स्नायू दुखणे - Muscle Pain in Marathi

Dr. Nadheer K M (AIIMS)MBBS

January 27, 2019

March 06, 2020

स्नायू दुखणे
स्नायू दुखणे

सारांश

स्नायुदुखी बहुतेकदा स्नायू किंवा स्नायूंचे समूह अतीप्रमाणात वापरल्याने किंवा अती श्रम केल्याने होते, आणि हे एक व्यापक कारण आहे. स्नायूदुखी तीव्र किंवा दीर्घकालीन असू शकते. स्नायूदुखीची लक्षणे प्रामुख्याने स्नायुदुखीच्या कारणांवर अवलंबून असतात. स्नायुदुखीची सर्वसामान्य कारणे थकवा येणे, तणाव असणे, शरीराची ढब चुकीची असणे, दुखापत होणे आणि संसर्ग होणे ही आहेत. स्नायुदुखीचे सामान्यतः काही दिवसातच स्वतःहून निराकरण होते. तथापि, दीर्घकालीन स्नायुदुखीचे कारण अंतर्भूत अस्वस्थता असू शकते. रक्त तपासणी, इमेजिंग चाचण्या आणि शारीरिक तपासणी वापरून निदान केले जाऊ शकते. मुरगड आल्यामुळे आणि स्नायू ताणल्याने होणाऱ्या स्नायुदुखीवर, उष्ण गाद्यांनी शेकणे, विश्रांती घेणे यासारख्या घरगुती उपायांचा वापर करुन उपचार केला जाऊ शकतो. इतर उपचार पर्यायांमध्ये फिजिओथेरपी, वेदनाशामक औषधोपचार आणि शस्त्रक्रिया समाविष्ट आहे.

स्नायू दुखणे काय आहे - What is Muscle Ache in Marathi

स्नायुदुखी एक व्यापक दुखणे आहे आणि बहुतांश लोकांना त्यांच्या जीवनात कोणत्यातरी क्षणी याचा अनुभव येण्याची शक्यता असते. या लेखात चर्चा केल्याप्रमाणे ही एकापेक्षा अधिक कारणांमुळे होऊ शकते आणि त्यावर पारंपरिक उपचार पद्धती उपलब्ध आहेत.

स्नायुदुखी म्हणजे काय?

स्नायुदुखी सर्व वयोगटातील लोकांची असणारी सर्वसाधारण तक्रार असल्याचे दिसून येते. तथापि, हे अंतर्निहित अस्वस्थतेचे लक्षण देखील असू शकते. स्नायुदुखी शरीराच्या काही स्नायूंमधील त्रासदर्शविते. तथापि, काही लोक हा त्रास संपूर्ण शरिरात अनुभवू शकतात. वैद्यकीय दृष्टीने, स्नायुदुखीला मायल्झिया म्हणतात. ते होण्याची अनेक कारणे असू शकतात. ती तीव्र किंवा दीर्घकालीन असू शकते. दुखापतीने देखील स्नायुदुखी होऊ शकते. ती ताप, दाब किंवा दाहकपणा अशा इतर लक्षणांसोबत असू शकते. स्नायुदुखी सहसा स्वतःच दूर होते परंतु काही विशिष्ट परिस्थितीत दीर्घ काळ टिकू शकते.

myUpchar doctors after many years of research have created myUpchar Ayurveda Urjas Capsule by using 100% original and pure herbs of Ayurveda. This ayurvedic medicine has been recommended by our doctors to lakhs of people for sex problems with good results.
Long Time Capsule
₹719  ₹799  10% OFF
BUY NOW

