अनुचित अँटीडाययुरेटिक हार्मोन सिक्रिशन (एसआयएडीएच) म्हणजे काय आहे?
अँटीडाययुरेटिक हार्मोन (एडीएच) हायपोथालमस (मेंदूचा भाग) तयार करतो आणि पिट्यूटरी ग्रंथी(मेंदूच्या खालच्या बाजूला असतो) द्वारे सोडला जातो. एडीएच मूत्रपिंडांद्वारे मूत्रातून उत्सर्जित झालेल्या पाण्याची मात्रा नियंत्रित करण्यात मदत करतो. अनुचित एंटिडाययुरेटिक हार्मोन सिक्रिशन (एसआयएडीएच) हा एक विकार आहे ज्यामध्ये शरीर अँटीडाययुरेटिक हार्मोन (एडीएच) जास्त प्रमाणत बनवते. ह्या विकारामुळे शरीरात जास्त पाणी राहते.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
एसआयएडीएचची सामान्य चिन्हे आणि लक्षणे ही आहेत:
- डोके दुखी.
- मळमळणे.
- उलटी होणे.
- मानसिक बदल जसे की
- गोंधळणे.
- स्मरणशक्तीच्या समस्या (अधिक वाचा: स्मृतीभ्रंशाचे उपचार).
- तोल गेल्याने पडणे.
- गंभीर प्रकरणात, यामुळे दौरे येतात किंवा अगदी कोमात देखील जाऊ शकतात.
याची मुख्य कारणं काय आहेत?
शरीरातील एडीएच पातळीमध्ये वाढीस कारणीभूत घटकांमुळे एसआयएडीएच होऊ शकतो, या घटकांमध्ये खालील समाविष्ट आहेत:
- औषधोपचार ज्यामध्ये खालील रोगांचे औषधे समाविष्ट आहेत:
- मेंदूची विकृती, ज्यात खालील समाविष्ट आहे:
- फुफ्फुसाचा रोग, ज्यात खालील समाविष्ट आहे:
- गंभीर संक्रमण.
- क्षयरोग.
- न्यूमोनिया.
- कर्करोग.
- मानसिक विकार.
- हायपोथालेमस किंवा पिट्यूटरीचा विकार.
- खालील अवयवांचे / शरीराच्या भागाचे कर्करोग:
- रक्ताचा कर्करोग.
- पॅनक्रिया.
- छोटे आतडे.
- मेंदू.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
लक्षणांचा शोध घेण्यासाठी डॉक्टर संपूर्ण शारीरिक तपासणी करतात आणि त्यानंतर यापैकी काही चाचण्या करतात:
- सोडियमची पातळी मोजण्यासाठी रक्त आणि मूत्र चाचणी.
- रक्त आणि मूत्र ऑस्मोलिटीचे मूल्यांकन करण्यासाठी चाचणी.
- कॉम्प्रेहेन्सिव्ह मेटाबोलिक पॅनल( मूत्रपिंड आणि यकृत क्रियांचे मूल्यांकन, ॲसिड / बेस बॅलन्स, इलेक्ट्रोलाइट आणि रक्तातील साखर मोजण्यासाठी चाचणी)
एसआयएडीच्या कारणांनुसार उपचारांमध्ये खालील समाविष्ट आहे:
- द्रवाच्या सेवनावर प्रतिबंधित. आपण किती द्रवपदार्थ घेऊ शकता ते चिकित्सकाद्वारे निश्चित केले जाते.
- मूत्रपिंडांवर एडीएचचा प्रभाव रोखण्यासाठी तोंडी किंवा शिरेतून औषधे निर्धारित केली जाऊ शकतात. यामुळे मूत्रपिंडाद्वारे अतिरिक्त पाणी बाहेर निघते.
- खालील प्रमाणे विकाराच्या मूळ कारणांचा उपचार करणे :
- ट्यूमरमुळे आजार झाल्यास शस्त्रक्रिया करणे.
- औषधाचे डोज बदलणे किंवा एडीएचच्या असाधारण उत्पादनासाठी कारणीभूत औषधे बदलणे.