फुफ्फुसाचा रोग म्हणजे काय?
फुफ्फुसांच्या कार्यातील कोणतीही विकृती किंवा समस्या, फुफ्फुसाचा रोग म्हणून ओळखली जाते. फुफ्फुसांच्या रोगामुळे वायुमार्ग, वायुकोष्ठ, फुफ्फुसांचे आवरण, छातीची भिंत आणि फुफ्फुसांच्या रक्तवाहिन्यांचे अस्तर यांवर परिणाम होऊ शकतो. सर्वात सामान्य फुफ्फुसांचे आजार अस्थमा, क्षयरोग, ब्रॉन्कायटिस, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह फुफ्फुसीय रोग, न्युमोनिया, पल्मनरी फायब्रोसिस, पल्मनरी एडीमा (फुफ्फुसांवर सूज येणे), फुफ्फुसाची धमनी ब्लॉक होणे आणि फुफ्फुसाचा कर्करोग हे आहेत.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
फुफ्फुसाशी संबंधित अगदी सौम्य लक्षणांकडेही लक्ष देणे फार महत्वाचे आहे. फुफ्फुसांच्या रोगाची चेतावणी देणारी चिन्हे खालीलप्रमाणे आहेत:
- सतत खोकला येणे.
- ताप.
- धाप लागणे.
- छातीत घरघर आवाज येणे.
- दीर्घकाळ टिकणारा चिकट पदार्थ तयार होणे.
- खोकल्यात रक्त येणे.
- छातीत दुखणे.
फुफ्फुसांच्या रोगांचे मुख्य कारण काय आहे?
विविध कारणांमुळे फुफ्फुसांचा वेगवेगळा आजार होतो. काही कारणं खालीलप्रमाणे आहेत:
- बॅक्टेरीयाचा, व्हायरल किंवा फंगल संसर्ग.
- वायू प्रदूषण.
- धूम्रपान करणे किंवा धुरामुळे संसर्ग होणे.
- ॲलर्जन्स जसे धूळ आणि परागकण.
- ऑटोइम्यून रोगाचा कौटुंबिक इतिहास.
- कामामुळे रासायनिक पदार्थ आणि ॲस्बेस्टॉससारख्या त्रासदायी घटकांशी संपर्क.
- जन्मजात हृदय रोग किंवा आनुवंशिक उत्परिवर्तन.
- अनुवांशिक फुफ्फुसाचा कर्करोग.
- शरीराच्या इतर भागांमध्ये कर्करोग होणे.
- कमकुवत रोगप्रतिकार प्रणाली.
याचे निदान आणि उपचार कसे केले जाते?
फुफ्फुसाच्या आजाराच्या निदानाची सुरुवात, रोगाचे मूळ कारण शोधण्यासाठी व्यक्तीचा तपशीलवार वैद्यकीय आणि कौटूंबिक इतिहास घेण्यापासून होते. त्यानंतर रोगाची लक्षणे दाखवणाऱ्या चाचण्या केल्या जातात, जसे की:
- छातीची तपासणी.
- थुंकीची तपासणी किंवा म्युकस तपासणी.
- ऑटोइम्यून रोगांचे प्रथिने, अँटीबॉडीज आणि मार्कर शोधून काढण्यासाठी रक्त तपासणी.
- एक्स-रे, सीटी स्कॅन आणि छातीच्या एमआरआय द्वारे फुफ्फुसाची प्रतिमा घेणे.
- इसीजी.
- ब्रोंकोस्कोपी.
- फुफ्फुसांच्या कार्याच्या चाचण्या जसे स्पायरोमेट्री आणि पल्स ऑक्सिमेट्री.
- टिश्यू बायोप्सी किंवा ब्रोकायल लॅव्हेज (फुफ्फुसांचा एक प्रकार) परीक्षण.
तुमचे छातीच्या विकारांचे तज्ज्ञ तुमच्या फुफ्फुसांच्या आजाराच्या प्रकारावर आधारित उपचार ठरवेल. काही उपचार पद्धती खाली दिल्या आहेत:
- औषधे:
- संसर्ग हाताळण्यासाठी अँन्टीबायोटिक्स, अँन्टीव्हायरल आणि अँन्टीपायरेटिक्स आणि अँटीफंगल औषधे (तापासाठी औषधे).
- फुफ्फुसांमधील सुजेवर नियंत्रण मिळवण्यासाठी अँन्टीइंफ्लेमेटरी औषधे (फुफ्फुसांचा दाह).
- दम्यासाठी इनहेलेबल, इन्फ्युजन आणि/किंवा तोंडात घ्यायचे कॉर्टिकोस्टेरॉईड्स दिली जाऊ शकतात.
- क्षयरोगाचा उपचार करण्यासाठी अँन्टीट्युबिक्युलर औषधे.
- फुफ्फुसात फायब्रोसिस कमी करण्यासाठी अँन्टीफायब्रोटिक औषधे.
- ॲसिड रिफ्लक्स, ज्यामुळे फुफ्फुसाचा रोग होतो,नियंत्रित करण्यासाठी एच 2 रिसेप्टर अँन्टोगॉनिस्ट
- श्वास घ्यायला सोपे करण्यासाठी ऑक्सिजन थेरपी.
- फुफ्फुसाचे पुनर्वसन.
- फुफ्फुसाच्या नुकसानाच्या गंभीर प्रकरणांमध्ये फुफ्फुसांच्या प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया
धूर आणि प्रदूषण टाळण्यासाठी संरक्षक मास्क वापरणे, नियमित योगा आणि प्राणायाम (श्वासाचा व्यायाम) करणे यामुळे फुफ्फुसांच्या समस्या टाळण्यास मदद होते. फुफ्फुसाच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि बरे करण्यासाठी आपल्या तज्ञांच्या मदतीने नियमित औषधोपचार, नियमित अनुपालन आणि सल्ला घेणे आवश्यक आहे.