स्नायू दुखणे ची लक्षणे - Symptoms of Muscle Ache in Marathi

 • शरीराच्या काही भागांमध्ये भिन्न तीव्रतेचा त्रास अनुभवास येणे हे स्नायुदुखीचे प्राथमिक लक्षण आहे.
 • वेदना अस्पष्ट आणि बाहेरच्या दिशेने पसरणारी असू शकते. अशा प्रकारच्या स्नायुदुखी सामान्यतः परिश्रमांमुळे आणि थकव्यामुळे अनुभवायला मिळतात. हे सहसा विश्रांती घेतल्याने बरे होते.
 • सहसा पायाच्या दुखापतींमध्ये तीव्र आणि बोचरी स्नायुदुखी अनुभवाला येते,परिणामी स्नायूवा टोळे झाल्यास किंवा हलल्यास वेदना वाढतात.
 • मुरगड किंवा डीप व्हेन थ्रोम्बोसिस यासारख्या अवस्थांमुळे बऱ्याचदा थरथरणाऱ्या आणि उत्सर्जित वेदना होतात.
 • तणाव-संबंधित स्नायुदुखी बहुधा मान आणि खांद्याच्या ठिकाणी केंद्रित असतात.
 • स्नायुदुखी इतर लक्षणांसह असू शकते जसे की:
  • अशक्तपणा असणे.
  • प्रभावित जागा हलल्याने होणाऱ्या वेदना.
  • सूज येणे
  • लालसरपणा येणे
  • जळजळ होणे

लक्षणं मुख्यतः प्रभावित स्नायूवर अवलंबून असतात. उदाहरणार्थ, पोटाच्या स्नायूंमधील वेदना अधिक व्यायामामुळे होऊ शकतात. तथापि, जेव्हा व्यक्ती जलद श्वास ओढते किंवा अचानक हसते तेव्हा वेदनेची जाणीव होते. मानेतील स्नायूचा त्रास एखाद्या व्यक्तीला मानेच्या हालचालींपासून परावृत्त करू शकतोआणि एका बाजूला मान वळवण्याचा प्रयत्न करताना तीव्र वेदना होऊ शकतात.

स्नायू दुखणे चा उपचार - Treatment of Muscle Ache in Marathi

स्नायुदुखीचे उपचार प्रामुख्याने वेदनांच्या कारणांवर आणि स्नायुदुखी होत असलेल्या शरीराच्या ठिकाणावर अवलंबून असतात.

 • इजेमुळे स्नायुदुखी झाल्यास, डॉक्टर नैसर्गिकरित्या बरे होण्यासाठी स्नायूंच्या हालचाली न करण्याचा सल्ला देऊ शकतात. काही प्रकरणांमध्ये वेदनामुक्ती जलद होण्यासाठी,कुबड्या किंवा कब्जे यांसारख्या वैद्यकीय सेवेचा वापर आवश्यक असू शकतो.
 • स्नायूंच्या मुरगडीपासून व परतून येणार्र्या स्नायुदुखी बरी होण्यासाठी, स्नायू शिथिल करणारी औषधे निर्धारित केली जाऊ शकतात.
 • एनसेड्स (स्टेरॉइडरहीत दाहशामकऔषधे) जसे की आयबुप्रोफेन आणि डिक्लोफेनाक, उपचारांच्या इतर पद्धतींच्या बरोबरीने वापरल्या जाऊ शकतात. सहज मिळ्णारी वेदनाशामक औषधे थोड्या वेळातच वेदना कमी करण्यास मदत करतात. वेदनाशामक,सूज कमी करण्यास मदत करतात. पायांच्या दुखापतीमुळे वेदना कमी करण्यासाठी ते नेहमीच दिले जातात. तथापि, जर आपण एखाद्या अंतर्भूत कारणामुळे आजारी असाल तर वारंवार वेदनाशामक औषधोपचार घेणे हे कायमस्वरुपी समाधान नाही.
 • उष्ण गाद्यांनी शेकणे हा स्नायूच्या वेदना कमी करण्याचा आणखी एक सोपा मार्ग आहे. स्नायू ओढले गेल्यामुळे किंवा स्नायूंच्या मुरगडीमुळे झालेल्या वेदना कमी करण्यासाठी उष्म गाद्या आणि गरम पाण्याच्या बाटल्यांचा वापर शेकण्यासाठी सामान्यपणे केला जातो. उष्म गाद्यांचा वापर गर्भाशयाच्या स्नायूंच्या आकुंचनामुळे होणा-या मासिक पाळीमध्ये मदत करतो. प्रभावित ठिकाणीउष्म गादी ठेवता येते. उष्णगाद्या दिवसातून अनेक वेळा वापरल्या जाऊ शकतात.
 • स्नायुदुखीसाठी औषधी लेपन लावण्याचाप्रकार बाह्य उपचार म्हणून सामान्यपणे केला जातो. या लेपनांमध्ये शोषण्यायोग्य औषधे असतात ज्यामुळे त्वचेखालील दाह कमी होतो आणि त्वरित वेदना कमी होतात. सौम्य ते मध्यम स्नायुदुखीसाठी मलम चांगल्या प्रकारे कार्य करते आणि सामान्यत: पाय, पाठ आणि खांद्याला लावतात.
 • व्यायाम आणि वेदनाशामक यांच्या एकत्रित औषधोपचारानेतीव्र पाठदुखीवर उपचार केला जातो. काही लोक एक्यूपंक्चरसारख्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून मदत करतात. ज्या प्रकरणांमध्ये हे उपचार उपयुक्त नाहीत, तेथे शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो.
 • फायब्रोमॅल्झियाचा उपचार फिजियोथेरेपी आणि मनोवैज्ञानिक उपचारांसोबत (व्यावसायिक सल्लागारांच्या मदतीने), वेदनाशामक औषधे वापरुन केला जातो.

