चेहरा सुजणे म्हणजे काय?
चेहरा सुजणे हा अनेक रोगांचा आणि विकारांचा परिणाम आहे. यात चेहरा फुगलेला आणि सुजलेला दिसतो. हे एखाद्या अॅलर्जीमुळे किंवा कीटकदंशानी अचानक उद्भवलेले असू शकते तसेच बरेच दिवसापासून झालेले जसे की किडनी रोग ग्लोमेरूलोनेफ्रायटीस मुळे होऊ शकते.
याची प्रमुख चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
चेहरा सुजण्यामागील काही सामान्य करणे पुढीलप्रमाणे आहेत:
- सतत खाजवणे.
- चेहर्यावर सतत घट्टपणा जाणवणे.
- सूज आणि लालसरपणा.
- डोळे बंद करताना आणि उघडताना त्रास होणे.
याची प्रमुख कारणे काय आहेत?
चेहरा सुजण्यामागील सामान्यत: आढळणारी कारणे पुढीलप्रमाणे आहेत:
- अॅलर्जिक कंजंक्टीव्हायटीस.
- प्रिक्लांपसिया, ज्यामधे गरोदर महिला उच्च रक्तदाब आणि उच्च प्रथिन पातळीची तक्रार करतात.
- सेल्यूलायटीस ज्यात जीवाणु किंवा बुरशीचा त्वचेवरील भेगेतून किंवा चिरेतून पसरतात.
- काही विशिष्ट प्रकारच्या औषधांची अॅलर्जी झाल्यामुळे.
- हाइव्हज.
- अन्नाची अॅलर्जी.
- नाकाचे हाड मोडल्यास त्यामुळेही चेहर्याला सूज येते.
- पापणीचा स्टाय.
- कुपोषणामुळे होणारी प्रथिनांची कमतरता.
- किडनीच्या रोगामुळे होणारा प्रथिनांचा नाश.
- शस्त्रक्रियेचे परिणाम.
- हायपोथाइरॉडीजम.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
चेहर्यावरील सूज ओळखणे सोपी असली तरी त्याचे प्रमुख कारण ओळखने जास्त महत्वाचे असते आणि त्यासाठी डॉक्टरांची मदत घ्यावी लागते.
योग्य निदान करण्यासाठी डॉक्टर शारीरिक तपासणी करतात. बरेचदा याचे कारण अॅलर्जेन किंवा संसर्ग असते. सूज किती जास्त असते यावर आधारित डॉक्टर अॅलर्जी ची पुष्टी करायला चाचण्या सुचवू शकतात.
पुढे डॉक्टर अँटी अॅलर्जिक औषधे आणि कारण असलेल्या अॅलर्जनच्या संपर्कात येणे टाळणे सुचवतात. यापेक्षा कारक अॅलर्जनचा संपर्क टाळणे सर्वोत्तम असेल. आहारात नट्स आणि पॉवर फुड्स खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते.
कारणांवर आधारित अँटीबायोटिक्स, डाययुरेटिक्स किंवा प्रोटिन युक्त आहार सुद्धा सुचवँआ जाऊ शकतो.