ये एखादी व्यक्ती ड्रग्ज जास्त प्रमाणात घेतात किंवा ‘हाय’ होतात किंवा स्वत:ला हानी (आत्महत्या करण्याचा प्रयत्न एक उदाहरण असू शकते) पोहोचवण्याच्या हेतूने घेणे.
- हे आकस्मिक असू शकते, ज्यामध्ये एखादी व्यक्ती चुकून खालील गोष्टी घेऊ शकतो:
- चुकीची औषधे.
- औषधांचे चुकीचे संयोजन.
- औषधांची चुकीची मात्रा.
- चुकीच्या वेळी औषध घेतल्यामुळे देखील नुकसान होऊ शकते.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
जेव्हा एखादी व्यक्तीने ड्रग ओव्हरडोज केल्याचे आढळते तेव्हा त्याला त्वरित वैद्यकीय उपचार आवश्यक असतात. डॉक्टर किंवा हेल्थकेअर टीम रुग्णाची संपूर्ण तपासणी करतात:
- रक्ताच्या विविध चाचण्य करणे.
- रुग्णांचे निरीक्षण.
- एक मनोवैज्ञानिक पुनरावलोकन तपासणी.
औषधी द्रवपदार्थाचा उपचार हा कोणत्या आणि किती ड्रग (किंवा ड्रग्स) घेतला गेला आहे आणि त्याचे व्यक्तिवर होणाऱ्या परिणामांवर अवलंबून असतो. हे ड्रगसोबत आणखी काय घेतले होते, ते कसे आणि केव्हा घेतले गेले यासह इतर काही घटकांवर देखील अवलंबून असते ज्यामुळे अधूनमधून कॉम्पिकेशन्स देखील होऊ शकतात. काही प्रकरणांमध्ये उपचार अल्पकालीन असतात, तर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यास दीर्घकालीन उपचार आवश्यक असतात.
प्राथमिक उपचार उपायांमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे:
- शांत आणि स्थिरचित्त राहणे आणि डोके मागच्या बाजुला करुन आणि हनुवटी उचलून प्रभावित व्यक्तीच्या वायुमार्गास सुरक्षित करणे. व्यक्तीला काही वैद्यकीय मदत मिळत नाही तोपर्यंत श्वसनावर लक्ष ठेवणे. बेशुद्ध पण श्वास घेत असल्यास व्यक्तीला एका कडावर करणे, ज्याला रिकव्हरी पोझिशन म्हणतात. खालील सूचना पाळाव्यात:
- व्यक्तीला उलट्या करायला किंवा खायला किंवा प्यायला काही देऊ नये.
- ज्यामुळे हा त्रास झाला त्या गोळ्यांचे कंटेनर सांभाळून ठेवावे आणि रुग्णालयात दाखल करावे.
ड्रग ओव्हरडोजच्या उपचारासाठी विविध मार्ग खालीलप्रमाणे आहे:
- शरीरातून औषधे काढून टाकणे (ॲक्टिव्ह कार्बनसारखा पदार्थ रुग्णाला दिला जातो जो ड्रगच्या परिणामाला प्रतिबंधित करते, त्यामुळे शरीर ते शोषून घेऊ शकत नाही. कधीकधी ॲक्टिव्ह कार्बनच्या वापराने बद्धकोष्टता होते, त्यामुळे भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. हे काही प्रभावी औषधांच्या कार्यक्षमतेमध्ये हस्तक्षेप करते [विशेषतः स्त्रियाच्या ओरल गर्भनिरोधकांवर]). जेव्हाही शक्य असेल तेव्हा.
- अँटीडोट देणे (एक प्रतिजैव पदार्थ हा विषबाधेचा प्रतिकार करू शकतो), ज्यात नालोक्सोन हायड्रोक्लोराइड सारख्या पदार्थांचा समावेश असतो.
- उपचारांचे परिणाम बघण्यासाठी नंतर फॉलो-अप केले जाते. यामुळे डॉक्टरांना हे उपचार चालू ठेवावे किंवा आवश्यक असल्यास आणखी काही मदत करावी हे ठरवण्यास मदत होते.
- रुग्ण पूर्णपणे बर झाल्यानंतर आत्महत्येच्या प्रयत्न प्रकरणात मानसशास्त्रज्ञाशी सल्लामसलत देखील महत्वाची आहे.