फुप्फुसांचा संसर्ग म्हणजे काय?
विषाणू, बुरशी आणि जीवाणू यांच्या आक्रमणामुळे फुप्फुसांचा संसर्ग होतो. जीवाणूंमुळे होणाऱ्या संसर्गापेक्षा व्हायरलमुळे होणारा फुप्फुसांचा संसर्ग जास्त सामान्यपणे पहायला मिळतो. सामान्यपणे क्षयरोग, ब्रॉन्कायटिस, फ्लू आणि न्यूमोनिया हे सामान्यतः आढळणारे फुप्फुसांचे संसर्ग आहे.
याची मुख्य चिन्ह आणि लक्षणे काय आहेत?
फुप्फुसांचा संसर्ग झालेल्या व्यक्तीमध्ये खालील लक्षणे दिसून येता:
- श्वसनाचा त्रास.
- छातीत दुखणे.
- डोकेदुखी.
- भूक कमी होणे.
- ताप आणि थंडी.
- थुंकीसोबत कफ.
- घरघरणे.
- जनरल दुखणे आणि थकवा.
- अतिसार, चिडचिडेपणा आणि उलटी ही लक्षणे संसर्गाने ग्रासित मुलांमध्ये दिसून येतात.
याची मुख्य कारणं काय आहेत?
फुप्फुसांचा संसर्ग हा जीवाणू,विषाणू किंवा मायकोप्लास्मा या विशेष जातीच्या जीवाणूमुळे होतो.यास कारणीभूत असणाऱ्या जीवाणूंमध्ये सामान्यतः स्ट्रेप्टोकॉकस न्यूमोनिया, स्टॅफिलोकॉकस औरस,हिमोफिलस जाती आणि मायकोबॅक्टेरियम क्षयरोग या जिवाणूंचा समावेश होतो.फुप्फुसांचा संसर्ग होण्यास सामान्यपणे रेस्पिरेटरी सिन्कटियल व्हायरस, इन्फ्लुएंझा व्हायरस, रेस्पिरेटरी अडेनोव्हायरस आणि पॅरेन्फ्लुएन्झा व्हायरस हे विषाणू कारणीभूत असतात.अस्पेरजिलोसिस सारख्या बुरशीनेही हा संसर्ग पसरतो.
वरील जीवाणू व विषाणूंमुळे पसरणाऱ्या संसर्गाची नावे पुढीलप्रमाणे आहे:
- क्षयरोग.
- न्यूमोनिया.
- इन्फ्लुएंझा.
- ब्रॉंकिओलिटीस.
- ब्रॉंकायटिस.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
फुप्फुसांच्या संसर्गाचे निदान करण्यासाठी खालील चाचण्या केल्या जातात:
- संसर्ग होत असताना तयार झालेले प्रतिद्रव्य तपासण्यासाठी रक्त चाचणी.
- जीवाणू व विषाणूंच्या प्रादुर्भावाची तपासणी करण्यासाठी थुंकीची चाचणी केली जाते.
- फुप्फुसांच्या प्रत्यक्ष तपासणीसाठी एक्स रे किंवा सिटी स्कॅन यांसारख्या इमेजिंग चाचण्या केल्या जातात.
या आजाराची उपचारपद्धत आजार उद्भवण्यास कारणीभूत असलेल्या मूलभूत कारणावर अवलंबून असते. शुक्राणू नष्ट करायला डॉक्टर अँटिबायोटिक्स किंवा अँटीफंगल सारखी औषधे देतात.काही प्रकरणात मध्ये संसर्ग पूर्णपणे नष्ट करायला फुप्फुसांची आतील स्वच्छता किंवा शस्त्रक्रिया करण्याची गरज पडू शकते.
फुप्फुसांच्या संसर्गापासून स्वतःची काळजी घेण्यासाठी काही उपयुक्त गोष्टी:
- भरपूर प्रमाणात द्रवपदार्थ घेणे.
- डॉक्टरांनी दिलेली औषधे घेणे.
- शरीरास आवश्यक तेवढा आराम देणे.
- एअर ह्युमिडीफायर किंवा स्टीम इन्हेलेशन चा वापर करणे.
- झोपताना श्वसन सुरळीत होईल अशा पद्धतीने झोपणे.
- धूम्रपान बंद करणे कारण यामुळे थेट फुफ्फुसांवर परिणाम होतो.
- श्वसनासंबंधित तक्रारीसाठी डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधणे.