सगळ्या बुरशीजन्य संक्रमणांना पूर्ण बरे होण्यासाठी बुरशीरोधी औषधोपचाराची गरज पडते. काही संक्रमण किरकोळ असतात आणि औषधोपचाराशिवाय ही त्यांची गहनता वाढू अगर कमी होऊ शकते, पण गहन बुरशीजन्य संक्रमण प्राणघातक असू श प्रकतात. बुरशीजन्य संक्रमणांचे उपचार खूप वेगवेगळे असू शकतात आणि बहुतांश स्थानिक उपचारानेचे बरे होत असूनही, इतर प्रकरणांमध्ये शस्त्रक्रियेची गरज पडू शकते. योग्य उपचारासाठी योग्य निदान आवश्यक असून, कोणतेही औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये.
बुरशीजन्य संक्रमणांसाठी काही सामान्य उपचाराचे पर्याय याप्रमाणे आहेत:
बुरशीविरोधी औषधे
बुरशीरोधी औषधे, संक्रमणाचे प्रकार व तीव्रतेनुसार स्थानिक, मौखिक किंवा इंजेक्शनद्वारे द्यायची असतात. बुरशीरोधी औषधे कोशिकांच्या भिंती नष्ट करून कोशिकांना मारून टाकतात. ते बुरशीचे प्रजनन आणि वाढ टाळूण्याचे कार्य ही करतात. बुरशीरोधी पदार्थींची रीघ बाजारामध्ये विभिन्न प्रकारांत उपलब्ध असतात. उदा. पोलिएन, ट्युब्युलिन डिस्रपुटर, एझोल्स, अलिअमिन, पिरामिडाइन एनॅलॉग आणि एकिनोकॅंडिन.
कॉर्टिकोस्टेरॉयड्स
कॉर्टिकोस्टेरॉयड्स किंवा स्टेरॉयड्स १९५०च्या दशकाच्या शेवटीपासून आजारांच्या उपचारात वापरली जात आहेत.
कातडीसाठी काही थानिक कॉर्टिकोस्टेरॉयड्स म्हणजे हाइड्रोकॉर्टिसोन, बीटामॅथॅसोन, क्लोबटॅसॉल, क्लोबटासोन/क्लोबटासोल, डाइफ्लूकॉर्टोलोन आणि फ्लुओसिनोलेन.
मौखिक कॉर्टिकोस्टेरॉयड्समध्ये प्रेडिनेसोलोन, प्रेड्निसोन, मेथाइलप्रेड्निसोलोन, डेक्सामेथासोन आणि हाइड्रोकॉर्टिसोनचे समावेश आहे.
नलिके किंवा वाहिनीत इंजेक्शनद्वारे द्यायची स्टॅरॉयडस म्हणजे हाइड्रोकॉर्टिसोन, मेथाइलप्रेड्निसोलोन आणि डेक्सामेथासोन. घुंगायच्या कॉर्टिकोस्टेरॉयड्समध्ये बेक्लोमेथासोन, फ्लुटिकासोन, ब्युडिसोनाइड, मोमेटासोन आणि सिस्लेसोनाइडचे समावेश आहे.
ब्रॉंकिअल आर्टरी(रक्तनलिका)चे एंबोलाइझेशन
हीमोगपायटिस एक आजार असतो, ज्याच्यात रुग्णाला खोकल्यात रक्त येते, आणि त्याचे उपचार, अतितीव्र बुरशीजन्य संक्रमणाच्या वेळी, ब्रॉंकिअल आर्टरीच्या एंबोलायझेशनद्वारे केले जाते. परिस्थिती सौम्य ते तीव्रही असू शकते, आणि तीव्रतेच्या प्रकरणांमध्ये रुग्णालयात भरती होणें आणि ब्लड ट्रांसफ्युझनची गरज पडते. तीव्रतेची प्रकरणे उपचारास कठीण आणि बहुतांशी अवर्तनीय असतात. जलद व वारंवार हस्तक्षेप व निदान परिस्थितीच्या विविध सहप्रभाव आणि तीव्रतेवर नियंत्रणासाठी महत्त्वाचे असते.
