हिरड्यांना आलेली सूज म्हणजे काय?
हिरड्यांना आलेली सूज हा, दातावर प्लाक तयार झाल्याने होणारा इन्फ्लेमेटरी आजार आहे. प्लाक हा नैसर्गिक चिकट द्रवासारखा पदार्थ आहे, ज्यामध्ये बॅक्टरिया असतात व जो दाताच्या पृष्ठभागावर जमा होतो. प्लाक हा दाताच्या मधल्या भागातही जमा होऊ शकतो. जर योग्य काळजी घेतली नाही तर ह्यामुळे हिरड्यांना धोका निर्माण होतो व दातांना नुकसान पोहोचते.
याची संबंधित लक्षणे व चिन्हे काय आहेत?
तुम्ही खालील लक्षणे अनुभवत असाल तर तुम्हाला जींजिव्हायटीस असू शकतो म्हणजेच हिरड्या सूजल्या असू शकतात:
- लाल व सुजलेल्या हिरड्या.
- हिरड्या मधून रक्तस्त्राव.
- हिरड्या दुखणे.
- श्वासातून घाण वास येणे (अधिक वाचा:- घाण श्वसाची कारणे).
- थंड किंवा गरम खाद्य पदार्थांबद्दल संवेदनशीलता (अधिक वाचा:- दातांच्या संवेदनशीलतेवरील उपचार).
- दात खिळखिळे होणे.
नयाची मुख्य कारणे काय आहेत?
प्लाक तयार होणे हे जींजिव्हायटीसचे मुख्य कारण आहे. प्लाक मध्ये असणारा बॅक्टरिया हिरड्यांवर परिणाम करून त्यांना संसर्गित करतो व त्यामुळे रक्तस्त्राव होतो. हा प्लाक घट्ट होऊन एक पदार्थ तयार करतो ज्याला टारटार म्हणतात, जो प्लाक पेक्षाही घट्ट असतो.
हिरड्या सुजण्याचा धोका वाढवणारे घटक खालीलप्रमाणे आहेत:
- तोंडाची योग्य स्वच्छता न राखणे.
- धूम्रपान व तंबाखू सेवन.
- गर्भधारणा.
- चुकीचा आहार.
- ताण.
- मधुमेह, एचआयव्ही संक्रमण, कर्करोग या सारखे आजार.
- अँटी-एपिलेप्टिक ड्रग्स, कर्करोगाची औषधे, तोंडावाटे गर्भ निरोधक व स्टेरॉइड औषधांचे सेवन.
याचे निदान व उपचार कसे केले जातात?
तुमच्या डेंटिस्ट कडून नियमित तपासणी करून घेतल्यास हिरड्यांवरील सुजेचे निदान वेळेआधीच म्हणजे जेव्हा ते वेदनारहित असते तेव्हा केले जाते. उपचारांमध्ये प्लाक एका विशिष्ट उपकरणाने काढून टाकला जातो.
जर तुम्हाला दुखत असेल तर दुखणे कमी होण्यासाठी डेंटिस्ट तोंडावाटे पेनकीलर घेण्याचा सल्ला देतात. काही बाबतीत अँटिबायोटिक सुध्दा दिले जातात. जर जास्त प्रमाणात संसर्ग झाला असेल तर दात काढून टाकणे गरजेचे असते.
खालील गोष्टी करून तुम्ही जींजिव्हायटीस नक्की रोखू शकता:-
- दिवसातून दोनदा दात घासा.
- दिवसातून एकदा नीट फ्लॉसिंग करा.
- नियमित माऊथ वॉश वापरा.
- काही रंग बदलासाठी तुमच्या हिरड्या नियमित तपासा.
- नियमित दातांची तपासणी करा.