क्लेबीसियाला संसर्ग म्हणजे काय?
क्लेबीसियाला संसर्ग प्रामुख्याने नोसोकोमियल (रुग्णालय-अधिग्रहित) स्वरूपात असते. प्रामुख्याने यामध्ये निमोनिया (सर्वात सामान्य), रक्तप्रवाहात संसर्ग, जखम किंवा उघडलेली पृष्ठभागाचा (जखम) संसर्ग, आणि मेनिंग्ज ची सूज (मेंदूचे बाह्य आवरण) यांचा समावेश आहे. रुग्ण जे व्हेन्टिलेटर वर आहेत आणि कॅथेथर्स किंवा दीर्घकालीन अँटीबायोटिक्स वापरणारे आहेत त्यांना क्लेबीसियाला संसर्ग विकसित होऊ शकतो. सूक्ष्मजीवांच्या या प्रजाती, औषध प्रतिरोधक असल्याने त्यांचे उपचार करणे अधिक आव्हानात्मक आहे.
त्याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत ?
क्लेबीसियाला संसर्ग वेगवेगळ्या लोकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे प्रकट होऊ शकतो. हे संसर्ग शरीरावर घातक परिणाम करतात आणि अपघातीक मृत्यूचा धोका वाढवतात. विशिष्ट चिन्हे आणि लक्षणांमध्ये समाविष्ट आहेतः
- वाढलेले शरीर तपमान.
- थरथरने.
- फ्लू च्या लक्षणांसारखी लक्षणे जसे नाक. वाहने, शिंकने आणि खोकला.
- थुंक एकतर पिवळा किंवा रक्तरंजित असणे.
- श्वास घेण्यात अडचण.
याची मुख्य कारणं काय आहेत ?
याचे मुख्य कारण क्लेबीसियाला जीवाणू आहे जो क्लेबीसियाला प्रजातींचा भाग आहे. हा जीवाणू शरीराच्या स्थानानुसार विविध प्रकारचा संसर्ग निर्माण करू शकतो. हा जीव पोटात उपस्थित असतो आणि हानीकारक नसतो, परंतु जेव्हा तो फुफ्फुसांसारख्या इतर अवयवांमध्ये पोहचतो तेव्हा त्याच्याकळे दुर्लक्ष केल्यास गंभीर संसर्ग होतो. हा संसर्ग एका व्यक्तीकडून दुस-या व्यक्तीकडे स्थानांतरीत होऊ शकतो, खासकरुन रुग्णालयामध्ये.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात ?
क्लेबीसियाला संसर्गाचा शोध घेण्यासाठी काही तापासण्या केल्या जातात ज्यात समाविष्ट आहे रक्ताची, थुंकेची आणि मूत्राची चाचणी. फुफ्फुसाच्या संसर्गाच्या बाबतीत एक्स-रे किंवा पीईटी (PET) (पॉझिट्रॉन इमिशन टोमोग्राफी) स्कॅन या इमेजिंग अभ्यासांचा वापर केला जाऊ शकतो, खासकरुन समुदाय-अधिग्रहित न्यूमोनिया प्रकरणांमध्ये.
उपचार हा अवघड असू शकतो कारण या जिवाणूंच्या प्रजाती काही अँटीबायोटिक्ससाठी प्रतिरोधक असू शकतात. संवेदनशीलता तपासण्यासाठी अतिरिक्त चाचण्यांवर अवलंबून, योग्य ॲन्टीबायोटिक उपचार दिली जातात. नेहमीच ॲन्टीबायोटिक कोर्स सुरू ठेवण्याची शिफारस केली जाते आणि अर्ध्या मार्गात न थांबविण्याचे सुद्धा सांगण्यात येते. ॲन्टीबायोटिक्स, जेव्हा निर्धारित केल्यानुसार घेतली जातात तेव्हा अधिक फायदा पोहोचवतात.
क्लेबीसियाला संसर्ग मुख्य अवयवांमध्ये पसरल्यास धोकादायक ठरू शकते. अशा प्रकारच्या संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी औषध-प्रतिरोधके टाळले जाणे आवश्यक आहे.