जीवनशैली व्यवस्थापन

 • स्नायुदुखीवर काही उपायांसह घरीच उपचार केला जाऊ शकतो. प्रथम उपचार विश्रांती घेणे हाच आहे. परिश्रम आणि अविरत क्रिया किंवा विशिष्ट शारीरिक हालचालींमुळे स्नायूदुखी होऊ शकते. स्नायूंना थोडी विश्रांती देण्यासाठी काही वेळ हालचाल बंद ठेवणे खूपच उपयोगी ठरू शकते.
 • तीव्र इजेसाठी, बर्फ वापरा. स्नायूंना त्रास होत असलेल्या जागेतील सूज व दाह कमी करण्यास ते मदत करतात.
 • दीर्घ काळापासून तणावग्रस्त असलेले लोक स्नायुदुखीच्या तक्रारी करतात. ध्यानाचा सराव करण्याने तणावासंबंधित स्नायुदुखी टाळता येऊ शकते. ध्यान, मनोवैज्ञानिक तणाव कमी करण्यात मदत करते आणि बर्र्याच लोकांसाठी उपयुक्त ठरते. योगासनांसारखे उपचार करून तणाव निवारण्याचे वैकल्पिक उपाय वैयक्तिक गरजांनुसार अंगीकारले जाऊ शकतात.
 • व्ययामशाळेत व्यायाम करताना किंवा इतर शारीरिक क्रियांचा अभ्यास करताना, शारिरीक ढब योग्य ठेवण्यासाठी, एखाद्या व्यावसायिकाच्या निरीक्षणाखाली सर्व क्रिया करावी. अशा पद्धतीने भारीभरकम शारीरिक क्रियांमुळे होऊ शकणारी स्नायुदुखी टळेल.
 • प्रभावित ठिकाणाची मालिश केल्याने स्नायूंमधील तणाव आणि ताठरपणा कमी होण्यास मदत होऊ शकते.
 • स्नायुदुखी ठीक होईपर्यंत, भरभक्कम वा शक्तीशाली क्रिया, मर्यादितपणे करण्याचा सल्ला देखील दिला जातो.
myUpchar doctors after many years of research have created myUpchar Ayurveda Urjas Energy & Power Capsule by using 100% original and pure herbs of Ayurveda. This Ayurvedic medicine has been recommended by our doctors to lakhs of people for problems like physical and sexual weakness and fatigue, with good results.
Power Capsule For Men
₹719  ₹799  10% OFF
BUY NOW


संदर्भ

 1. American Academy of Orthopaedic Surgeons [Internet] Rosemont, Illinois, United States; Compartment Syndrome.
 2. American Academy of Orthopaedic Surgeons [Internet] Rosemont, Illinois, United States; Sprains, Strains and Other Soft-Tissue Injuries.
 3. National Fibromyalgia Association [Internet] California; Diagnosis Fibromyalgia.
 4. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Muscle aches.
 5. National Pharmaceutical Council [Inetrnet]; Management of Acute Pain and Chronic Noncancer Pain.

स्नायू दुखणे साठी औषधे

Medicines listed below are available for स्नायू दुखणे. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.