गोनोरिया (परमा) काय आहे?
गोनोरिया लैंगिक संसर्गित रोग आहे, जो निस्सेरिया गोनोरोई या जीवाणूमुळे होते. ज्या व्यक्तीला संसर्ग झाला आहे त्या सोबत असुरक्षित संभोग केल्याने हा रोग पसरतो.
त्याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
गोनोरिया असलेल्या व्यक्तींमध्ये सामान्यत: कोणतीही चिन्हे आणि लक्षणे नसतात आणि उपस्थित असल्यास, बहुधा सौम्य असतात. मूत्रविसर्जन करताना, जळणाऱ्या संवेदना गोनोरियाचे एक सामान्य लक्षण आहे.
पुरुषांमधील लक्षणांमध्ये समाविष्ट आहेतः
- लिंगातून डिस्चार्ज जे पांढऱ्या, पिवळ्या किंवा हिरव्या रंगाचे असू शकते.
- सुजलेले किंवा वेदनादायी अंडकोष (क्वचितच पाहायला मिळतात).
स्त्रियांमधील लक्षणांमध्ये समाविष्ट आहेतः
- मासिक पाळी दरम्यान योनीतून असामान्य रक्तस्त्राव.
- योनीतून वाढलेले डिस्चार्ज.
पुरुष आणि स्त्रिया दोघांमध्ये संसर्गाच्या सामान्य लक्षणांमध्ये समाविष्ट आहेत:
- वेदना.
- रक्तस्त्राव किंवा डिस्चार्ज.
- गुदाद्वारमध्ये खाज.
- आतड्यांची वेदनादायक हालचाल.
याची मुख्य कारणं काय आहेत?
हा जीवाणू, संसर्ग झालेल्या लोकांच्या विर्यात (कम), प्री-कम आणि योनीतील द्रवामध्ये आढळतो आणि म्हणून हे प्रामुख्याने असुरक्षित योनी, गुदा किंवा तोंडी संभोग केल्याने पसरू शकतो. संसर्ग झालेल्या द्रव्यासोबत दूषित हात डोळ्यांना लावल्याने डोळ्यात संसर्ग होऊ शकतो. बाळाच्या जन्मावेळी संसर्ग झालेल्या आईच्या नवजात बाळालासुद्धा हा संसर्ग होऊ शकतो.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
सुरूवातीला, डॉक्टरांद्वारे पूर्ण वैद्यकीय इतिहास घेतला जाईल त्यानंतर पूर्ण शारीरिक तपासणी केली जाईल. यावर अवलंबित, डॉक्टर खालील चाचण्यांचा सल्ला देतील :
- संसर्गित क्षेत्र पुसून टाकणे आणि नमुन्यांची तपासणी करणे.
- गोनोरिया चाचणी - कल्चर, नमुन्यांची सूक्ष्म तपासणी आणि न्यूक्लिक ॲसिड ॲम्प्लिफिकेशन टेस्ट (एनएएटी-NAAT).
- चाचणीसाठी मूत्र नमुना गोळा करणे.
उपचार पद्धतींमध्ये समाविष्ट आहे:
- ड्युअल थेरपी अँटीबायोटिक्स, जे तोंडी स्वरुपात एक डोस म्हणून आणि एक इंजेक्शन इंट्रामस्क्यूलर म्हणून प्रशासित केले जाते.
- संसर्ग झालेल्या व्यक्तीसोबत लैंगिक साथीदाराचे संबंध असल्यास त्यांना अनिवार्य चाचणी आणि उपचारांची सल्ला देण्यात येतो.(निदानच्या 60 दिवसांच्या आत)
- गोनोरियासाठी उपचार केलेल्या व्यक्तींसाठी फॉलोअप चाचणी.
- ज्या व्यक्तींना गोनोरियाचा उपचार केला जातो त्यांना क्लेमॅडिया चा उपचार देखील करावा लागतो.
- उपचार पूर्ण होईपर्यंत सेक्स टाळला पाहिजे (एक डोस उपचारानंतर, सेक्स करण्यापूर्वी 7 दिवस प्रतीक्षा करा).