आयरायटिस म्हणजे काय?
डोळ्यातील आयरिसला सुज येण्याला आयरायटिस म्हणतात. उपचार न केल्यास, आंशिक किंवा पूर्ण अंधत्व असे गंभीर परिणाम होऊ शकतात. आयरिस आपल्या डोळ्यांत प्रवेश करणाऱ्या प्रकाशाची मात्रा नियंत्रित करते. आयरिसच्या समोर एक अँटीरिअर चेंबर असते जो द्रवाने भरलेले असते. म्हणून, आयरिस सुजल्यामुळे पूर्ण डोळा सुजतो.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
आयरायटिस एकतर्फी किंवा दोन्ही बाजूला होऊ शकते, आणि त्याची सामान्य लक्षणे पुढील प्रमाणे आहे:
- डोके दुखी.
- वेदना.
- डोळे लालसर होणे (अधिक वाचा : डोळे लाल होण्याचे कारणे).
- काही व्यकितींना डोळ्यात काही गेल्यासारखे आणि डोळ्यांसमोर काही (छोटे थेंब किंवा ठिबके) हालतं आहे असे वाटते.
- प्रभावित डोळाचा बुबुळ लहान होतो.
- प्रकाशाची संवेदनशीलता.
- दृष्टी कमी होते.
- बुबुळांचा अनियमित आकार.
- किशोरवयीन आइडियापथिक आर्थराइटिस(जेआयए) मध्ये लक्षणे नसलेला आयरायटिस खूप सामान्य आहे आणि दृष्टिदोष होणाऱ्या प्रकरणांमध्ये देखील सापडला आहे.
याचे मुख्य कारणे काय आहेत?
आयरायटिस खालील कारणांमुळे होऊ शकतो:
- आघात.
- संसर्ग.
- स्वयंप्रतिरोधक रोग:
- प्रतिक्रियाशील संधिवात.
- जेआयए.
- नेफेरिटिस (मूत्रपिंडाला सूज येणे).
- दाहक आंत्र रोग (आतड्या सुजल्याने होणारे अल्सर, क्रोन रोग).
- आर्थराइटिस, ल्युकेमिया, क्षयरोग, कावासाकी सिंड्रोम आणि सिफिलीस सारखे काही विकार.
- इडिओओपथिक.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
लक्षणे समजून घेतल्यानंतर डोळ्याच्या बारीक तपासणीवर आधारित डॉक्टर निदान करतात.खालील निदान प्रक्रिया करता अनुसरल्या जातात:
- स्लिट-लॅम्प डोळ्याची चाचणी.
- आयरायटिस इतर रोगांशी संबंधित असू शकते, म्हणूनच संपूर्ण आरोग्य तपासणीची गरजे भासू शकते , ज्यात यांचा समावेश होऊ शकतो:
- रक्त चाचणी, ज्यामध्ये एचएलए-बी 27 हॅप्लोटाइप, ॲन्टिन्यूक्लियर अँटीबॉडीज (एएनए), र्हुमेटॉइड फॅक्टर (आरएफ), विविध संसर्गांची तपासणी आणि एरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट (ईएसआर).
- त्वचेची तपासणी.
- एक्स- रे.
- छातीचा संगणकीकृत टोमोग्राफी (सीटी) स्कॅन.
- गॅलियम स्कॅन.
- संशयास्पद सर्कॉइड्स ची शंका असल्यास ऊतकाची बायोप्सी.
आयरायटिसचे कारण आणि तीव्रता उपचार निश्चित करतात. विविध उपचार पद्धती खालीलप्रमाणे आहेत:
- मूळ कारणांचा उपचार: बॅक्टेरियाच्या संसर्गासाठी अँटीबायोटिक्स आणि डोळ्यातील व्हायरल इन्फेक्शनसाठी अँटीव्हायरल्स.
- सूज हाताळण्यासाठी स्टेरॉईड्सचा वापर.
- पुढील त्रास रोखण्यासाठी, आय ड्रॉप्सचा वापर केला जाऊ शकतो, जे दोन प्रकारचे आहेत:
- डोळ्यांच्या आरामासाठी ड्रॉप्स, जे वेदना कमी करून डोळ्यांना विश्रांती देतात.
- स्टेरॉइड सूज कमी करण्यासाठी काम करते ज्यामुळे अस्पष्ट दिसणे टाळते. अधिक वाचा( अस्पष्ट दिसण्याचे कारणे)
- इम्यूनोस्पेप्रेसिव औषधे देखील दिली जातात,परंतु क्वचितच.