प्रतिरोध उपचारपद्धत( इम्युनोथेरपी)
व्यापक बुरशीजन्य संक्रमणाच्या वेळी, रुग्णाची प्रतिरोधक्षमता गंभीररीत्या प्रभावित होते. अनेकविध जंतूनाशके उपलब्ध असूनही, मृत्यूदर ४०% एवढीही असू शकते. इम्युनोथेरपीचे लक्ष रुग्णाची रोगप्रतिरोध प्रणालीमध्ये सुधार करून व्यापक बुरशीजन्य संक्रमणांना सामोरे जाणें असे असते.
- डब्ल्यू. बी.सी. ट्रांसफ्यूझन
यामुळे रुग्णाची प्रतिरोधक्षमता वाढून संक्रमणाचा सामना करण्यात मदत होते. तरीही, ट्रांस्फ्यूझ केलेल्या पांढऱ्या रक्तपेशींची गुणवत्ता महत्त्वाची असते. या ट्रांसफ्यूझनमुळे, जंतूनाशकाद्वारे सहज नियंत्रणात न येणाऱ्या तीव्र संक्रमणांमधील वाढीवर नियंत्रण मिळण्यास मदत होते.
- ग्रॅन्युलोकाइट कॉलॉनी- संप्रेरक घटक
या पद्धतीचे लक्ष अस्थीमज्जेद्वारे पांढऱ्या रक्तपेशींच्या उत्पादनाला संप्रेरन मिळणे असते आणि प्रतिरोधप्रणालीच्या इतर भागांवर तिचे प्रभाव होते.
- गामा इंटर्फिअरॉन
गामा इंटर्फिअरॉन प्रतिरोधक कोशिकांच्या घडणीमध्ये सुधार आणून त्यांना बुरशींचे अधिक नाश करण्याची शक्ती देते.
शस्त्रक्रिया
बुरशीजन्य संक्रमणांच्या तीव्र प्रकरणांमध्ये, इतर उपचार पर्याय अपयशी ठरल्यावर, शस्त्रक्रियेची गरज पडू शकते.
मेंदू
- ग्रॅन्युलॉमा किंवा सायप्टोकोकोमा
रुग्णांना, विशेषकरून निचरा कर्करोगजनक असल्याचा धोका असल्यास, संक्रमित निचरा शस्त्रक्रियेद्वारे काढून घ्यावा लागतो. रुग्णांवर बुरशीरोधी उपचार खूप वेळ झालेल्या असल्यास, सूक्ष्म जीव स्थिर टप्प्यात असू शकतो आणि पुढील उपचाराने फायदा होत नाही, अशा वेळी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जातो.
- सेरेब्रल एब्सेस
एब्सेसच्या स्थितीनुसार स्टिरिओटॅक्टिक ड्रेनेज किंवा एब्सेस संपूर्णपणें काढण्याची गरज भासू शकते.
डोळे
- एंडोप्थॅल्माइटिस
बुरशीजन्य एंडोप्थॅल्माइटिसच्या अधिकतर प्रकरणांमध्ये सूक्ष्म जीव व निचरा काढण्यासाठी वायरेक्टॉमीचा सल्ला दिला जातो.
- केराटिटिस
विशेषकरून गहन कॉर्निअल लेझन असल्यास अशा परिस्थितीच्या उपचारासाठी शस्त्रक्रियेची गरज पडू शकते, कारण 50% पेक्षा अधिक रुग्ण बुरशीरोधी उपचारपद्धतीला सकारात्मक प्रतिसाद देत नाहीत.
