गळपट्टीचा अस्थिभंग काय आहे ?
एकूण 2.6 - 5% अस्थिभंगापैकी गळपट्टीचा अस्थिभंग, ही मुलांमध्ये आणि वृद्धांमध्ये होणारी सामान्य दुखापत आहे. गळपट्टीचा अस्थिभंग हा गळपट्टीला, जो लांब, पातळ हाड आहे जे छातीच्या वरच्या भागाला आणि खांद्याला जोडून ठेवते ती तुटल्यामुळे होते. छातीच्या हाडाच्या दोन्ही बाजूला असे दोन गळपट्टी आहेत. गळपट्टीला वैद्यकीय भाषेत क्लॅव्हिकल म्हणतात.
याचे मुख्य खुणा आणि लक्षणे काय आहे?
सौम्य तुटलेल्या गळपट्टीचे लक्षणे खालील प्रमाणे आहे:
- अस्थिभंगाच्या जागेवर दुखणे.
- खांदा किंवा हात हालवल्यावर दुखणे.
- खांदा पूढे किंवा मागे झुकणे.
- जेव्हा तूम्ही तुमचा हात वर उचलता तेव्हा तुटल्यासारखा आवाज येतो किंवा पिसल्यासारखे वाटते.
- तुमच्या गळपट्टीजवळ खरचटणे, सुजणे, फुगणे किंवा नाजूक होऊ शकतो.
गंभीर स्वरूपाच्या अस्थिभंगाचे लक्षणे खालील प्रमाणे आहे:
- तुमच्या हातामधील आणि बोटामधील संवेदना आणि झिणझिण्या वाटणारी भावना कमी होते.
- अस्थिभंग झालेली गळपट्टी त्वचेच्या बाहेरून किंवा मधून बाहेर येते.
गळपट्टीच्या अस्थिभंगाच्या काही गंभीर समस्या खालील प्रमाणे आहे:
- रक्तवाहिनी किंवा मज्जातंतूला दुखापत होणे.
- वेळाने किंवा अपुरी जखम भरून येणे.
- हाडांमध्ये गाठ येणे: हे अस्थिभंग झालेल्या जागेवर होते.
- ऑस्टिओआरथ्रायटिस.
याचे मुख्य कारण काय?
सामान्य कारणे खालील प्रमाणे आहे:
- तुमचे खांद्यावर किंवा विस्तारले ल्या हातावर पडणे.
- खेळातील दुखापत: जेव्हा आपण खांद्याला आघात झालेला अनुभवतो तेव्हा हे होते.
- मोटरसायकल अपघात किंवा अपघात.
- जन्मजात दुखापत: बाळाला जन्म देताना बाळ बर्थ कॅनाल मधून जातांना हे होते.
अपवादात्मक कारणे खालील प्रमाणे आहे:
जमिनीवरून खाली पडणे: हे वयोवृद्ध लोकांमध्ये होते , ऑस्टिओपोरॉटिक व्यक्ती किंवा काही पॅथॉलॉजिकल परिस्थितीत हे होते.
याचे निदान आणि उपचार कसे करावे ?
गळपट्टीच्या अस्थिभंगाच्या निदानासाठी रुग्णाचा वैद्यकीय इतिहास आणि लक्षणे जाणून घेणे आवश्यक आहे.
रुग्णाच्या अस्थिभंगाच्या हाडाची शारीरिक तपासणी बसून किंवा उभे राहण्याच्या स्थिती वरून करण्यात येऊ शकते, आणि तुटलेल्या हाडाचे योग्य मूल्यमापन करणे आणि अस्थिभंगाच्या जागेवर च्या त्वचेची पाहणी करणे.
मज्जातंतूला किंवा रक्तवाहिनीला काही इजा किंवा क्षती झाली आहे का हे बघणे सुद्धा महत्वाचे आहे.
तपासणीमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे:
- एक्स - रे.
- सीटी स्कॅन.
गळपट्टीच्या अस्थिभंगाच्या उपचारासाठी शस्त्रक्रिया आवश्यक की अनावश्यक हे कोणत्या प्रकारचे अस्थिभंग झाले आहे यावर अवलंबून आहे.
शस्त्रक्रिया न करून करणारे उपचार
- हाताला आधार देणे: आधारासाठी स्लिंग चा वापर करणे आणि हालचालींवर मर्यादा ठेवणे.
- लक्षणानुसार आराम देणे: वेदनानाशक गोळ्या देणे.
- ताठरपणा न येण्यासाठी शारीरिक व्यायाम.
स्वतः घ्यायची काळजी:
- थंड कॉम्प्रेस चा वापर करणे
- कष्टाची शारीरिक क्रिया जसे खेळणे हे करू नका.
शस्त्रक्रियेचे उपचार
यामध्ये शस्त्रक्रियेद्वारा तुटलेले हाड एका जागेवर आणणे आणि त्याला त्याच्या जागेवरून हलण्यास रोखून ठेवले जाते.