कॅल्शियमची कमतरता काय आहे ?
आपल्या शरीरात 99% कॅल्शियम हे कठीण टिशू च्या रूपात दात आणि हाडांमध्ये जमा होते. हे एक महत्वाचे पोषकद्रव्य आहे जे शरीरातील कठीण काम करायला जसे मज्जातंतू द्वारे मॅसेज पोहोंचवणे, हार्मोन स्रवण करणे, रक्तवाहिन्या आणि स्नायूंचे आकुंचन आणि प्रसारण पावणे यासाठी गरजेचे असते.
कॅल्शियम च्या कमतरतेला हायपोकेलसेमिया असेही म्हणतात. उपचार न झालेले जुनाट हायपोकेलसेमिया बरेच गुंतागुंत वाढवू शकते जसे हाडांचे झिजणे(ऑस्टिओपेनिया), मुलांमध्ये हाडे कमजोर असणे (रिकेट्स), हाडाची घनता कमी होणे (ऑस्टिओपोरोसिस). कॅल्शियम च्या कमतरतेची सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की आहारातील सवयीच्या बदलाने हे ठीक होऊ शकते.
याच्या खुणा आणि लक्षणे काय आहे ?
सुरवातीला कॅल्शियम ची कमतरता ओळखण्यास कठीण जाते. तरीही परिस्थिती वाढल्यास काही लक्षणे ओळखता येऊ शकतात.
सुरवातीचे लक्षणे खालील प्रमाणे आहे:
- हातात, पायात आणि बोटांमध्ये बधिरता आणि मुंग्या येणे.
- स्नायूमध्ये मुरडा किंवा आकुंचन पावणे (आणखी वाचा ; स्नायूला मुरडा मारल्यावर उपचारपद्धती)
- सुस्ती येणे आणि खूप थकवा जाणवणे.
कॅल्शियम ची कमतरता खूप दिवसांपासून असेल तर ते शरीराच्या वेगवेगळया अवयवांना प्रभावित करते. उशिरा दिसणारी लक्षणे खालील प्रमाणे आहे:
- ऑस्टिओपेनिया आणिऑस्टिओपोरोसिस- अस्थिभंग होण्याची आशंका वाढते.
- दाताचे प्रॉब्लेम्स- दाताचा आणि आवरणाचा हायपोप्लासिया, दाताचे मुळाची बोथट वाढ होणे, दात येण्यास उशीर होणे.
- कमजोर आणि ठिसूळ नखे.
- कोरडी आणि खाज येणारी त्वचा – एकझिमा
- नैराश्य आणि गोंधळून जाणे.
- भूक कमी होणे (आणखी वाचा: भूक कमी होण्याची कारणे)
- हृदयाची अनियंत्रित हालचाल (आणखी वाचा: अऱ्हिथमिया प्रिव्हेंशन)
- रक्त गोठण्यास उशीर होणे.
याचे कारणे काय आहे?
मोठ्या माणसांना कॅल्शियम ची रोजची गरज एमजी असते तर वृद्ध माणसांना रोज एमजी लागते.
ज्या लोकसंख्येला कॅल्शियम च्या कमतरतेच्या धोका जास्त आहे ती खालील प्रमाणे आहे
- महिला, विशिष्ट करून रजोनिवृत्ती नंतर च्या.
- वृद्ध व्यक्ती.
- तरुण व्यक्ती.
- ज्या व्यक्तीला लॅक्टोज इनटॉलरन्स आहे.
कॅल्शियम च्या कमतरतेचे काही सामान्य कारणे खालील प्रमाणे आहे.
- अपूर्ण आहार घेणे.
- सेलियाक रोगामुळे कमी पचन होऊन पचनासंबंधित विकार होणे.
- हायपोथायरॉइडिज्म.
- मॅग्नेशिअम ची पातळी कमी किंवा जास्त होणे.
- फॉस्फेट ची पातळी वाढणे
- फेनीटोइन,फेनोबार्बिटल, रिफाम्पीन, कॉर्टिकोस्टिरॉईड्स औषधे आणि केमोथेरपी ची औषधे घेणारी व्यक्ती.
- सेप्टिक धक्का (आणखी वाचा :सेप्सीस उपचार).
- मूत्रपिंड काम न करणे.
- पॅनक्रिएटिटिस.
- व्हिटॅमिन डी ची पातळी कमी होणे.
याचे निदान आणि उपचार काय आहे ?
वैद्यकीय माहिती आणि लक्षणावरून डॉक्टर प्रथम रुग्णाची तपासणी करतो. पुढची पायरी म्हणजे वैद्यकीय लक्षणाची खात्री करण्यासाठी पॅथॉलॉजिकल चाचणी करणे ज्यामध्ये सिरम कॅल्शिअम ची चाचणी, पॅराथायरॉईड हार्मोन, सिरम फॉस्फेट, मग्नेशियम हायड्रॉक्सिव्हिटामिन डी, आणि - डायहायड्रॉक्सि व्हिटामिन डी चा समावेश असतो. डॉक्टर रुग्णाला कॅल्शियम सेन्सिंग रिसेप्टर, जी प्रथिने सबयुनिट अल्फा ची अनुवांशिक म्युटेशन चाचणी करायला लावू शकतो.
कॅल्शियम युक्त आहार घेतल्याने हायपोकेलसेमिया फक्त बरा करत नाही तर सुरवातीलाच अशी परिस्थिती येण्यापासून बचाव करतो. कॅल्शिअम युक्त साधने खालील प्रमाणे आहे
- दूध आणि इतर दूग्धजन्य प्रॉडक्ट- चीज, दही, योगर्ट, आणि पनीर.
- भाज्या- पालक, ब्रोकोली, शेंगा- चवळी आणि मटार.
- पूर्ण डाळी, पूर्ण धान्य.
- कॅल्शियम - यूक्त मिनरल पाणी.
- सीफूड, मांस आणि अंडे.
- नटस, बिया, सोयाबीन चे प्रॉडक्ट - टोफू.
डॉक्टरांनी बाहेरून दिलेला कॅल्शिअम शरीरातील कॅल्शिअम ची पातळी वाढवण्यास मदत करतो.
- स्वतःच उपचार करायचे टाळा.
- कॅल्शियम चे जास्त डोज घेण्याचे टाळा- कारण डोजेस हे शरीराच्या वजनावर अवलंबून असते. उच्य डोसेज डिगोक्सिन विषारीपणा साठी कारणीभूत ठरू शकते, लक्षात असू द्या, कॅल्शियम ची कमतरता एका रात्रीतून होत नाही आणि म्हणूनच याला बरे होण्यासाठी वेळ लागतो.
- कॅल्शियम सप्लिमेंट्स इतर औषधांसोबत मिसळू शकतात जसे- रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल कमी करणारे औषध, अँटिबायोटिकस- टेट्रासायक्लिन आणि फ्लुरोक़िनोलोन्स.
याव्यतिरिक्त, रुग्णाच्या परिस्थितीवर अवलंबून कॅल्शियम चे इंजेक्शन सुद्धा लागू शकते. हायपोकेलसेमिया पूर्णपणे बरा होण्यासाठी तो किती गंभीर आहे यावरून एक किंवा सहा महिन्यांचा कालावधी लागू शकतो.