नाक
क्रोनिक सायनसायटीस असल्यास, शस्त्रक्रियेने सर्व अलर्जिक म्युसिन, बुरशीजन्य निचरा आणि नेझल पॉलिप्स काढण्यात येतात व मूळभूत म्युकोसाचे संरक्षण केले जाते.
- सायनसचे फंगल बॉल
फंगल बॉल शस्त्रक्रियेने काढल्यास आजार बरा करण्याचा बरापैकी उच्च दर असतो. काही वेळा, स्थानिक पसार टाळण्यासाठी एका बुरशीविरोधी उपचारपद्धतीचीही गरज असते.
कान
कानामध्ये बुरशीजन्य संक्रमण झाल्यास, खूप वेळा नष्ट झालेले तंतू हाडापर्यंत शस्त्रक्रियेने काढावे लागते आणि संक्रमित बाजूला संपूर्णपणें श्रवणशक्ती जाण्याचा संभव असतो.
फुफ्फुसे
- इन्व्हेसिव्ह पल्मनरी एस्परगिलोसिस
रक्तनलिकांना यामध्ये हेमरेजचा धोका असल्याने आपत्कालीन शस्त्रक्रिया करून प्राण वाचवावे लागतात.
- एस्परगिलोमा आणि क्रोनिक पल्मनरी एस्परगिलोसिस
शस्त्रक्रियेमध्ये वाचण्याची शक्यता अधिक असते आणि त्याने आजाराचा पसार टाळले जाऊन पुढील गुंतागुंतीही होत नाहीत.
हॄदय
- पेरिकार्डिटिस
पेरिकार्डिटिसमुळे अडसर असल्यास, पेरिकार्डिएक्टॉमी किंवा पेरिकार्डिअमचा एक भाग काढून टाकण्याची गरज पडू शकते. शस्त्रक्रिया करणापूर्वी आरंभी, संक्रमणाचे नियंत्रण करण्यासाठी छाननीची जरूरही असू शकते.
- एंडोकार्डिटिस संक्रमण
अशा संक्रमणासाठी शस्त्रक्रिया सर्वांत योग्य उपचार पर्याय व लवकरात लवकर करायचे असते. गुंतागुंती वाढल्यानंतर बरे होणें साधारणपणें कठिन जाते.
- पेसमेकर आणि कार्डिओव्हर्टर- डिफिब्रिलेटर वायर संक्रमणः अशा प्रकरणात, स्टर्नोटॉमी आणि कार्डिओपल्मनरी बायपास सर्जरीशिवाय सिसा काढण्याचीही गरज असते.
हाडे
- स्टर्नल वूंड संक्रमण
यामध्ये, डिब्राइडमेंट आणि संक्रमित क्षेत्रातून तारी काढण्यासाठी शस्त्रक्रिया केली जाते. त्यानंतर बुरशीविरोधी उपचारपद्धती अवलंबली जाते.
- वर्टेब्रल बॉडी संक्रमण
हाडांच्या या संक्रमणामध्ये निचरा काढण्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागते. परिस्थितीनुसार बोन ग्राफ्टिंगची गरजही पडू शकते.
जीवनशैली व्यवस्थापन
विशिष्ट प्रकारची जीवनशैली माणसाला बुरशीसारख्या पर्यावरणातील रोगकारक पदार्थांचा धोका निर्माण करते. तुम्हाला बुरशीजन्य संक्रमण वारंवार होत असल्यास आणि कारण तुमचे काम उदा. बागवानी किंवा टॅटू काढणे याच्याशी संबंधित असल्यास, व्यवसायात बदल केल्याने समाधान होऊ शकते. डॉक्टर पुनरावर्ती एलर्जी असलेल्या लोकांना हवामान बदल करण्याचे सुचवतात. जीवनशैली बुरशीजन्य संक्रमणामध्ये मोठी भूमिका बजावत नसली, तरी जीवनशैली व्यवस्थापनामुळे वारंवार होणाऱ्या एलर्जिक प्रतिक्रियांमध्ये आराम मिळू शकते.