लॅरिन्जायटिस - Laryngitis in Marathi

Dr. Abhishek GuptaMBBS

December 03, 2018

March 06, 2020

लॅरिन्जायटिस
लॅरिन्जायटिस

लॅरिन्जायटिस काय आहे?

लॅरिन्क्स आणि व्होकल कॉर्ड्सवर येणाऱ्या सूजेला लॅरिन्जायटिस म्हणून ओळखले जाते. व्होकल कॉर्डच्या अयोग्य कंपनामुळे आवाज मोठा होत जातो.अभ्यासानुसार असे दिसून येते की वय 30-50 वर्षे वयोगटात याचे प्रमाण सर्वाधिक असते. क्रॉनिक लॅरंजिटिसची घटना प्रत्येक 1000 लोकांमध्ये 3.5 मध्ये दिसून येते.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

याची मुख्य लक्षणे पुढीलप्रमाणे आहे :

पोटातील ॲसिड वर येऊन लॅरिन्क्स मध्ये जातात तेव्हा कॉम्प्लिकेशन्स मुळे ॲसिड रिफ्लक्स नी होणारा लॅरिन्जायटिस होतो.

याची मुख्य कारणं काय आहेत?

लॅरीन्जायटिसचा मुख्य कारण एक जिवाणू किंवा व्हायरल संसर्ग असू शकतात. यात व्हायरल लॅरीन्जायटिसची प्रकरण अधिक असतात. व्होकल कॉर्ड्सवर ताण पडल्यास परिस्थिती खराब होऊ शकते.  3 आठवड्यांपेक्षा जास्त काळ असल्यास त्याला क्रॉनिक म्हटले जाते. लॅरीन्जायटिसची इतर कारणे खाली नमूद आहेत:

  • ध्रुमपान करणे.
  • जास्त मद्यपान करणे.
  • श्वसनाद्वारे आत घेतलेले इरिटंट्स जसे एक्सहोस्ट फ्यूम्स, काही रसायने आणि धुर.
  • व्होकल कॉर्ड्सवर अतिरिक्त ताण.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

लॅरीन्जायटिसचे लक्षणे आणि शारीरिक तपासणीचे मूल्यांकन करून निदान केले जाते. वैद्यकीय इतिहासाने लॅरीन्जायटिसच्या मागे कारणे समजू शकते.लॅरिन्गोस्कोपने लॅरेन्क्स तपासले जाते.  

साधारणपणे, ही स्थिती स्वयं मर्यादित असते आणि स्वत: च ठीक होते.पण गरज असल्यास कारणावर आधारित, उपचार केले जाते. व्हायरल इन्फेक्शनसाठी अँटी-व्हायरल औषधांने उपचार केला जाऊ शकतो. जर ते ॲसिड रिफ्लक्समुळे झाले असेल तर अँटी-ॲसिडीटी औषधे दिली जातात.

स्वत: च्या काळजीच्या टिप्सः

  • टॉक्सिन्स बाहेर काढण्यासाठी अधिक द्रवपदार्थ घ्या.
  • धुरापासून लांब राहा.
  • मिठाच्या पाण्याने गुळण्या करा.
  • घश्याला आराम द्यावा आणि जोरात बोलणे टाळावे.
  • बंद नाक मोकळे करण्यासाठी गरम वाफ घ्यावी.
  • नाकाच्या डिकाँजेस्टंट्स  वापरू नये कारण ते आपला गळा कोरडा करतात.

हे उपाय काम करत नसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

गंभीर प्रकरणात, लॅरीन्जायटीस श्वास घेण्यात अडचण अडचण आणू शकते आणि गहन चिकित्सा आवश्यक असू शकते.



संदर्भ

  1. DebaJyoti Roy, Nirupama Moran. The Evaluation of Hoarseness And Its Treatment. , Department of Otorhinolaryngology; e-ISSN: 2279-0853, p-ISSN: 2279-0861.Volume 16, Issue 8 Ver. I (Aug. 2017), PP 12-15
  2. Health On The Net. Laryngitis. [Internet]
  3. Edakkattil Rameshkumar, Tony Kalliath Rosmi. Prevalence of age, gender and pathological conditions of vocal cords leading to hoarseness of voice in a tertiary care hospital. Department of Otorhinolaryngology, Jubilee Mission Medical College and Research Institute, Thrissur, Kerala, India
  4. The Voice Foundation. Treatment. Philadelphia; [Internet]
  5. Gupta G, Mahajan K. Acute Laryngitis. Acute Laryngitis. In: StatPearls [Internet]. Treasure Island (FL): StatPearls Publishing; 2019 Jan-.

लॅरिन्जायटिस साठी औषधे

Medicines listed below are available for लॅरिन्जायटिस. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.