पुरुषांच्या मूत्रमार्गावर सूज येणे काय आहे?
पुरुषांच्या मूत्रमार्गावर सूज येणे ही मूत्रमार्गाचा एक विकार आहे,ज्यात शुक्राणूंना अंडकोषापासून लींगापर्यंत पोहचवणाऱ्या नळीवर सूज येते.यामुळे मूत्रमार्गात इरिटेशन होते किंवा ते सुजते. ही स्थिती कोणत्याही वयात येऊ शकते, पण 14 आणि 35 वर्षाच्या दरम्यान ही सर्वात जास्त कॉमन आहे.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
सामान्यत: उद्भवणारी लक्षणे खालील प्रमाणे आहेत:
- अंडकोषाच्या भागात वेदना होणे.
- अंडकोष लालसर होणे आणि त्यावर सूज येणे.
- ताप येणे आणि थंडी वाजणे.
- त्रासदायी मूत्रविसर्जन.
याची मुख्य कारणं काय आहेत?
सर्वात कॉमन कारण म्हणजे सी ट्रॅकोमेटिस किंवा एन. गोनोरियामुळे होणारे संसर्ग, जे बऱ्याचदा लैंगिक संभोगाने पसरतात. मूत्रमार्गावर सूजेची इतर कारणांमध्ये मम्स (एक विषाणूजन्य संसर्ग) आणि क्षय रोग (जीवाणूजन्य संसर्ग) यांचा समावेश होतो. मुलांमध्ये, वयस्कर पुरुषांमध्ये आणि गुदामार्गद्वारे लैंगिक संभोग करणाऱ्या पुरुषांमध्ये, सामान्यत: ई. कोलाई जीवाणूमुळे हा संसर्ग होतो. जास्त वजन उचलल्यावर सहसा मूत्र परत मागे गेल्याने मूत्रमार्गावर सूज येते. जर याचा उपचार केला नाही तर अंडकोशामध्ये पस देखील जमा होऊ शकतो. यामुळे पुरुषांमध्ये प्रजननाशी संबंधित समस्या देखील उद्भवू शकतात.
याचे उपचार आणि निदान कसे केले जातात?
नाजूकपणा किंवा कुठलीही गुठळी तपासण्यासाठी शारीरिक तपासणी केली जाते.कोणताही जीवाणूजन्य संसर्ग ओळखण्यासाठी मूत्र चाचणी केली जाऊ शकते.अंडकोषक्षेत्र तपासण्यासाठी अल्ट्रासाऊंड तपासणीचे निर्देश दिले जाऊ शकतात.
इतर चाचण्यांमध्ये समाविष्ट असू शकते:
- संपूर्ण रक्त गणना (कम्प्लिट ब्लड काऊंट).
- क्लॅमिडीया आणि गोनोरियासाठी रक्त तपासणी.
उपचारामध्ये प्रामुख्याने अँटीबायोटिक्सच्या वापराचा समावेश आहे जे संसर्ग करणाऱ्या जीवाणूच्या प्रकारावर आधारित असते.
स्वत: ची काळजी घेण्यासाठी टिप्स:
- भरपूर विश्रांती घ्या.
- अस्वस्थता दूर करण्यासाठी स्क्रोटम वर करुन झोपणे.
- सहन होऊ शकेल,तसे त्या क्षेत्रात बर्फ लावणे.
- द्रवपदार्थांचे प्रमाण वाढवणे.
- वेदना शामक औषधं वेदना कमी करण्यात मदत करता.
प्रतिबंधक उपायांमध्ये खालीलचा समावेश होतो:
- संभोग करताना कंडोमचा वापर.
- परिस्थितीमध्ये सुधार होईपर्यंत जड वस्तू उचलण्याचे संपूर्णपणे टाळा.
- लांब काळापर्यंत बसणे टाळा.
जर अचानक तीव्र वेदना उद्भवल्या तर ती वैद्यकीय इमर्जन्सी समजली पाहिजे आणि तात्काळ वैद्यकीय तज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे.