कान दुखणे - Ear Pain in Marathi

Dr. Abhishek GuptaMBBS

November 30, 2018

March 06, 2020

कान दुखणे
कान दुखणे

कान दुखणे काय आहे ?

कान दुखणे, ज्याला कानदुखी म्हणून देखील संबोधले जाते, हे विविध वैद्यकीय परिस्थितींचे एक सामान्य लक्षण आहे. याचा परिणाम कोणालाही, कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होऊ शकते. बहुतांश घटनांमध्ये वेदना, गंभीर सूचक नाही आहेत, पण तीव्र वेदनांचा तपास करणे आवश्यक आहे.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

कान दुखणे सहसा इतर सामान्य चिन्हे आणि लक्षणांसह संलग्न असते आणि स्वतः काही रोगांचे लक्षण आहे. कान दुखणे कंटाळवाणे किंवा कमकुवत किंवा गंभीर किंवा तीक्ष्ण असू शकते. कान दुखीच्या सामान्य लक्षणांमध्ये हे समाविष्ट होतात:

  • काना मध्ये अडथळा.
  • ऐकताना त्रास होणे.
  • तोल राखण्यात समस्या.
  • अस्वस्थतेमुळे, व्यक्तीस झोपेची समस्या असू शकते.
  • जरी सामान्य नसले तरीही मुले आपल्या कानांमधून द्रवपदार्थ बाहेर पडल्याची तक्रार करु शकतात.
  • ताप.
  • खोकला आणि थंडी वाजणे.

याची मुख्य कारणं काय आहेत?

सर्वात सामान्य प्रकारात, संसर्ग किंवा दुखापतीमुळे कानात वेदना होऊ शकतात.हे संसर्ग कानाची पोकळी (ओटीशिस एक्स्टर्ना म्हणून देखील ओळखले जाऊ शकते) किंवा मध्य कान (ओटीशिस मीडिया देखील म्हटले जाते) असू शकते.

सामान्यत: कान दुखणे पुढील कारणांनी होऊ शकते:

  • बदलणारा वायू दाब (विशेषतः उड्डाणा दरम्यान).
  • कॉटन बडचा खूप वापर.
  • कानात मळ जमा होणे.
  • कानात शॅम्पू किंवा पाणी जमा होणे.

कानाच्या वेदना, क्वचितच, यामुळे होतात:

  • टेम्पोरोमंडिब्युलर जॉईंट सिंड्रोम (टीएमजे-TMJ).
  • ब्रेसेस असलेले दात.
  • दोषपूर्ण कानाचे पडदे (जसे कि छिद्र असलेले).

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

जर आपल्याला उपरोक्त रेखांकित लक्षणांपैकी काही लक्षणांचा अनुभव येत असेल तर आपण डॉक्टरकडे जावे. प्रभावी निदानासाठी, डॉक्टर शारीरिकरित्या तपासणी करतील.

आजारपण हे जीवाणू किंवा विषाणूजन्य संसर्गामुळे झाले आहे हे निश्चित करण्यासाठी डॉक्टर कानातून काही द्रव पदार्थाचे नमुने तपासू शकतात.

संसर्गाच्या किंवा वेदनांच्या तीव्रतेवर आधारित, कान दुखणे दूर करण्यासाठी डॉक्टर विविध उपाय सुचवू शकतात. त्यापैकी काही असे आहेत:

  • सतत त्रासदायक वेदना दूर करण्यासाठी मेडिकल स्टोअर मध्ये सहजरीत्या उपलब्ध असलेले वेदना शामक (पेन किलर्स) औषधांचा वापर.
  • आपणास वॉर्म कम्प्रेसिन किंवा हिट थेरेपी वापरण्याचा सल्ला देखील दिला जाऊ शकतो. आपण कापड उबदार पाण्यात बुडवून हळुवारपणे प्रभावी कानाच्या बाहेर लावू शकता.
  • गंभीर संसर्ग आणि द्रवपदार्थांच्या डिस्चार्ज झाल्यास, आपल्याला इअर ड्रॉप घेण्याकरिता देखील सांगितले जाऊ शकते.
  • दाब असंतुलनाच्या बाबतीत, आपणास साधारण च्यूइंग गम वापरण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो. हे आपणास दाब मुक्त करण्यास आणि वेदना कमी करण्यात मदत करते.



संदर्भ

  1. Health Navigator. [Internet]. New Zealand. Earache.
  2. Alberta Children's Hospital. [Internet]. Alberta Health Services; Edmonton, Alberta. Ear Pain.
  3. National Health Service [Internet] NHS inform; Scottish Government; Earache
  4. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Ear Infections
  5. Center for Disease Control and Prevention [internet], Atlanta (GA): US Department of Health and Human Services; Ear Infection

कान दुखणे साठी औषधे

Medicines listed below are available for कान दुखणे. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.