हृदंतस्तरशोथ (एन्डोकारडायटिस) काय आहे?
हृदयामध्ये तीन थर असतात ते म्हणजे पेरीकार्डियम, मायोकार्डियम आणि एंडोकार्डियम. जो सर्वात आतील थर आहे तो म्हणजे एंडोकार्डियम, यावर सूज येणे, याला हृदंतस्तरशोथ (एन्डोकारडायटिस) म्हणतात. सहसा एंडोकार्डियमवर जीवाणूंच्या संसर्गा मुळे सूज येते. जीवाणू तोंडावाटे आत जातात आणि रक्तप्रवाहापर्यंत पोहोचतात आणि शेवटी एंडोकार्डियमला प्रभावित करतात. एंडोकार्डिटिसला आक्रमक उपचार आवश्यक आहे कारण तो हृदयाला धोका पोहोचवू शकतो आणि त्यामुळे जीवघेणी गुंतागुंत उद्भवू शकते.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
जीवाणूंमुळे होणार्या संसर्गावर, लक्षणे हळूहळू किंवा वेगाने वाढू शकतात; त्याचप्रकारे त्यांचे वर्गीकरण अल्पकालीन किंवा दीर्घकालीन असे जाऊ शकते. हृदंतस्तरशोथ (एन्डोकारडायटिस) ची लक्षणे गंभीर परिस्थितीत बदलतात आणि ते पूर्व-विद्यमान वैद्यकीय किंवा हृदयविकाराच्या समस्यांवर अवलंबून असतात. काही लक्षणे खालील प्रमाणे असू शकतात:
- थंडी वाजून ताप येणे.
- श्वास घेण्यात अडचण (डीस्पनोई).
- श्वास घेताना छातीत दुखणे.
- पायांवर सूज येणे.
- पेटीशी (त्वचेवर लहान पिनहेडसारखे लाल डाग).
- थकवा.
- सांधेदुखी आणि अंगदुखी.
याची मुख्य कारणं काय आहेत?
काही जीवाणू जे शरीरात प्रवेश करतात, ते रक्ताद्वारे प्रवास करतात आणि हृदयापर्यंत पोहोचतात ज्यामुळे हृदंतस्तरशोथ (एन्डोकारडायटिस) होतो. जीवाणूंच्या व्यतिरिक्त काही बुरशी देखील हृदंतस्तरशोथ (एन्डोकारडायटिस) साठी कारणीभूत असू शकतात. हे जीवाणू रक्तप्रवाहात पुढील प्रमाणे प्रवेश करतात:
- तोंडावाटे.
- त्वचा आणि हिरड्यांचा संसर्ग.
- निर्जंतुक न केलेल्या सुया किंवा सिरिंजचा वापर किंवा विल्हेवाट लावलेल्यांचा पुन्हा वापर केल्याने.
- कॅथेटर्स आणि लेप्रोस्कोपसारखी वैद्यकीय उपकरणे.
जन्मजात हृदय रोग, हृदयाच्या वाल्वचा रोग, उच्च रक्तदाब, स्थापित कृत्रिम वाल्व, किंवा हृदयरोगाचा इतिहास असलेल्या लोकांना एन्डोकार्डिटिसचा धोका असतो.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
योग्य शारीरिक तपासणीसह अचूक वैद्यकीय इतिहास सहसा एंडोकार्डिटिसला प्रतिबिंबित करतो. मुरमुर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या असामान्य हृदयाच्या आवाजाचे स्वरूप शारीरिक तपासणीत दिसून येते. रोगाला कारणीभूत असणाऱ्या जीवाणू बद्दल माहिती असणे आणि एंडोकार्डियम ला झालेल्या जखमेची तीव्रता माहित असणे महत्त्वाचे आहे. म्हणून, काही तपासणी आवश्यक आहेत:
- संपूर्ण रक्त गणना (कम्प्लिट ब्लड काऊंट-CBC).
- अँटीबायोटिक संवेदनशीलता सह ब्लड कल्चर.
- सी-रीएक्टिव्ह प्रोटीन (सीआरपी-CRP) स्तराची चाचणी.
- इकोकार्डियोग्राम (2 डी इको म्हणूनही ओळखले जाते).
- सीटी स्कॅन.
एंडोकार्डिटिससाठी उपचार पद्धतींमध्ये समाविष्ट आहे:
- वैद्यकीय व्यवस्थापन - ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स किंवा कल्चरच्या अहवालांप्रमाणे तोंडी किंवा शिरेच्याआत दिले जाऊ शकते. कधीकधी, तापावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि शरीराचा वेदना आणि मळमळ कमी करण्यासाठी अँटिपायरेटिक्सचा वापर केला जाऊ शकतो.
- शस्त्रक्रिया व्यवस्थापन - हे रुग्णांना दिले जाते जे मिथ्राल स्नेनोसिससारख्या हृदयाच्या वाल्वच्या दुखापतींना बळी पडतात. मुख्यतः हृदयाच्या वाल्वचे कार्य पुनर्संचयित करण्यासाठी शस्त्रक्रिया केली जाते. हे एकतर खराब झालेले वाल्व दुरुस्त करून किंवा कृत्रिम वाल्व बसवून साध्य केले जाते.