जियार्डायसिस म्हणजे काय?
जियार्डायसिस हा जियार्डिया लांब्लीआ नावाच्या घटकामुळे छोट्या आतड्यात होणारा संसर्ग आहे. जियार्डिया लांब्लीआ हा एक जिवाश्म आहे जो जिवंत गोष्टींमध्ये राहतो, जसे मानव, प्राणी जसे, मांजर, कुत्रा, गाय, शेळी. यांच्यामधील आतड्यात राहून ते स्वतः भोवती एक कवच निर्माण करते ज्याला सिस्ट म्हणतात. विष्ठेद्वारे हे सिस्ट बाहेर पडते व जोपर्यंत दुसरी जिवंत गोष्ट सापडत नाही, तोपर्यंत शरीराबाहेर राहते.
जियार्डायसिस हा बहुतांशी भारतीय लोकसंख्येत आढळतो. हा उत्तर भारतात 5.5-70% प्रमाणात आढळते, तर दक्षिणेत 8-37.1% प्रमाणात आढळतो. प्रौढांपेक्षा बालकांमध्ये हा प्रमाण जास्त पाहिल्या जातो.
याची प्रमुख चिन्हे व लक्षणे काय आहेत?
संसर्गाच्या 7-25 दिवसांमध्ये लक्षणे दिसतात. काही लोकांमध्ये ही लक्षणे दिसून येत नाहीत. तरी सामान्यपणे दिसणारी लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत:
ताप देखील येतो पण दुर्मिळ आहे.
याची प्रमुख कारणे काय आहेत?
जियार्डायसिस छोट्या बॉवेलमधील संसर्ग जिअर्डिया इंटेस्टेनालीस किंवा जियार्डिया लांब्लीआ या जिवाश्मामुळे होतो. हा मुख्यतः अशुध्द अन्नामधील जिवश्माच्या सिस्ट मधून पसरतो. हा संसर्ग पसरण्याची इतर कारणे पुढीलप्रमाणे आहे:-
- अशुद्ध पिण्याचे पाणी जसे तलाव, नदी,किंवा कालव्यामधील, मुख्यतः गिर्यारोहकांमध्ये दिसून येतो.
- ज्या स्विमिंग पूल मध्ये जियार्डायसिस चे जीवाश्म आहेत अशा ठिकाणी पोहणे.
- संसर्गित व्यक्ती सोबत लैंगिक संबंध ठेवून, ज्यात फिकल द्रव्याशी संबंध येतो.
- न शिजलेले मांस खाणे.
- शौचालय वापरल्यावर हात न धुणे.
याचे निदान व उपचार कसे केले जातात?
लक्षणांनुसार तुमचे डॉक्टर तुम्हाला विष्ठेची चाचणी करण्यास सांगतील.काही वेळेस तुम्हाला बरेचदा विष्ठेचे नमुने द्यावे लागू शकतात.
अँटीमायक्रोबिअल्स हा जियार्डायसिस च्या उपचाराचा एक प्रकार आहे. हा उपचार 3-7 दिवस चालतो. जुलाबामुळे पाण्याचे कमी झालेले प्रमाण सारखे पाणी घेऊन संतुलित केले जाते.
तुम्ही खालील गोष्टी करून हा संसर्ग टाळू शकता:
- तलाव, नदी मधील पाणी पिणे टाळा.
- फक्त उकळलेले पाणी प्या.
- शौचालय वापरल्यावर किंवा बाळाचे डायपर बदलल्यावर हात साबणाने स्वच्छ धुवा.
तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांना किंवा इतरांना हा संसर्ग होण्यापासून वाचवू शकता:
- जुलाब कमी झाल्यानंतर 24 तास होईपर्यंत तुमच्या मुलाला शाळेत पाठवू नका.
- तुम्हाला अशी लक्षणे दिसल्यास स्वयंपाक करू नका.
- तुमची लक्षणे कमी झाल्याशिवाय तुमच्या घरातील वस्तू कोणाला वापरायला देऊ नका.