गॅस्ट्रोइंटेस्टीनल स्ट्रॉमल ट्युमर्स म्हणजे काय?
गॅस्ट्रोइंटेस्टीनल स्ट्रॉमल ट्युमर्स हे दुर्मिळ प्रकारचे ट्युमर्स अन्ननलिकेच्या पेशींमध्ये आढळतात. हे जोडणार्या टिश्यूंवर होणारे ट्युमर्स असतात. ते मॅलिग्नंट (कर्करोगीय) किंवा बेनिग्न (विना कर्करोगीय) असू शकतात.
याची प्रमुख चिन्हे व लक्षणे काय आहेत?
- हे ट्युमर्स प्रामुख्याने अन्ननलिकेतील रक्तस्त्रावामुळे लक्षात येतात. या रक्तस्त्रावामुळे ॲनिमिया होऊ शकतो.
- ट्युमर प्रामुख्याने पोटात किंवा छोट्या आतड्यांमध्ये वाढतात
- यामध्ये पोटदुखी व वातासोबत वजन बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकते.
- यामध्ये मळमळ व उलट्यांसोबत गिळण्यामध्ये त्रास होतो.
- जसा ट्युमर वाढतो, तसेच माणसाला पोट जड झाल्यासारखे वाटते. जर तो पसरला तर तर यकृतासारख्या अवयवांवर परिणाम होऊ शकतो.
याची प्रमुख कारणे काय आहेत?
- जीआयएसटी सॅक्रोमाचा भाग असतात, म्हणजे ते जोडलेल्या टिश्यू मधील ट्युमर्स असतात.
- काही बाबतीत जीआयएसटी आनुवंशिक असतात, असे असल्यास ते इतर गंभीर विकारांसोबत होऊ शकतात.
- आनुवंशिक बदलांमुळे जी आय एस टी होऊ शकतात. त्यांच्या कारणांबाबत बरेच संशोधन सुरू आहे.
- इतर ट्युमर्स प्रमाणे बरूचदा, या ट्युमर्सचे कारण कळू शकत नाही.
- जी आय एस टी वृद्ध व्यक्तींमध्ये सामान्यपणे दिसून येतात आणि ट्युमर वाढण्याचा धोका वयानुसार वाढत जातो.
याचे निदान व उपचार कसे केले जातात?
सुरुवातीला, डॉक्टर तुमचा वैद्यकीय इतिहास व तुमची सध्याची लक्षणे जाणून घेतात. निदानाच्या पायऱ्या पुढीलप्रमाणे आहेत:-
- सामान्यपणे तोंड, अन्ननलिका, पोट यांचे परिक्षण महत्त्वाचे असते, जर ट्युमर आढळला तर पुढील चाचण्या गरजेच्या असतात.
- अल्ट्रासाऊंड सोबत एंडोस्कोपी करुन अन्ननलिकेची चाचणी केल्यामुळे पोटातील ट्युमर चे बरोबर वजन, जागा, ठिकाण समजते.
- अंतिम निर्णयापर्यंत पोचण्यासाठी ट्युमरचा काही भाग बाहेर काढला जातो.
- ट्युमरचा उपचार करताना पोटाच्या आतल्या भागातील ट्युमरची वाढ रोखली जाते किंवा लॅब्रोस्कोपी करुन रोखली जाते.
- तरी बरेच मोठे ट्युमर शस्त्रक्रियेद्वारे पूर्णपणे काढून टाकणे अशक्य असते.
- किमोथेरपीचा भाग म्हणून ट्युमरचा आकार कमी करण्यासाठी काही वेळेस रुग्णाला औषधे दिली जातात.
- जे ट्युमर शस्त्रक्रियेने कमी करता येत नाहीत त्यासाठी रेडिएशन शस्त्रक्रियेचा पर्याय वापरला जातो.