जननेंद्रियातील हर्पिस म्हणजे काय?
एक लैंगिक संबंधातून पसरणारा आजार, जननेंद्रियातील हर्पिस हा एक सामान्य आजार असून तो हर्पिस व्हायरस मुळे होतो. तो मुख्यतः जननेंद्रिय, गुदद्वार व तोंडाच्या भागावर परिणाम करतो. ह्या आजारापासून जीवाला काही धोका नसला तरी याचा पूर्ण उपचार उपलब्ध नाही आहे.
अभ्यासातून असे समोर आले आहे की, हर्पिस मुळे एचआयव्ही संसर्गाचा धोका वाढू शकतो. डेटा नुसार भारतामध्ये हा आजार पसरण्याचा धोका कमी आहे.
याची प्रमुख लक्षणे व चिन्हे काय आहेत?
सुरुवातीला रुग्णाला कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत किंवा लक्षात येत नाहीत. सर्वप्रथम लक्षणे ही संसर्गाच्या 2-10 दिवसांमध्ये जाणवतात. काही सामान्य लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत:
- ताप.
- डोकेदुखी.
- अशक्तपणा.
- मळमळ.
- स्नायू दुखी
- जननेंद्रिय, गुदद्वार व ओठांवर पाण्याचे फोड येणे.
- मुत्रविसर्जनावेळी जळजळ.
- जननेंद्रियांमध्ये दुखणे.
- योनीच्या कार्यात अडथळे.
पाण्याचे फोड फुटतात व व्रण न सोडता बरे होतात. हे संसर्गानंतर 15-23 दिवसांनी होते. या संसर्गामध्ये फ्लू सारखी लक्षणे दिसत नाही व वेदना कमी तापदायक असतात. फोडांची संख्या कमी होते व आठवडाभरात पूर्णपणे नष्ट होतात. प्रत्येकाने अनुभवलेली लक्षणे वेगवेगळी असू शकतात.
याची प्रमुख कारणे काय आहे?
जननेंद्रियातील हर्पिस हा आजार 2 व्हायरस मुळे होतो: हर्पिस सिंपलेक्स व्हायरस 1 (एच एस व्ही 1) व हर्पिस सिंपलेक्स व्हायरस 2 (एचएसव्ही 2).
एचएसव्ही 2 हा जननेंद्रिय,गुदद्वार, नितंबामधील अल्सर चे प्रमुख कारण आहे, तर एच एस व्ही 1 हा तोंडाच्या भागासाठी चे कारण आहे.
हर्पिस व्हायरस लैंगिक संबंधात संसर्गजन्य फोडांतून पसरतो (योनीमधील, गुदद्वार किंवा तोंडावाटे). फोड नसेल तरीदेखील संसर्ग पसरू शकतो.
याचे निदान व उपचार कसे केले जातात?
जर तुम्ही वर उल्लेख केलेल्या लक्षण अनुभवत असाल तर, तुम्ही व तुमच्या साथीदाराने डॉक्टरांना भेटावे. डॉक्टर पहिल्यांदा व्हायरस तपासण्यासाठी फोडातून (असल्यास) पाण्याचे नमुने घेतील. फोड नसल्यास व्हायरस जाणून घेण्यासाठी रक्त तपासणी केली जाते.
सारखे होणारे संसर्ग रोखण्यासाठी व वेदना कमी करण्यासाठी डॉक्टर अँटी व्हायरल औषधे देतात. वेदना पूर्णपणे मिटवणारी औषधे देखील दिली जातात. दुर्दैवाने, यावर कोणताही उपचार उपलब्ध नसला तरी पसरणारा संसर्ग हे नियम पाळून तुम्ही कमी करू शकता:
- लैंगिक संबंधांवेळी निरोधचा वापर.
- जर तुमच्या साथीदाराला अशा प्रकारचे फोड असल्यास लैंगिक संबंध टाळा.
- एका पेक्षा जास्त साथीदार टाळा.