पोटात कीडे होणे - Intestinal Worms in Marathi

Dr. Ajay Mohan (AIIMS)MBBS

December 03, 2018

March 06, 2020

पोटात कीडे होणे
पोटात कीडे होणे

पोटात जंत होणे काय आहे?

पोटात जंताचे संसर्ग हा एक सामान्य प्रकारचा संसर्ग आहे. हा सामान्यत: खराब सामाजिक-आर्थिक स्थिती आणि अस्वच्छतापूर्ण जीवनशैलीशी संबंधित असतो. हा प्रतोदकृमी(व्हिपवर्म), टेपवर्म, कृमी, थ्रेडवर्म्स(दोऱ्यासारखे कृमी) आणि गोलाकार कृमी यांच्यामुळे होऊ शकतो. हे परोपजीवी मानवी शरीरात, विशेषतः आतड्यांमधील पुनरुत्पादन करतात.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

पोटात जंतांच्या संसर्गाचे सामान्य चिन्हे आणि लक्षणे अशी आहेत:

याची मुख्य कारणं काय आहेत?

पोटात जंताचे संसर्ग करणारे परोपजीवी शरीरात विविध स्त्रोतांद्वारे प्रवेश करू शकतात. एखाद्या व्यक्ती या संसर्गाला बळी पडण्याला खालील सामान्य घटकांचा समावेश होतो:

  • अस्वच्छता.
  • कच्चे किंवा न शिजवलेले खाद्यपदार्थ खाणे.
  • दूषित अन्न आणि पाण्याशी संपर्क येणे.
  • अस्वच्छ भागात अनवाणी चालणे.
  • दूषित मातीशी संपर्क येणे.
  • दूषित वस्तूंशी संपर्क येणे ज्यामध्ये प्लेट्स, जेवणाची भांडी, खेळणी, शौचालयांची जागा, बेडिंग इत्यादींचा समावेश आहे.
  • खूप जवळीक असल्याने एका व्यक्तीतून दुसऱ्या व्यक्तीत प्रसारित केले जाते.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

रुग्णाची चिन्हे आणि लक्षणांवर आधारित आणि खालील चाचण्या करून डॉक्टर निदान करतात:

  • मल रूटीन किंवा स्टूल कल्चर.
  • टेप टेस्ट: या चाचणीत, परोपजीवींच्या अंड्यांचा सूक्ष्म तपासणी गुद्द्वाराच्या त्वचेवर सेलोफेन टेप दाबून केली जाते जी नंतर सूक्ष्मदर्शकाखाली तपासली जाते.
  • व्हिज्युअल परीक्षा: मुलाच्या गुदाद्वाराचे, अंतर्वस्त्र किंवा डायपरचे निरीक्षण करुन.

पोटातील जंतांच्या संसर्गाचे व्यवस्थापन:

  • पोटातील जंतांच्या संसर्गाच्या व्यवस्थापनात स्वच्छ आरोग्याच्या पद्धतींचे पालन करणे महत्वाची भूमिका बजावते.
  • शाळेच्या मुलांत हात धुणे आणि सुधारित स्वच्छता तंत्रांना प्रोत्साहन देणे.
  • निरोगी वर्तनाविषयीचे शिक्षण ज्यामध्ये चांगले आरोग्य आणि स्वच्छता समाविष्ट आहे, प्रसार आणि पुनरुत्पादन कमी करण्यात मदत करते.
  • पुरेशी स्वच्छता सुविधा ठेवणे.
  • डिव्हर्मिंग टॅब्लेट्सचा वापर प्रोत्साहित करून वारंवार होणारे जंत होणे टाळण्यास मदत शकते.
  • खूप लहान मुलांसाठी व्हिटॅमिन ए सह पूरक पुरविणे.
  • एन्थेलमिंथिक औषधोपचारांसह उपचार करणे.



संदर्भ

  1. World Health Organization [Internet]. Geneva (SUI): World Health Organization; Intestinal worms.
  2. World Health Organization [Internet]. Geneva (SUI): World Health Organization; Intestinal worms.
  3. Rashidul Haque. Human Intestinal Parasites. J Health Popul Nutr. 2007 Dec; 25(4): 387–391. PMID: 18402180
  4. Cooper PJ. Intestinal worms and human allergy.. Parasite Immunol. 2004 Nov-Dec;26(11-12):455-67. PMID: 15771681
  5. World Health Organization [Internet]. Geneva (SUI): World Health Organization; Intestinal worms.

पोटात कीडे होणे साठी औषधे

Medicines listed below are available for पोटात कीडे होणे. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.