शीतपित्त - Hives in Marathi

Dr. Ayush PandeyMBBS,PG Diploma

December 06, 2018

October 28, 2020

शीतपित्त
शीतपित्त

शीतपित्त म्हणजे काय?

शीतपित्त, ज्याला गांदी उठणे किंवा गाठी येणे असेही म्हटले जाते, ही एक त्वचेची अशी स्थिती आहे ज्यामध्ये त्वचेवर लालसरपणा किंवा त्वचेवर काही तरी उठते जसे की रॅश येते. सामान्यतः ॲलर्जी प्रतिसाद म्हणून सुरुवात होऊ शकते, शीतपित्त हे वेगवेगळ्या आकाराचे असतात आणि काही दिवस टिकतात किंवा सहजपणे अदृश्य होतात. तीव्र शीतपित्त हे असे शीतपित्त आहे जे 6 आठवड्यांपेक्षा कमी काळ टिकते. बहुतेक शीतपित्त काही दिवसांत अदृष्य होतात. परंतु, दीर्घकालिन शीतपित्त उपचार न घेता 6 आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकू शकते.

त्याचे मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

  • शीतपित्त,चे अति सामान्य लक्षण म्हणजे त्वचावर उंचवटा येऊन अडथळा.
  • हे अडथळे लाल, गुलाबी किंवा त्वचेचे रंगाचे असू शकतात.
  • उंचवटा झालेल्या भागाच्या भोवती काही खरुज किंवा जळजळ होऊ शकते.
  • शरीरातल्या नवीन भागांमध्ये शीतपित्त सहजपणे दिसू लागतात आणि अदृश्य होतात.
  • शीतपित्त असलेली त्वचा जेव्हा दाबून सोडली जाते तेव्हा पांढरेपण दिसून येते याला ब्लँचिंग हा शब्द वापरला जातो.

त्याचे मुख्य कारण काय आहेत?

  • ॲलर्जी हे शीतपित्त होण्याचे सर्वात सामान्य कारण आहे.  विशिष्ट प्रकारचे ॲलर्जेन लोकांमध्ये असतात.
  • मासे, दूध, चॉकलेट्स, नट्स, ऑयस्टर, शेलफिश इ. या अन्न पदार्थमुळे देखील   शीतपित्त होऊ शकते.
  • कीटक चावण्याने किंवा सल्फा औषधेसारख्या काही औषधे मुळे अर्टिकारिया होऊ शकतो.  
  • हेपेटायटीस आणि दुर्बलता यासारख्या सिस्टमिक आजारांमुळे दीर्घकालीन शीतपित्त होऊ शकते.
  • सूर्यप्रकाश, सर्दी, उष्णता इत्यादि बाधा झाल्यास शारीरिक शीतपित्त होतात.

याचे निदान आणि उपचार कसे केले जाते?

शीतपित्तासाठी विशिष्ट निदानाची चाचणी नाही आहे. तुमच्या लक्षणांवर आधारित, डॉक्टर तुम्हाला तुमच्या अलीकडीच्या सवयी, अन्न, ज्ञात अँलर्जी इ. बद्दल विचारतील. ॲलर्जीचे कारण निर्धारित होण्याआधी थोडा वेळ लागू शकतो. संसर्ग असल्याचा संशय असल्यास रक्त तपासणीचा सल्ला दिला जातो. शीतपित्ताच्या ॲलर्जीक स्वभावची पुष्टी करण्यासाठी, तुमच्या डॉक्टरांद्वारे IgE रक्त तपासणी करता येऊ शकते.

एकदा का हे ओळखले गेले की, तुमच्या आहारातील तो पदार्थ काढून टाकणे किंवा त्याच्या संपर्कात रहाणे टाळण्याने शीतपित्तचा उपचार केला जातो. अँन्टी-हिस्टामाइन्स सारख्या औषधे लक्षणातून मुक्त करण्यात मदत करतात. गंभीर प्रकरणांमध्ये, शीतपित्ताचा उपचार करण्यासाठी अँड्रेनलाइन इंजेक्शन दिले जातात. शीतपित्त इतर रोग किंवा संक्रमणांशी संबंधित असल्यास, रोगाचा उपचार झाल्यानंतर ते सहसा सोडतात.

 



संदर्भ

  1. Singleton R, Halverstam CP. Diagnosis and management of cold urticaria.. Cutis. 2016 Jan;97(1):59-62. PMID: 26919357
  2. The New England Journal of Medicine. [Internet]. Massachusetts Medical Society. Chronic Urticaria and Angioedema.
  3. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Hives.
  4. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Hives.
  5. S J Deacock. An approach to the patient with urticaria. Clin Exp Immunol. 2008 Aug; 153(2): 151–161. PMID: 18713139

शीतपित्त साठी औषधे

Medicines listed below are available for शीतपित्त. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.