हायपरहायड्रोसिस काय आहे ?
मानवी शरीराच्या मुख्य घामांच्या ग्रंथींवरील (स्वेट ग्लॅण्ड) रिसेप्टर्स जास्त प्रमाणात उत्तेजित झाल्याने जास्त प्रमाणात घाम येण्याची स्थिती हायपरहायड्रोसिस म्हणून ओळखली जाते. या विकाराने प्रभावित शरीराचा भाग हा घाम ग्रंथीच्या स्थानावर आधारित असतो.
हायपरहायड्रोसिस चे दोन प्रकार आहेत:
- प्राथमिक (प्रायमरी) हायपरहायड्रोसिस: ही स्वतःच एक वैद्यकीय स्थिती आहे
- माध्यमिक (सेकंडरी) हायपरहायड्रोसिस: हे काही अंतर्निहित स्थितीच्या परिणामामुळे होत असते.
त्याची संबंधित चिन्हं आणि लक्षणं कोणती आहेत?
घामाचे जास्त प्रमाणात गळणे लाजिरवाणे असू शकते आणि सामाजिक चिंता वाढवू शकते.
प्रायमरी हायपरहायड्रोसिसशी संबंधित चिन्हे आणि लक्षणे खाली दर्शविली आहेत:
- घामाचे गळणे शरीराच्या लहान भागात जसे की दोन्ही उजव्या आणि डाव्या काखा, तळहात, पायांचे तळवे आणि चेहऱ्यावर होते.
- दोन्ही हात आणि पायांवर एकसारखा जास्त घाम येऊ शकतो.
- झोपेत घाम येत नाही.
- हे सामान्यतः किशोरावस्थेत किंवा वयाच्या 25 व्या वर्षा आधी सुरू होते.
सेकंडरी हायपरहायड्रोसिसशी संबंधित चिन्हे आणि लक्षणे पुढील प्रमाणे आहेत:
- घाम गळती शरीराच्या कुठल्याही विशिष्ट भागात होत नाही पण ते अधिक सामान्य असते.
- हे सहसा अंतर्भूत वैद्यकीय स्थितीसह होत असते.
- झोपेत देखील घाम जास्त प्रमाणात येत असतो.
याची मुख्य कारणं काय आहेत ?
हायपरहायड्रोसिसचे कारण अस्पष्ट आहे. अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की प्राथमिक हायपरिड्रोसिसमध्ये अनुवांशिक घटक महत्वाची भूमिका बजावतात. हायपरहायड्रोसिसच्या यंत्रणेमध्ये समाविष्ट आहे:
- महत्वाच्या घाम ग्रंथी जास्त प्रमाणात स्त्रावित होणे.
- हार्मोन अभिप्राय यंत्रणा व्यवस्थित काम न करणे.
काही अंतर्भूत वैद्यकीय परिस्थितींचा ज्यामुळे सेकंडरी हायपरहायड्रोसिस होऊ शकतो त्यांचा खाली उल्लेख केला आहे:
- मधुमेह.
- हृदयाशी संबंधित आणीबाणी.
- संसर्ग.
- हायपरथायरॉईडीझम.
इन्सुलिन आणि ॲन्टीसायकोटिकसारखी काही औषधे देखील याच्याशी संबंधित आहेत.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात ?
संपूर्ण इतिहास आणि विकृतीचे व्हिज्युअल मूल्यांकन उपचारामध्ये महत्वाचे आहे.
- तपासणीमध्ये समाविष्ट आहे :
- आयोडीन-स्टार्च चाचणी.
- थर्मोरेग्युलेटरी स्वेट चाचणी.
- कम्प्लिट ब्लड काऊंट.
- हिमोग्लोबिन ए1सी(A1C).
- छातीचा एक्स-रे.
- थायरॉईड हार्मोन चाचणी.
हायपरहायड्रोसिसचा उपचार अंतर्निहित स्थिती आणि त्याच्या उपचारावर लक्ष केंद्रित करतो.
प्रायमरी हायपरहायड्रोसिसच्या बाबतीत, उपचारामध्ये संबंधित लक्षणे संबोधित करणे समाविष्ट असते. डॉक्टर एंटिपरस्पिरंट्स, ग्लाइकोयपायरोलेट, नर्व्ह-ब्लॉकिंग औषधे किंवा अँटी-डिप्रेसन्ट्स असलेल्या क्रीम लिहून देऊ शकतात.
प्रारंभिक उपचारांमध्ये प्रामुख्याने एंटिपरस्पिरंट्स सोबत 15-25% ॲल्युमिनियम क्लोराइड हेक्साहायड्रेट चा समावेश असतो. जर रुग्णास या उपचारांबद्दल सकारात्मक प्रतिसाद देत नसेल तर स्वेट (घाम) ग्रंथींच्या रिसेप्टर्सला अवरोधित करण्यासाठी डॉक्टर औषधे लिहून देतील. आवश्यक असल्यास, जास्त घाम कमी करण्यासाठी अतिरिक्त बोट्युलिनम इंजेक्शन्स किंवा आयनोटोफोरेसिस प्रशासित केले जातात.
सर्जिकल उपचार पर्यायांमध्ये घाम ग्रंथी काढणे किंवा नर्व्ह सर्जरी समाविष्ट असते.