पुरुष हायपोगोनॅडिज्म काय आहे ?
पुरुष हायपोगोनॅडिज्म एक स्थिती आहे जी टेस्टोस्टेरॉन (प्युबर्टी दरम्यान पुरुषांच्या वाढीस आणि विकासात मुख्य भूमिका बजावणारे हार्मोन) पातळीतील कमतरते द्वारे दर्शविली जाते, कारण शरीर ते हार्मोन पुरेश्या प्रमाणात उत्पादित करण्यास अक्षम ठरते. या रोगाने ग्रसीत झालेल्या लोकांवर याचा चांगलाच प्रभाव पडतो. लैंगिक हार्मोन असण्याव्यतिरिक्त, टेस्टोस्टेरॉन लैंगिक, संज्ञानात्मक आणि शरीराचे कार्य (ज्यात मेंदूचे कार्य आणि मेटॅबॉलिक आणि संवहनी यंत्रणेचे कार्य समाविष्ट असते) आणि विकासासाठी गंभीर मानले जाते.
हायपोगोनॅडिज्मचे दोन प्रकार असतात, म्हणजे प्राथमिक (प्रायमरी) (अंडकोषांमध्ये) आणि द्वितीयक (सेकंडरी) (हायपोथॅलॅमस किंवा पिट्यूटरी ग्रंथी).
त्याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत ?
हायपोगोनॅडिज्मच्या सामान्य चिन्हे आणि लक्षणांमध्ये समाविष्ट आहे:
- ॲनिमिया.
- स्नायू वाया घालवणे.
- कमी झालेले हाडाचे वजन किंवा बोन मिनरल डेन्सीटी(हाड खनिज घनता) किंवा ऑस्टियोपोरोसिस.
- पोटावरील चरबी.
- गरम झोत (हॉट फ्लशेस).
- शरीरावरील केसं कमी होणे.
- अधिवर्ती (ईपीफिसीयल) उशिरा बंद होणे.
- गायनेकोमास्टीया.
- सेक्शुअल डिसफंक्श नमध्ये समावेश होतो:
- इरेक्टाइल डिसफंक्शन.
- कमी झालेली ऊर्जा, तग धरण्याची क्षमता (स्टॅमिना), कामेच्छा, लिंगाची संवेदन, किंवा शुक्राणुंची संख्या.
- ऑर्गसम (समागमाच्या वेळी शिगेस पोहचलेली उत्कटता) मिळवताना अडचण.
- लहान अंडकोष.
- उदास मनःस्थिती किंवा चिडचिडपणात वाढ.
- लक्ष केंद्रित करण्यात अडचण.
- कोलेस्टेरॉल पातळीमध्ये बदल.
याची मुख्य कारणं काय आहेत ?
- प्राथमिक (प्रायमरी) हायपोगोनॅडिज्मची मुख्य कारणं आहेत:
- वृद्धत्व.
- क्लाइनफेल्टर सिंड्रोम.
- मम्स ऑर्किटिस.
- हिमोक्रोमॅटोसिस.
- जखम किंवा खाली न राहता वरच राहिलेले अंडकोष.
- कर्करोगाचे उपचार ज्यात केमोथेरपी किंवा किरणोपचार समाविष्ठ आहे.
- द्वितीयक (सेकंडरी) हायपोगोनॅडिज्मची मुख्य कारणं आहेत :
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
निदान, जे डॉक्टरांद्वारे केले जातात ते मुख्यतः लक्षणांवर आधारीत असतात आणि पुढील चाचण्यांचा सल्ला दिला जातो:
- हार्मोन चाचणी.
- टेस्टोस्टेरॉनची लस किंवा मुक्त टेस्टोस्टेरॉन.
- द्वितीयक (सेकंडरी) हायपोगोनॅडिज्मसाठी ल्युटीनायझिंग हार्मोन (एलएच-LH) आणि फॉलिकल स्टीम्युलेटिंग हार्मोन (एफएसएच-FSH) ची लस.
- वीर्याचे विश्लेषण.
- पिट्यूटरी इमेजिंग.
- टेस्टिक्युलर बायोप्सी.
- अनुवांशिक अभ्यास.
टेस्टोस्टेरोन प्रतिस्थापन थेरपी ही उपचारांची पहिली पायरी आहे, ज्या टेस्टोस्टेरॉनचा पुरवठा 300-800 एनजी / डीएल (ng/dL) असाव. हे खालील स्वरूपात असू शकते:
- एक 24 तासांच्या कालावधीत सतत टेस्टोस्टेरॉन वितरीत करणारे ट्रान्सडर्मल पॅच.
- बक्कल टेस्टोस्टेरॉन टॅब्लेट, ज्याचा वापर टेस्टोस्टेरॉनच्या पल्साटाइल रीलिझ (कंप पाऊण सोडणे,जसे हृदय करते) म्हणून होतो.
- इम्प्लेटेबल पेलेट, ज्याचा उद्देश मंद पणे सोडणे असतो, शल्यक्रियेने प्रस्थापित केले जाते.
- टॉपिकल जेल जिचा वापर दीर्घकाळ टीकणाऱ्या टेस्टोस्टेरॉन लस वाढविण्यासाठी होतो.
- इंट्रामस्क्यूलर इंजेक्शन्स दीर्घकाळ शोषण्यासाठी वापरले जातात, जे तेलात बुडवून ठेवले जातात.
- तोंडावाटे दिल्या जाणाऱ्या टेस्टोस्टेरॉनच्या गोळ्या भारतात उपलब्ध नाही.